शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनाचा दिवस बाराही राशींसाठी खास ठरणार; अडलेली कामं मार्गी लागणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 6:30 AM

Raksha Bandhan 2023: सूर्य नक्षत्र गोचराचा प्रभाव पडून तुमच्या भाग्योदयास कसा हातभार लागणार आहे ते पाहू; तुमच्या राशीवरून झटपट टाका एक नजर!

आपल्याकडे गमतीने असे म्हटले जाते, की रक्षा बंधनाचा दिवस म्हणजे भावांसाठी खर्चाचा आणि बहिणीसाठी कमाईचा दिवस असतो. मात्र गमतीचा भाग वगळता त्या दिवशी जुळून येणाऱ्या योगामुळे बाराही राशींचे भाग्य उघडणार आहे. सूर्याचे नक्षत्र गोचर अतिशय शुभ मानले गेले असून ते उत्तम लाभदायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023) आणि नारळी पौर्णिमा ३० ऑगस्ट रोजीच साजरी करावी, असे सांगितले जात आहे. यंदाच्या रक्षाबंधनाला भद्रा करण जुळून येत आहे. देशातील अनेक ठिकाणी भद्रा काळात शुभ कार्ये केली जात नाहीत. मात्र महाराष्ट्रात तसे काही बंधन नाही. रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी १०.५८ ते रात्री ९.०२ भद्रा करण आहे. महाराष्ट्रात मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्याची पद्धत नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसात कधीही राखी बांधली तरी चालेल, असे सांगितले जात आहे. ३१ ऑगस्ट रोजी सूर्य मघा नक्षत्रातून पूर्वा नक्षत्रात प्रवेश करत आहे. पूर्वा नक्षत्रात होत असलेला सूर्याचा प्रवेश अतिशय चांगला मानला जातो. पूर्वा नक्षत्राचा स्वामी शुक्र आहे. सूर्य जेव्हा या नक्षत्रात प्रवेश करेल तेव्हा लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होईल.

रक्षाबंधनाचा दिवस तुमच्या राशीसाठी खास कसा ठरणार ते पाहू!

मेष : येत्या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्त होईल. त्यासाठी कुटुंबियांचे व मित्रपरिवाराचे सहकार्य मिळेल.

वृषभ : या राशीच्या लोकांना कामातून फुरसत मिळणार नाही, तसेच नवनव्या संधी चालून येतील. कुटुंबियांचे प्रेम आणि सहवास मिळेल.

मिथुन : बऱ्याच काळापासून अडलेली अनेक कामे मार्गी लागतील. दरम्यान प्रवास योग असल्याने तीर्थयात्रा केल्यास त्या यशस्वी होतील.

कर्क : कामात व्यस्त रहाल. मनासारख्या संधी चालून येतील. नवीन क्षेत्रात स्वतःला आजमावून पहाल.

सिंह : हितशत्रूंवर मात कराल. मुलांची प्रगती होईल. त्यांच्याकडून आनंदवार्ता कळतील. कोणाशीही वादविवाद टाळा

कन्या : कन्या राशीसाठी रक्षाबंधन अधिक लाभदायी ठरणार आहे. येत्या काळात त्यांना मानसन्मानाच्या संधी प्राप्त होतील आणि विरोधक नमते घेतील.

तूळ : मुलांकडून आनंद वार्ता समजतील. उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या संधी येतील. आगामी काळात कार्यमग्न राहाल.

वृश्चिक : येत्या काळात कामाचा ताण असेल, परंतु कोणत्याही प्रकारे घाई गडबड करू नका, नुकसान होईल. मन लावून, जिद्दीने काम केलेत, तर आगामी काळ तुमचाच आहे असे समजा!

धनु : तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. त्या कामासंदर्भात असतील नाहीतर प्रापंचिक असू शकतील. त्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तुम्ही तयारीत राहा. त्यातून निश्चितच चांगले घडणार आहे.

मकर : अनेक दिवसांपासून भेडसावत असलेली आर्थिक समस्या दूर होईल. उत्पन्न वाढेल आणि लवकरच मोठ्या कार्यात, क्षेत्रात यशस्वी व्हाल!

कुंभ : बृहस्पतीच्या कृपेने तुमच्या अडलेल्या कामाला गती मिळेल आणि उत्पन्नात वाढ होईल. सरकारी कामात यश मिळेल.

मीन : मीन राशीच्या आर्थिक अडचणी दूर होऊन कामाच्या नवीन संधी प्राप्त होणार आहेत. मनाची चंचलता बाजूला ठेवून शांत चित्ताने निर्णय घेतल्यास ते खूप लाभदायक ठरतील.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन