शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योगसूर्याचा अस्त, रतन टाटा कालवश; ब्रीच कॅण्डी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
3
‘असे’ घडले रतन टाटा; आजीने सांभाळले, स्कूटरमधून नॅनोची प्रेरणा अन् फोर्डला धडा शिकवला
4
चीन युद्धामुळे रतन टाटांची प्रेम कहाणी राहिली अधुरी; पण, नशिबाने काही वेगळेच ठरवले होते
5
मराठीत वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण: PM मोदी; १० मेडिकल कॉलेजचे उद्घाटन
6
अनपेक्षित निकालांचे आम्ही विश्लेषण करू; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची माहिती
7
हरयाणामध्ये अहंकाराचा फुगा जनतेनेच फोडला; CM एकनाथ शिंदेंची इंडिया आघाडीवर टीका
8
मविआच्या ७० जागांचा तिढा अद्यापही सुटेना; २१८ जागांवर एकमत, बैठकीत बंडखोरी रोखण्यावर भर
9
लवकरच येणार कर्ज स्वस्ताई; RBIकडून व्याजदर ६.५ टक्क्यांवर कायम, आगामी बैठकीत कपातीचे संकेत
10
...तर बांधकामाच्या सर्व नव्या परवानग्या थांबवू; उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला इशारा
11
STला मिळणार ३०० कोटी; बिल्डरांमार्फत ३८ जागांचा विकास, मुंबईतील मोक्याच्या जागांचा समावेश
12
१९ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचीमध्ये समावेश; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिली मंजुरी
13
AI मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल; डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर मानकरी
14
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
15
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
16
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
17
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
18
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
19
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
20
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका

Pradosh Vrat 2022: सर्वार्थ सिद्धी आयुषमान योगात सोमप्रदोष; ‘असे’ करा महादेवांना प्रसन्न, पाहा, व्रतपूजा विधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 12:11 PM

Pradosh Vrat February 2022: सोमप्रदोष दिनी केलेले शिवपूजन शुभ मानले गेले असून, याचे अनेकविध लाभ मिळू शकतात, असे सांगितले जाते.

भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये नानाविध प्रकारची शेकडो व्रते, उपासना केल्या जातात. प्रत्येकाचे महत्त्व वेगळे आणि तितकेच महत्त्वाचेही आहे. त्रिमुर्तींपैकी एक असलेल्या महादेव शिवशंकरांचे कोट्यवधी भक्त दररोज नित्यनेमाने पूजन, भजन, नामस्मरण करत असतात. शिवाच्या व्रतांमध्ये सोमप्रदोष व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे. महादेवाचे शुभाशिर्वाद लाभण्यासाठी सोमप्रदोष व्रताचरण केले जाते. कसे करावे व्रतपूजन, या दिवशी जुळून येणारे अद्भूत शुभ योग कोणते, ते जाणून घेऊया... (Pradosh Vrat 2022)

फेब्रुवारी महिन्यात १४ तारखेला सोमप्रदोष आहे. या दिवशी महादेवाचे पूजन शुभ मानले जाते. प्रदोष काळी हे व्रत करायचे असते. प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला प्रदोष व्रताचरण केले जाते. सोमवारी त्रयोदशी येत असेल, तर त्याला सोमप्रदोष असे म्हटले जाते. प्रत्येक वारी येणाऱ्या प्रदोषाला वेगवेगळी नावे असून, त्याचे महत्त्वही अनन्य साधारण असेच आहे. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ०६ वाजून १० मिनिटे ते रात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे या कालावधीत सोमप्रदोष व्रतपूजन करावे, असे सांगितले जात आहे. (Pradosh Vrat February 2022 Date and Time)

असे करावे व्रतपूजन

सायंकाळी करावयाचे हे व्रत आहे. प्रदोष काळी हे व्रत केले जाते. स्नानादी कार्य उरकल्यानंतर एका चौरंगावर शिवाची प्रतिमा किंवा शिवलिंग स्थापन करावे. व्रतपूजन करताना सुरुवातीला संकल्प करावा. यानंतर महादेवांची षोडशोपचार पूजा करावी. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. शिवाची आरती करावी. व्रतकथा पठण करावी किंवा ऐकावी. मनोभावे नमस्कार करून प्रसाद ग्रहण करावा. शक्य असल्यास शिवस्तुती, शिव चालीसा तसेच महादेवांशी संबंधित श्लोक,  स्तोत्रे, यांचे पठण किंवा श्रवण करावे. यथाशक्ती महामृत्यूंजय मंत्राचा जप करावा. व्रताचरण करणे शक्य नसल्यास ओम नमः शिवाय हा मंत्र १०८ वेळा किंवा यथाशक्ती करावा. अन्य विधी आपापले कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे करावेत, असे सांगितले जाते. व्रतपूजन करताना मन प्रसन्न ठेवावे. कोणताही चुकीचा विचार मनात आणू नये. एकाग्रतेने विधी करावेत, असे सांगितले जाते. (Som Pradosh Vrat February 2022 Puja Vidhi)

अनेकविध शुभ योगात सोमप्रदोष 

१४ फेब्रुवारी रोजीचे हे माघ महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत आणि फेब्रुवारीचे पहिले व्रत आहे. या दिवशी व्रत करून प्रदोष काळात शिवाची आराधना केल्याने आरोग्य, सुख, शांती, ऐश्वर्य, वैभव इत्यादी प्राप्त होतात. प्रदोष व्रत पाळल्याने दोष दूर होतात, अशी मान्यता आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि आयुषमान योग, रवि योग असे विविध शुभ योग जुळून येत आहेत. तसेच जन्मकुंडलीत चंद्र कमकुवत असेल, तर चंद्राचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी सोमप्रदोष व्रत उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जाते. 

 

टॅग्स :Yogaयोगासने प्रकार व फायदे