शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Ram Navami 2021 : श्रीरामांना तरी प्रारब्ध कुठे चुकले? म्हणून स्वत:च्या नशीबाला दोष देणे सोडून द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 1:21 PM

Ram Navami 2021 : रामाने पदोपदी आलेल्या परिस्थितीचा सामना केला आणि धीराने, संयमाने, न्यायाने, प्रेमाने वागून रामराज्य निर्माण केले. आपणही रामाकडून प्रेरणा घेत आपल्या आयुष्यात राम आणुया आणि प्राप्त परिस्थितीचा आनंदाने सामना करायला शिकुया.

आज श्रीराम नवमी. प्रभू रामरायाचे जीवनचरित्र पाहिले, तर अयोध्येचा राजकुमार असूनही त्याच्या वाट्याला का कमी हालअपेष्टा आल्या?श्रीरामांचा जन्म झाला, तो श्रावणकुमाराच्या माता पित्यांच्या शापातून. एवढा मोठा पुण्यात्मा, परंतु त्याच्या जन्माच्या आधीच त्याची सावत्र आई कैकयी त्याच्यासाठी वनवास मागून घेते. रामाचा जन्म होतो. राजा दशरथाकडून आणि कौसल्या, सुमित्रा आणि कैकयी यांच्याकडून कोडकौतुक करून घेण्याच्या दिवसात गुरुगृही जाण्याचा प्रसंग येतो. 

राजवाड्यात जन्म घेऊनही गुरुंच्या आश्रमात जाऊन पाणी भरणे, लाकडे वेचणे, गुरे राखणे ही कामे त्याला करावी लागतात. शिक्षण करून राम आणि त्याचे भाऊ घरी परततात, तर विश्वामित्र ऋषी पंधरा वर्षाच्या रामाला उपद्रवी राक्षसांचा बंदोबस्त लावण्यासाठी सोबत घेऊन जातात. परत येतात, ते मिथिला नरेशची सुपूत्री जानकी हिच्याशी विवाह करूनच!

राजा दशरथ आणि सर्व जनतेचा प्रिय सुकुमार राम, सिंहासनावर बसण्यासाठी नियुक्त केला जातो, तेव्हा कैकयी आपल्या वचनांची आठवण करून देत भरताला राजसिंहासन आणि रामाला वनवास मागून घेते. आयुष्यातला सोनेरी क्षण हातात येता येता निसटून गेला, तरी राम स्थितप्रज्ञ राहतात आणि वडिलांनी भावनेच्या भरात तिसऱ्याला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी ऐन तारुण्याची चौदा वर्षे वनवासात काढतात. सावलीसारखी असलेली पत्नी सीता राजवैभव सोडून पतीच्या पाठोपाठ वनवास स्वीकारते आणि बंधू लक्ष्मणदेखील नवे नवे लग्न झालेले असतानाही पत्नीवियोग सहन करून सेवेसाठी रामापाठोपाठ जातो. 

दंडकारण्यात रामाचा सामना एकापेक्षा एक भयाण राक्षसांशी होतो. राम त्यांचा पराभव करतो. ऋषी,मुनी,तपस्वी,साधू, उपेक्षित जनता, त्यांच्या भेटीसाठी आसुसलेले भक्त यांचा उद्धार करतो. अशातच रावण नामक दुष्ट राक्षस रामाच्या अपरोक्ष त्याच्या पत्नीला पळवून नेतो. जीवापाड प्रेम असलेली अर्धांगिनी तिचे आपण रक्षण करू शकलो नाही, हे शल्य त्याच्या मनाला टोचत राहते. तिच्या शोधार्थ राम आकाशपाताळ एक करतो. दशानन रावणाशी युद्ध करतो. राजधर्माला अनुसरून सीतेची अग्निपरीक्षा घेऊन सन्मानाने परत आणता़े  

वनवास संपवून आल्यावर अयोध्येचा राजा बनतो. परंतु एका नागरिकाने उपस्थित केलेल्या शंकेमुळे राम पुनश्च राजधर्म आणि पतिधर्म या द्वंद्वात अडकतात. त्यांची व्यथा सीतेला कळते. तेव्हा सीतामाई आपणहून वनात जाऊन वाल्मीकी ऋषींच्या आश्रमात राहणे पसंत करते. अनेक वर्षे ती परत येत नाही. हतबल रामाला एक राजा म्हणून सीतेचा वियोग सहन करावा लागतो. परंतु सीतेवरील प्रेमापोटी तो दुसरा विवाह करत नाही. तर राजसूयज्ञाच्या वेळेस सीतेची सुवर्णमूर्ती स्थापित करतो. त्या प्रसंगी लव कुशाची भेट होते, पण ही आपलीच मुले आहेत, यापासून राम अनभिज्ञ असतो. त्यांच्यायोगे राम सीतेची भेट घेण्यास वनात जातो, तेव्हा सीता मुलांना रामाच्या स्वाधीन करून वसुंधरेच्या कुशीत कायमची निघून जाते.

रामाला संसारसुख मिळत नाहीच, शिवाय एकल पालकत्व अंगिकारून मुलांचा आणि रयतेचा सांभाळ करावा लागतो. कालपरत्वे सर्व जबाबदाऱ्या संपवून राम शरयू नदीत आपले अवतारकार्य संपवतो.

अशी ही रामकथा म्हणावी की रामव्यथा? परंतु, एवढे सगळे घडूनही रामाने पदोपदी आलेल्या परिस्थितीचा सामना केला आणि धीराने, संयमाने, न्यायाने, प्रेमाने वागून रामराज्य निर्माण केले. आपणही रामाकडून प्रेरणा घेत आपल्या आयुष्यात राम आणुया आणि प्राप्त परिस्थितीचा आनंदाने सामना करायला शिकुया. जय श्रीराम!

टॅग्स :ramayanरामायणRam Navamiराम नवमी