शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

प्रबोधिनी एकादशीनिमित्त पांडुरंगाकडे 'हे' मागणे मागा, जे संतांनीही मागितले व त्यांचे पूर्णही झाले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 09:48 IST

Prabodhini Ekadashi 2023: आज प्रबोधिनी एकादशीनिमित्त विठूमाउलीची भेट घ्यायला जाल, तेव्हा इतर काही न मागता काय मागावे हे संतांनी सांगितले आहे. 

प्रबोधिनी एकादशी अर्थात कार्तिकी एकादशी, पांडुरंगाचा आणि भक्तांच्या भेटीचा दिवस. दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर कार्तिकी एकादशीला भक्त भगवंताची समक्ष भेट होणार आहे. अशा वेळी भगवंताकडे दुसरे काही मागण्याऐवजी तुकाराम महाराजांनी मागितलेले मागणेच आपणही मागावे. काय होते ते मागणे?

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा,गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी,नलगे मुक्ति धन संपदा, संत संग देई सदा,तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी।

भक्त भगवंतामध्ये अतूट प्रेमाचा धागा दोहोंना बांधून ठेवणारा आहे. हेच प्रेम तसूभरही कमी होऊ नये, म्हणून तुकाराम महाराज पांडुरंगाला विनवतात, हेच दान आमच्या पदरात टाक, की तुझा विसर आम्हाला कधीच पडणार नाही. मुखाने तुझे गुण गाऊ आणि तुझ्या भजनात दंग होऊन नाचू, तो आनंद सोहळा अनुभवण्यासाठी तुझी आठवण सतत आम्हाला राहू दे. 

शेकडो वर्षांच्या परंपरेचे स्मरण करून हेचि दान देगा देवा म्हटलेच पाहिजे. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिहितात, 'मागणाऱ्याला कमीपणा नाही आणि देणाऱ्याच्या दातृत्वाला उणेपणा नाही, असे हे मागणे आहे. इथे मागणाऱ्या याचकाला आपण याचक असल्याचा अभिमान आहे. याचक आहोत, यातच सन्मान आहे. हे मागणे सकाम असले, तरी ते निष्कामालाही निष्काम करणारे आहे. निरिच्छेलाही निरिच्छ बनवणारे आहे, असे आगळे वेगळे मागणे संतांनी मागावे आणि आपण केवळ पुनरुच्चारण करावे.'

आठवण कोणाची ठेवावी लागते, तर आपण ज्यांना विसरतो त्यांची! परंतु, पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी अशी अवस्था झालेल्या संतांना देवाचा विसर पडणे शक्यच नाही. तरीदेखील तुकाराम महाराज समस्त जनांच्या वतीने हे मागणे मागत आहेत आणि पांडुरंगाने ते दान पदरात टाकावे, अशी विनंतीदेखील करत आहेत. आपल्या रोजच्या कामाच्या व्यापात देवाचा विसर पडू नये, तर देवाच्या साक्षीने प्रत्येक काम पार पडावे, हा त्यामागचा हेतू आहे. 

स्वार्थापुरते इतरांचे गुण गाणारे आम्ही पामर, ज्याने सर्वस्व दिले त्याचेच गुण गायला विसरतो. परंतु, संत मात्र 'अमृताहूनी गोड नाम तुझे देवा' म्हणत नामस्मरणात तल्लीन होतात. ती समाधी अवस्था अनुभवायची असेल, तर आवडीने हरीनाम घेतले पाहिजे. 

या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकायला नको, म्हणून आम्ही पापभिरू, देखल्या देवा दंडवत करतो. परंतु, जेव्हा हरीनाम गोड वाटू लागेल आणि परमार्थाचा प्रवास सुरू होईल, तेव्हा विषयांची आसक्ती कमी होऊन धन, संपत्ती, मोक्ष अशी कुठलीच अभिलाषा उरणार नाही. आम्ही केवळ सत्संगाचे मागणे मागत राहू. संतसहवासात राहून तुझे स्मरण करत राहू. प्रत्येक काम तुला अर्पण करू, मुखाने चांगलेच बोलू, कानाने चांगलेच ऐकू , मतीने चांगलाच विचार करू. ही सवय एकदा का जडली, तर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागला, तरी बेहत्तर, आम्ही त्यात सुखच मानू असे तुकाराम महाराज म्हणतात. 

तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी!

चला तर मग, आपणही तुकाराम महाराजांप्रमाणे पांडुरंगाकडे मागणे मागुया आणि प्रबोधिनी एकादशीला आपल्या अंतस्थ परमेश्वराला साद घालुया.जय हरी!