शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

Pitru Paksha 2023: २९ सप्टेंबर पासून पितृ पक्ष सुरू होतोय; महालय आणि श्राद्ध यातील मुख्य फरक जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 11:10 AM

Pitru Paksha 2023: पितृ पक्षाला कोणी महालय म्हणतं तर कोणी वार्षिक श्राद्ध, हे दोन्ही वेगळे आहेत की एकच; याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

गणपती आणि नवरात्र यांच्या मधला काळ महालयाचा असतो. गणेशोत्सवाचा आनंद ओसरल्यावर पितरांचा आठव करावा, त्यांचे पूजन करावे आणि परत नव्या उत्साहाने नवरात्रोत्सवाचा आनंद लुटावा, अशी आपल्या संस्कृतीची सुंदर रचना आहे. यंदा महालयारंभ २९ सप्टेंबर रोजी होणार असून १४ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या (Sarvapitri Amavasya 2022) आहे. या काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात व त्याचे महत्त्व काय ते थोडक्यात जाणून घेऊ. 

महालय याचे अपभ्रष्ट रूप महाळ असे होते. महालयाचा काल भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत म्हणजे जवळ दीड ते पावणे दोन महिन्यांचा असतो. महालय हादेखील श्राद्धविधीच आहे. नेहमीचे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध आणि महालय यातील मुख्य फरक म्हणजे प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीला उद्देशून असते तर महालय हा आपल्या संबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून असतो. म्हणजेच दुसऱ्या भाषेत प्रतिसांवत्सरिक श्राद्ध हे ठराविक पार्वणास (ठराविक व्यक्तीस) उद्देशून असते तर महालय सर्व पार्वणांना (दिवंगत नातेवाईक) उद्देशून असतो. 

श्राद्धकर्त्याने आपल्याजवळ एका जाड पुठ्ठ्यावर पावर्णांची यादी लिहून ती आपल्या देव्हाऱ्यात ठेवावी. वास्तविक ब्रह्मकर्मातील पितृतर्पणात या यादीतील सर्व पार्वणांचा उच्चार दररोज करावा लागत असल्यामुळे पूर्वी अशी यादी लिहून ठेवण्याची प्रथा नव्हती. हल्ली पंचमहायज्ञाचा लोप होत असल्यामुळे अशा यादीची गरज भासते. यामध्ये पितृत्रयी (वडील, आजोबा, पणजोबा), मातृत्रयी (आई, आजी, पणजी), मातामहत्रयी (आईचे वडील, आजोबा, पणजोबा) अशा मुख्य तीन त्रयी आहेत. ज्यांची पत्नी जिवंत नसेल त्या पार्वणांचा सपत्नीक म्हणून उच्चार करावा. 

याखेरीज पत्नी, पुत्रादिक, चुलते, मामा, भाऊ, आत्या, मावशी, बहीण, सासरे इ. पार्वणे आहेत. त्या त्या पावर्णांची पत्नी हयात नसेल तर सपत्नीक व पती हयात नसेल तर सभर्तृका असा नामोच्चार करावा. 

थोडक्यात आपण दरवर्षी ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्राद्धविधी करतो, त्याला महालय म्हणतात आणि ज्यांच्या नावे करतो त्यांना पावर्ण म्हणतात. सद्यस्थितीत लोक वेळे अभावी आणि श्राद्धतिथी माहित नसल्यास किंवा लक्षात नसल्यास सकल दिवंगत व्यक्तींचे स्मरण करून सर्वपित्री अमावस्येला महालय करून मोकळे होतात. या सर्वात विधींइतकेच महत्त्व श्रद्धेला आहे. कारण हा केवळ उपचार नाही, तर दिवंगत व्यक्तींप्रती आदर, आत्मियता आणि आपुलकी दर्शवणारा भाव आहे. श्रद्धा असेल तरच श्राद्ध!

 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्ष