शहरं
Join us  
Trending Stories
1
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
3
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
4
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
5
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
6
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
7
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
8
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
9
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
10
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
11
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
12
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
13
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
14
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
15
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
16
लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान
17
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
18
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
19
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
20
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा

Pitru Paksha 2022: पितृपक्षात 'या' गोष्टी नजरेस पडत असतील तर पितर नाराज आहेत असे समजा व दिलेले उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 3:29 PM

Pitru Paksha 2022: पितृ दोष वेळीच ओळखा आणि दिलेल्या उपायानुसार ते दूर करा.

पितृपक्षाचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. पितृपक्षात कोणत्या गोष्टी घडल्या असता त्या शुभ घटना मानाव्यात याबद्दल आपण मागच्या आठवड्यात माहिती पाहिली.आता कोणत्या अप्रिय घटना घडल्या असता पितरांचा रोष आहे, याबद्दलही जाणून घेऊ. तसेच ते रोष दूर करण्याचे उपायही जाणून घेऊ. 

पितृपक्षातील पंधरा दिवसात आपले पूर्वज अर्थात पितर आपल्या वंशजांच्या भेटीसाठी पृथ्वीलोकात परत येतात अशी आपली श्रद्धा असते. आपल्या पितरांना गती मिळावी म्हणून आपण श्राद्ध करतो. दानधर्म करतो. त्यांना नैवेद्य दाखवतो. काक स्वरूपात येऊन त्यांनी प्रसाद ग्रहण करावा असे विनवतो. मात्र तसे झाले नाही तर पितर आपल्यावर नाराज तर नाहीत ना या विचाराने साशंक होतो. याचसंदर्भात पुढील माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकेल. 

>>पितृ दोष दूर होण्यासाठी पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी केले जातात. मात्र तसे करूनही पितृदोष दूर झाला नाही हे कसे ओळखावे तर? घरातील व्यक्ती सतत तणावाखाली असते. अथक प्रयत्न करूनही व्यवसायात नुकसान होते. करिअरची वाढ थांबते. वैवाहिक जीवनात संघर्ष वाढू लागतो. तरुण-तरुणींच्या विवाहात अडथळे येतात.

>>जेवणात केस येणे, दगड येणे, अन्न कुजणे ही लक्षणेदेखील पितृदोष दर्शवतात. तसेच स्वप्नात पितरांचे दर्शन घडते परंतु स्वप्नातही ते नाराज दिसतात, रडताना दिसतात. यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळते आणि घरावर नैराश्य पसरते. 

>>कोणतेही शुभ कार्य सुरू करायला गेल्यास अडथळे येऊ लागतात. शुभ कार्याच्या दिवशी घरात वाद, भांडण, तंटा सुरु होतो. मारामारी सुरू होते किंवा काही अशुभ घटना घडू लागतात. आनंदाचा प्रसंग दुःखात बदलतो. मुले होण्यात अडचणी येऊ लागतात.

पितृदोषावर श्राद्धकाळात करण्याचे उपाय: 

अशी लक्षणे माणसाच्या जीवनात दिसू लागल्यास पितृ दोष आहे असे समजावे. अशा परिस्थितीत पितरांना लवकरात लवकर प्रसन्न करण्याचे उपाय करावेत.

>>दान करा. गोदान अर्थात गायीचे दान करा आणि ते शक्य नसेल तर गायीला नियमितपणे चारा पाणी करा.

>>पितरांच्या शांतीसाठी विधी करा.

>>कावळ्यांना तसेच गायीला अन्न दान करा.

>>भगवान शंकराचे ध्यान करताना 'ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्; मंत्राचा रोज जप करा.

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष