शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

रक्षाबंधन: स्वामींना बांधा पहिली राखी; सदैव रक्षण करतील स्वामी, अपार कृपेचा होईल लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 09:52 IST

Raksha Bandhan 2024 Tie First Rakhi to Swami Samarth Maharaj: रक्षाबंधनाच्या दिवशी स्वामींना पहिली राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती? सविस्तर जाणून घ्या...

Raksha Bandhan 2024 Tie First Rakhi to Swami Samarth Maharaj: भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याची वीण म्हणजे रक्षाबंधन.चातुर्मासातील श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण अवघ्या देशभरात साजरा केला जातो. श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. राखी म्हणजेच रक्षाला पूर्वी 'रक्षासूत्र' म्हटले जात होते. रक्षासूत्र बांधण्याची परंपरा वैदिक काळापासूनची आहे. रक्षासूत्राला सामान्य भाषेत राखी म्हणतात. जे वेदातील संस्कृत शब्द 'रक्षिका' या शब्दाचा अपभ्रंश आहे. यंदाच्या राखीपौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी पहिली राखी स्वामींना बांधावी. स्वामींना राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घेऊया...

अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. हजारो घरात दररोज स्वामींचे पूजन, नामस्मरण अगदी न चुकता नित्यनेमाने होत असते. अनेक जण गुरुवारी नियमितपणे मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेत असतात. अशक्यही शक्य करतील स्वामी, असा दृढ विश्वास भाविकांचा आहे. दुःखात जसे स्वामींना आवाहन केले जाते. तसेच सुखातही स्वामींचे आवर्जून स्मरण केले जाते. स्वामींमुळे एखादी गोष्ट घडली, असे अनुभव सांगणारे शेकडो लोक आहेत. स्वामींनी केलेल्या उपकारांची जाण ठेवली जाते. अशातच सण-उत्सवांमध्येही स्वामी सेवा सुरू ठेवली जाते. याचाच एक भाग म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम स्वामींना राखी बांधावी, असे म्हटले जाते. स्वामी माऊली आहेत. स्वामींच्या अपार कृपेचा लाभ मिळू शकतो. भाविकांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात. त्याचीच एक कृतज्ञता म्हणून स्वामींना राखी बांधावी, असे सांगितले जाते. 

स्वामींना पहिली राखी बांधण्याची योग्य पद्धत कोणती?

१९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन आहे. सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर भावाला राखी बांधताना तबक तयार केले जाते. ते तबक घेऊन सर्वप्रथम देवघरापाशी जावे. देवांसमोर दिवा लावावा. स्वामींची मूर्ती असेल किंवा प्रतिमा असेल, तिथे मनोभावे नमस्कार करून रक्षाबंधनाचा संकल्प करावा. स्वामींना तिलक लावावा. स्वामींची मूर्ती असेल तर डोक्यावर अक्षता घालाव्यात, प्रतिमा असेल तर त्यावर अक्षता वाहाव्यात. त्यानंतर स्वामींची मोठी मूर्ती असेल तर स्वामींना उजव्या हाताला राखी बांधावी, मूर्ती लहान असेल किंवा प्रतिमा असेल, तर स्वामींच्या उजव्या हातापाशी राखी ठेवावी. स्वामींचे औक्षण करावे. स्वामींना मिठाई अर्पण करावी. स्वामींना मनोभावे नमस्कार करावा, असे सांगितले जाते.

आपल्याकडील हजारो घरांमध्ये देवाला राखी अर्पण करण्याची प्रथा प्रचलित आहे. इष्ट आणि आराध्य देवामुळे आपले आणि घराचे संरक्षण होते. याबाबत कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणूनच एक राखी देवासाठी ठेवली जाते. प्रथमेश असलेल्या गणपतीला राखी अर्पण करावी, असे मानले जाते. रामायण, महाभारत, स्कंदपुराण, पद्मपुराण आणि श्रीमद्भागवत पुराण अनेक ठिकाणी रक्षाबंधनाचा उल्लेख आढळून येतो. अनेक भाविक स्वामींना हक्काने गोष्टी सांगत असतात. स्वामी आपल्यातच आहेत, असे समजून व्यवहार करत असतात. सुख-दुःखात स्वामींचे आवर्जून स्मरण करत असतात. आपापल्या कुळाचार, कुळधर्माप्रमाणे रक्षाबंधन करताना, स्वामींना राखी अर्पण करावी.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनshree swami samarthश्री स्वामी समर्थPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३spiritualअध्यात्मिकShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मास