शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

Pitru Paksha 2022: २०५ वर्ष जुने ठाण्यातले पेशवेकालीन विठ्ठल मंदिर पाहिले आहे का? इंदिरा एकादशी निमित्ताने ते जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:43 PM

Indira Ekadashi 2022: पितृपक्ष आणि त्यात २१ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी. पितरांच्या मोक्षाचा मार्ग खुला करणाऱ्या एकादशीनिमित्त भेट घेऊया ठाण्याच्या विठ्ठल मंदिराची!

ठाणे शहराला दीड-दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. हे शहर जसे तलावांसाठी ओळखले जाते, तसे प्राचीन मंदिरांसाठीदेखील ओळखले जाते. पोर्तुगीजांनी ठाण्यावर ताबा मिळवल्यानंतर इथल्या प्राचीन मंदिरांचा विध्वंस केला आणि ठाण्याची शिल्पांनी नटलेली मंदिरे नष्ट झाली. पुढे मराठ्यांनी ठाणे जिंकले आणि ठाण्यातील मंदिरांना अभय मिळाले. अशाच आक्रमणातून स्वतःचे अस्तित्त्व अबाधित ठेवलेले २०५ वर्ष जुने विठ्ठल मंदिर अनेक ठाणेकरांनाही माहीत नाही. मूळचे ठाणेकर असलेले  मकरंद जोशी या मंदिराची सविस्तर माहिती देतात-

ठाण्याच्या पश्चिमेला स्टेशनलगत मोठा बाजार भरतो. हा परिसर विविध दुकानांनी आणि गर्दीने दिवसभर गजबजलेला असतो. याच गर्दीत हे प्राचीन विठ्ठल मंदिर गुडूप झाल्याने लोकांच्या पटकन लक्षात येत नाही. मात्र तिथे नेहमी जाणारे भाविक गर्दी लोटून विठोबा-रखुमाईची नित्याने भेट घेतात. 

सन १७४८ मध्ये हे मंदिर पंडित नावाच्या पुरोहितांकडे सोपवण्यात आले. पुढे सन १८१७-१८मध्ये पंडितांच्या यजमानांनी ठाणे शहरात मध्यवस्तीत एक मोठे देवालय बांधले.या नव्या मंदिरात मुख्य मुर्ती विठ्ठल-रखुमाईच्या बसवण्यात आल्या.त्याबरोबरच श्रीरामेश्वर लिंग आणि श्री गणपतीची स्थापना करण्यात आली.यावेळी पंडित घराण्यातील विश्वनाथ विनायक पंडित हे उपाध्ये होते त्यांनी नाशिक,त्र्यंबक,वाई या क्षेत्रांतील शुक्लयजुर्वेदिय ब्राह्मणांना निमंत्रित करुन या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. पंडित घराणे या मंदिराचे कायदेशीर विश्वस्त बनले. वंशपरंपरेने पंडित कुटुंबीय या मंदिराची देखभाल करत आहेत. आता यतीन अच्युत पंडीत या मंदिराचे व्यवस्थापन बघतात. २०१६ मध्ये मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले त्यावेळी मूळच्या मूर्तींमध्ये श्री सप्तश्रृंगी देवीच्या मूर्तीची भर घालण्यात आली आहे.

आजपर्यंत या विठ्ठल मंदिरात  मामासाहेब दांडेकर, जेजूरकर महाराज यांच्यासारख्या महाराष्ट्रातील अनेक नामवंत किर्तनकारांनी किर्तन सेवा दिली आहे.तसेच दरवर्षी महिला विशेष किर्तन सप्ताहाचेही आयोजन केले जाते.त्याचप्रमाणे भागवतसप्ताह,गीता सप्ताह,अखंड हरिनाम सप्ताह असे विविध सप्ताह आयोजित केले जातात.दरवर्षी या मंदिरात साजरा होणारा आषाढी एकादशीचा सोहोळा ठाणे आणि परिसरातील वारकरी संप्रदायिकांचे आकर्षण असतो. 

सध्या पितृपक्ष सुरू आहे, अशातच २१ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशीसुद्धा आहे. त्यानिमित्ताने नव्याने माहिती मिळालेल्या या विठ्ठल मंदिरात जाण्याची संधी दवडू नका. एरवीसुद्धा ठाण्यात खरेदीला गेलात, तर बाजारात गर्दीच्या मागे उभा असलेला विठोबा आपली वाट बघतोय, हे ध्यानात ठेवा!

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष