शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Pitru Paksha 2023: श्राद्धविधी बरोबर 'हे' स्तोत्र म्हटल्याने मिळतात अधिक फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 7:00 AM

Pitru paksha 2023: २९ सप्टेंबर रोजी पितृ पक्ष सुरू झाला असून १४ ऑक्टोबर रोजी त्याची सांगता होणार आहे, दरम्यान श्राद्धविधी कराल तेव्हा हे स्तोत्र आवर्जून म्हणा!

आपण रोज देवाला नैवेद्य दाखवताना एखादा श्लोक किंवा स्तोत्र म्हणतो. त्याचप्रमाणे पितृपक्षात पितरांना आपण जे जेवण अर्पण करतो तो देखील एकप्रकारे पितरांना दाखवलेला नैवेद्यच असतो. कारण पितरांना देवाचे स्थान देऊन आपण त्यांची पूजा करतो, श्राद्धविधी करतो आणि नैवेद्य अर्पण करतो. अशा वेळी कोणता मंत्र म्हणावा हे आपल्याला बरेचदा ठाऊक नसते. धर्मशास्त्रानुसार पितरांना अन्न नैवेद्य अर्पण करताना गरुड पुराणात दिलेले पितृ स्तोत्र किंवा ऋग्वेदात दिलेले पितृ सूक्त म्हणणे अपेक्षित असते. परंतु सर्वांनाच संस्कृत भाषेचा सराव नसतो. अशा वेळी आपली माय मराठी धावून येते. रसाळ मराठी भाषेत दिलेले हे स्तोत्र भाविकांनी पितृपंधरवड्यात दिवसातून एकदा दररोज म्हटले पाहिजे आणि काही कारणास्तव रोज शक्य झाले नाही, तर निदान पितरांना नैवेद्य अर्पण करताना अवश्य म्हणावे. 

श्राद्धाला पितरांसाठी वाढलेल्या पानाचा नैवेद्य दाखविल्यावर, पितर जेवत आहेत असे समजून तेथे उभे राहून हे स्तोत्र म्हणावे. नंतर पितरांना मनोभावे प्रार्थना करावी. 

पितृअष्टक 

जयांच्या कृपेने या कुळी जन्म झालापुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांनानमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || १ ||इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली तयांनानमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || २ ||मिळो सद् गती मज पितरांनाविनती हीच माझी त्रिदेवतांनाकृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ३ ||जोडून कर हे विनती तयांना  अग्नि वरूण वायु आदी देवतांना सदा साह्य देवोनी उध्दरी पितरांनानमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ४ || वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांनासप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना मुक्तीमार्ग द्यावा ऊध्दरून त्यांनानमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ५ ||करूनी सिध्दता भोजनाची तयांनापक्वान्ने आवडीनें बनवून नानासदा तृप्ती होवो जोडी करांनानमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ६ ||मनोभावे पुजूनी तिला, यवानेविप्रास देऊन दक्षिणा त्वरेने आशिष द्याहो आम्हा सकलांनानमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ७ ||सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा न्यून काही राहाता माफी कराना गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना || ८ |।

तसेच, ज्यांना गरुड पुराणात दिलेले पितृ स्तोत्र आणि ऋग्वेदात दिलेले पितृ सुक्तम म्हणायचे असेल, त्यांच्यासाठी दोन्ही स्तोत्र पुढीलप्रमाणे अनुक्रमे दिली आहेत. 

।। पितृ स्तोत्र पाठ ।।

अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम्।नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम्।।इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा।सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान्।।मन्वादीनां च नेतार: सूर्याचन्दमसोस्तथा।तान् नमस्यामहं सर्वान् पितृनप्युदधावपि।।नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा।द्यावापृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि:।।देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान्।अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येहं कृताञ्जलि:।।प्रजापते: कश्पाय सोमाय वरुणाय च।योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि:।।नमो गणेभ्य: सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु।स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे।।सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा।नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम्।।अग्रिरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम्।अग्रीषोममयं विश्वं यत एतदशेषत:।।ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्रिमूर्तय:।जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिण:।।तेभ्योखिलेभ्यो योगिभ्य: पितृभ्यो यतामनस:।नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज।।

ऋग्वेदात दिलेले पितृ सुक्तम विशेषतः पौर्णिमा, अमावस्या आणि श्राद्ध तिथीला संध्याकाळी देवापुढे तेलाचा दिवा लावून म्हणावे. त्यामुळे पितृदोष, सर्व बाधा दूर होऊन शांती लाभते आणि यश मिळते असे म्हटले जाते. 

।। पितृ-सूक्तम् ।। 

उदिताम् अवर उत्परास उन्मध्यमाः पितरः सोम्यासः।असुम् यऽ ईयुर-वृका ॠतज्ञास्ते नो ऽवन्तु पितरो हवेषु  ॥१॥अंगिरसो नः पितरो नवग्वा अथर्वनो भृगवः सोम्यासः।तेषां वयम् सुमतो यज्ञियानाम् अपि भद्रे सौमनसे स्याम् ॥२॥ये नः पूर्वे पितरः सोम्यासो ऽनूहिरे सोमपीथं वसिष्ठाः।तेभिर यमः सरराणो हवीष्य उशन्न उशद्भिः प्रतिकामम् अत्तु ॥३॥त्वं सोम प्र चिकितो मनीषा त्वं रजिष्ठम् अनु नेषि पंथाम्।तव प्रणीती पितरो न देवेषु रत्नम् अभजन्त धीराः ॥४॥त्वया हि नः पितरः सोम पूर्वे कर्माणि चक्रुः पवमान धीराः।वन्वन् अवातः परिधीन् ऽरपोर्णु वीरेभिः अश्वैः मघवा भवा नः॥५॥त्वं सोम पितृभिः संविदानो ऽनु द्यावा-पृथिवीऽ आ ततन्थ।तस्मै तऽ इन्दो हविषा विधेम वयं स्याम पतयो रयीणाम् ॥६॥बर्हिषदः पितरः ऊत्य-र्वागिमा वो हव्या चकृमा जुषध्वम्।तऽ आगत अवसा शन्तमे नाथा नः शंयोर ऽरपो दधात ॥७॥आहं पितृन्त् सुविदत्रान् ऽअवित्सि नपातं च विक्रमणं च विष्णोः।बर्हिषदो ये स्वधया सुतस्य भजन्त पित्वः तऽ इहागमिष्ठाः॥८॥उपहूताः पितरः सोम्यासो बर्हिष्येषु निधिषु प्रियेषु।तऽ आ गमन्तु तऽ इह श्रुवन्तु अधि ब्रुवन्तु ते ऽवन्तु-अस्मान् ॥९॥आ यन्तु नः पितरः सोम्यासो ऽग्निष्वात्ताः पथिभि-र्देवयानैः।अस्मिन् यज्ञे स्वधया मदन्तो ऽधि ब्रुवन्तु ते ऽवन्तु-अस्मान् ॥१०॥अग्निष्वात्ताः पितर एह गच्छत सदःसदः सदत सु-प्रणीतयः।अत्ता हवींषि प्रयतानि बर्हिष्य-था रयिम् सर्व-वीरं दधातन ॥११॥येऽ अग्निष्वात्ता येऽ अनग्निष्वात्ता मध्ये दिवः स्वधया मादयन्ते।तेभ्यः स्वराड-सुनीतिम् एताम् यथा-वशं तन्वं कल्पयाति ॥१२॥अग्निष्वात्तान् ॠतुमतो हवामहे नाराशं-से सोमपीथं यऽ आशुः।ते नो विप्रासः सुहवा भवन्तु वयं स्याम पतयो रयीणाम् ॥१३॥आच्या जानु दक्षिणतो निषद्य इमम् यज्ञम् अभि गृणीत विश्वे।मा हिंसिष्ट पितरः केन चिन्नो यद्व आगः पुरूषता कराम ॥१४॥आसीनासोऽ अरूणीनाम् उपस्थे रयिम् धत्त दाशुषे मर्त्याय।पुत्रेभ्यः पितरः तस्य वस्वः प्रयच्छत तऽ इह ऊर्जम् दधात ॥१५॥

॥ ॐ शांति: शांति: शांति: ॥

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष