शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
3
Kolkata Doctor Case : संदीप घोष, अभिजित मंडलच्या मोबाईलमध्ये दडली आहेत अनेक गुपितं; CBI चा मोठा दावा
4
‘’राहुल गांधींना जीवे मारणारी धमकी सहन करणार नाही; ‘ईंट का जवाब पत्थर से देंगे’’, नाना पटोले यांचा इशारा   
5
'बलात्कार, व्हिडीओ अन् दुसऱ्यांसोबत ठेवायला लावले संबंध'; भाजपा आमदारावर गुन्हा
6
"राहुल गांधी यांना १०० वेळा दहशतवादी म्हणेन’’, रवनीत सिंग बिट्टू यांची टीका   
7
विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 
8
मोदींच्या पोस्टवर वीरेंद्र सेहवागची प्रतिक्रिया; पण काही वेळातच पोस्ट केली डिलीट, कारण...
9
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
10
"महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे गेला", विजय वडेट्टीवारांची टीका
11
Gold Silver Price 19 Sep: सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र चमकली; पाहा नवे दर
12
‘’पाकिस्तानने आधी आपला देश सांभाळावा, मग…’’, कलम ३७० वरून ओमर अब्दुल्लांचं प्रत्युत्तर   
13
अक्षय अन् अमिताभ हे सरकारी जाहिरातींसाठी किती मानधन आकारतात ? ऐकून बसेल धक्का!
14
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
15
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
16
अभिनयच नाही तर बिझनेस मध्येही हिट! माधुरी दीक्षितनं 'या' कंपनीत केली कोट्यवधींची गुंतवणूक
17
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
18
जग्गू दादाचा वर्षा उसगांवकरांना पाठिंबा, कौतुकही केलं, म्हणाले "तू भारीच आहेस, Good Luck"
19
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
20
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान

Pitru Paksha 2022: पितृपक्षात 'कावळ्यालाच' एवढा मान का? आधुनिक चष्म्यातून पाहूया!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 11:22 AM

Pitru Paksha 2022: एवढे पशु पक्षी असताना पितृपक्षात कावळ्यालाच मान का दिला असावा, याचा थोडा सद्यस्थितीशी सांगड घालून विचार करून पाहू!

>> ज्योत्स्ना गाडगीळ

'अतिपरिचयात अवज्ञा' असे एक संस्कृत वचन आहे. त्याचा अर्थ असा, की जास्त जवळीक झाली की अपमान होण्याची शक्यता बळावते. बिचाऱ्या कावळ्याच्या बाबतीत तसेच घडते. रोज अंगणात, खिडकीत, घराच्या छतावर काव काव करणाऱ्या कावळ्याला वामकुक्षी घेणाऱ्या गृहिणी हाकलून देतात. मात्र पितृपक्षात त्याच कावळ्याची अगतिकतेने वाट पहावी लागते. असे का? जाणून घेऊ.

साधारण दशकभरापूर्वीपर्यंत कावळ्याची काव काव झाली, की अतिथी येणार असा संकेत मानला जात असे. आता लोक स्वत:च्याच घरात पाहुण्यांसारखे राहतात म्हटल्यावर कावळ्याची काव काव कोण मनावर घेणारे? मात्र ज्ञानेश्वरीत माऊलींनी त्याला केवढ्या आदराने म्हटले आहे, `पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे' म्हणजे कावळ्याची 'काव काव' शकुन आहे, असे माऊली मानतात. नाहीतर आम्ही!

गोष्टीतला कावळा नेहमी बिचारा साधा-सुधा, शेणाचे घर बांधणारा आणि चिऊ ताईकडे आसरा मागणारा असल्याचे सांगितले जाते. परंतु, वास्तविक तसे नसून कावळ्याच्या घरट्याला एवढे महत्त्व आहे, की तो कधी घरटे बांधायला सुरुवात करतो आणि किती उंचावर घरटे बांधतो, यावरून पावसाची वर्दी कधी लागणार हे कळते. याचा अर्थ कावळा हवामान तज्ञ म्हटला पाहिजे, नाही का? पण गोष्टीतली चिऊ ताई भाव खाऊन जाते आणि तिथेही उपेक्षित राहतो, तो कावळाच!

काळ बदललाय! आपल्या बालपणी एक एक दगड माठात टाकून पाणी पिणारा कावळा आता बऱ्यापैकी स्मार्ट झाला आहे. तो थेट स्ट्रॉ टाकून पाणी पिऊ लागला आहे. मात्र स्वभाव तोच, भोळाबाबडा. अजूनही आपली पिले कोणती आणि कोकीळेची कोणती यात त्याची गल्लत होत असल्याने तो आपल्या आणि कोकीळेच्या पिलांचा एकत्र सांभाळ करतो. एकार्थी फुकटचे बेबी सिटींग करतो. तरी कुठेही वाच्यता करत नाही.

अशा कावळ्याला बाकीच्यांनी नाकारला पण थेट यमराजाने स्वीकारला, तेही आपले खाजगी वाहन म्हणून, असा काही ठिकाणी उल्लेख आहे. कावळ्याचा भाव वधारला. त्याची चपळाई, सुक्ष्म दृष्टी आणि सावधपणा हेरून यमराजांनी त्याला आपले दूत बनवले. म्हणून पितृपक्षात त्याला घरोघरी बोलावणे असते. कारण त्याला दिलेले अन्न यमराजाला आणि पर्यायाने पितरांना पोहोचते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे हे पंधरा दिवस कावळ्यासाठी मानाचे असतात.

पितरांच्या वासना व नैवेद्य ठेवणाऱ्याचे कलुषित मन पिंडाभोवती घिरट्या घालत असेल, तर कावळा पिंडाला शिवतही नाही. एवढा तो मानी असतो. तो नैवेद्याजवळ बसेल, पण ढुंकून पाहणारही नाही. जेव्हा आपण आपली चूक मान्य करतो, पितरांच्या इच्छा आकांक्षांच्या पूर्तीची हमी देतो, तेव्हा कुठे कावळा पिंडाला शिवतो!

कावळ्याच्या विष्ठेतून वड, पिंपळाची लागवड होते. म्हणजे त्याच्याही नकळत तो वृक्षारोपणाची मोहीम राबवत असतो. त्याला घनदाट झाडीत राहायला आवडते. आपल्या निवासाची सोय तो स्वत:च करतो. जेवणाच्या बाबतीतही त्याचे नखरे नसतात. मिळेल ते खाऊन तो पोट भरतो म्हणून कायम फिट राहतो.

कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव वगैरे देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागात सर्वत्र आढळतो. त्यामुळे बाकीचे पक्षी संपावर गेले तरी कावळ्याचे दर्शन रोज घडते. या सर्व कारणांमुळे हा मोस्ट अव्हेलेबल पक्षी पितृपक्षात पितरांच्या नैवेद्याचा मानकरी ठरतो.

 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष