आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांचा आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव पडतो. या सर्व गोष्टींचे वास्तुशास्त्रात तपशीलवार वर्णन केले आहे. कबुतराच्या पिसाप्रमाणे काही गोष्टी घरात सुख-समृद्धी आणतात. शास्त्रानुसार कबुतराचे घरी येणे शुभ असते. पंडित इंद्रमणी घनश्याल News 18 hindi ला सांगतात की, कबुतराची पिसे घरी ठेवल्याने कर्ज, पैशाची कमतरता यासारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहाते. चला जाणून घेऊया कबुतराच्या पिसांशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी.
कबुतराच्या पंखांचे उपायवास्तुशास्त्रानुसार, कबुतराच्या पंखांमुळे घरातील गरिबी दूर होते. कारण कबूतर हे देवांचे दूत असल्याचे म्हटले जाते. कबुतराची पिसे घरात ठेवणे शुभ मानले जाते. कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात कबुतराची पिसे ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
शास्त्रानुसार दिवाणखान्याच्या दक्षिण कोपऱ्यात, किचनच्या उत्तरेला, बेडरूमच्या पूर्वेकडील कोपऱ्यात कबुतराचे पंख ठेवल्याने अपार संपत्ती मिळते. मात्र पंख अशा ठिकाणी ठेवावे जेथे ते कोणाला दिसणार नाही.
कबूतर देतात हे संकेतशास्त्रानुसार, कबुतराने जर घरात अंडी घातली तर लवकरच एखादी चांगली बातमी मिळू शकते. पांढऱ्या किंवा लाल कपड्यात कबुतराचे पंख गुंडाळून ध्यान केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. असे केल्याने घरात कधीही गरिबी येत नाही. व्यवसायात फायद्यासाठी पंख पिवळ्या कपड्यात पिवळ्या पेनीने बांधा आणि हळद लावल्यानंतर तिजोरीत ठेवा. यामुळे व्यवसायात नफा होईल आणि पैशाची कमतरता दूर होईल.