शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

Pitru Paksha 2022: दक्षिण दिशा अशुभ नाही, तरीदेखील धर्मकार्यात ती निषिद्ध का ठरवली जाते? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 5:19 PM

Myths and Truth: दक्षिण दिशा यमाची दिशा एवढेच आपल्याला माहीत असल्याने आपण ती अशुभ ठरवून मोकळे झालो, पण धर्मकार्यात ती निषिद्ध ठरवण्यामागचे कारण वेगळे आहे, ते वाचा. 

'दक्षिण' हा शब्द वाम किंवा डावा या सापेक्षेने शुभ आहे. असे असतानाही दक्षिण दिशेविषयी समाजाच्या मनात दृढ असलेला समज सहजासहजी दूर होण्यासारखा नाही. प्रत्येक दिशेला एका लोकपालाची नेमणूक झालेली असते. त्यानुसार दक्षिण दिशेस यम लोकपालाची नेमणूक असते. वास्तविक यमाविषयी एकप्रकारचा तिटकारा व घृणा मनात असल्यामुळे दक्षिण दिशा ही त्याज्य समजली जाऊ लागली.

ही मजल इथपर्यंत पोहोचलेली असते की, यज्ञप्रक्रियेत दक्षिण दिशेचा नुसता उल्लेख आला तरी तो टाळून 'अवाचि' (बोलून न दाखवण्याजोगी) अशा पदाने तिचा उल्लेख केला जातो. खऱ्या अर्थाने विचार केल्यास यम आणि दक्षिण दिशा यांना अशुभ किंवा त्याज्य समजण्यासारखे असे काही आहे का? असा मोठा प्रश्न आहे. यमाने आपले कार्य केले नसते तर, केवढी भयानक आपत्ती आली असती, याचा नुसता विचारही अंगावर शहारा आणणारा आहे. 

दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये असेही म्हटले जाते. कारण आपला शेवटचा प्रवास या दिशेने होतो. म्हणून शवाचे पाय दक्षिण दिशेने ठेवले जातात. यावरून जिवंतपणी दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये हा समज रूढ झाला. परंतु, ज्याचा देह तगून राहण्यास निकामी झालेला आहे किंवा ज्याचे इहलोकीचे त्या जन्मापुरते कार्य संपले आहे, अशा जिवांना आपल्याकडे खेचून घेऊन त्यांना आपल्यात सामाविष्ट करणारा, त्याच्या दोषाचे शुद्धीकरण करणारा यम तिरस्करणीय कसा? 

यम म्हणजे नियमन किंवा नियंत्रण. जगातील प्रत्येक बारीक सारिक क्रीयेत नियमनाची आवश्यकता असते. म्हणून यज्ञकर्मात विशेषत: शांतीकर्मात यमाचा आवर्जून उल्लेख असतो व त्याची पूजा असते. कोणत्याही कर्माची सुरुवात होताना कत्र्याचे मुख पूर्वेकडे असते व कर्माचा प्रारंभ दक्षिणेकडे करून सांगता उत्तरेकडे होते. पुण्याहवाचनात पहिला गणपतीचा विडा, दुसरे दोन वरुणाचे, चौथा मातृकाचा, इ क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे असतो. दक्षिणेकडे यमराज व त्याचा लोक (यमलोक) असतो. उत्क्रांतीची वाटचाल दक्षिणेकडून उत्तरेकडे असते व शेवटी लय दक्षिणेत होतो. 

पृथ्वीच्या उदरातील महाचुंबक दक्षिणोत्तर असाच आहे. म्हणून रात्री झोपताना मस्तक दक्षिणेकडे व पाय उत्तरेकडे करून झोपल्यास चांगली झोप येते असा समज आहे. असे असताना दक्षिण दिशेस अतिपावित्र्य असल्यामुळे ती गैरसमजुतीने अपवित्र, अशुभ समजली जाते. ज्यावेळी एखादी व्यक्ती कडकडीत सोवळ्यात असते तेव्हा इतर लोक गैरसमजुतीने तिला स्पर्श होताच स्वत: स्नान करतात, तशातलाच प्रकार दक्षिण दिशेबाबत झाला आहे. 

शंकरासारख्या अतिपवित्र देवतेच्या पिंडीचे तोंड दक्षिणेकडे असते. दक्षिणेकडे तोंड करून घर असू नये असा संकेत आहे. कारण ती अतिपवित्र दिशा असल्याने घराचे पावित्र्यही तितकेच ठेवावे लागते. त्यात कसूर होण्यापेक्षा सरळ दक्षिणाभिमुख घर असूनच नये असा बिनागुंतागुंतीचा संकेत रूढ झाला आहे. प्रत्यक्ष ज्याचे घर दक्षिणाभिमुखी आहे, त्याचे अनुभव विचारात घेतले जावेत.

दक्षिण दिशेस मार्जन केल्यावर हात धुण्याची पद्धत आहे. वास्तविक मार्जन करण्यापूर्वी हात धुण्याची आवश्यकता आहे. परंतु हळू हळू काही रूढी इतक्या दृढ होतात, की त्याचे शास्त्रात रूपांतर कधी होते हेही कळत नाही. 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष