शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Ramayan: कुंभकर्ण वर्षातून दोनदाच उठायचा; हा त्याच्यासाठी शाप होता की वरदान? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 1:33 PM

Ramayan : रावणाचा सख्खा भाऊ कुंभकर्ण हा अत्यंत झोपाळू तरी शूरवीर होता; त्याच्या झोपेचे चक्र ब्रह्मदेवाने ठरवले होते; कसे ते पहा!

झोपाळू माणसाला आपण कुंभकर्ण म्हणतो. त्यामागचा इतिहास मनोरंजक आहे. कुंभकर्ण हा रावणाचा धाकटा भाऊ. तो जन्मत:च महाकाय होता. पर्वतासारख्या शरीराच्या कुंभकर्णाने जन्म होताच एक हजार राक्षसांना खाल्ले. इंद्र ऐरावतावर बसून याच्या अंगावर फिरला, त्याला वज्राने मारले तरी कुंभकर्णाला काही झाले नाही. उलट त्याने ऐरावताचा एक दात उपटला. तेव्हा इंद्र पळून गेला. आणि ब्रह्मदेवाला आपली रक्षा करण्याची विनंती केली. 

ब्रह्मदेव म्हणाले, `इंद्रदेवा, कुंभकर्णाचा उपद्रव वाढला आहे, त्याला शांत ठेवण्याचा पर्याय म्हणजे त्याला निद्राधीन करणे. त्याच्या दुष्कृत्याचे फळ म्हणून मी त्याला कायम झोपलेला राहशील, असा शाप देतो.'

रावणाला हे समजताच त्याने ब्रह्मदेवाची स्तुती केली आणि आपल्या भावाला उ:शाप देण्याची विनंती केली. परंतु, कुंभकर्णाचे प्रताप पाहता, त्याला सहा महिन्यांनी एकदाच जाग येईल, असा ब्रह्मदेवांनी उ:शाप दिला. त्यानुसार सहा महिन्यांनी एकदा कुंभकर्णाला जाग येऊ लागली. तो एक दिवस कुंभकर्ण मौज मजेत, आनंद, विलास, मदिरापान, नृत्य गायन ऐकण्यात घालवित असे.

हनुमंत सीतेला नेण्यासाठी लंकेत आले, तेव्हा योगायोगाने कुंभकर्ण जागा होता. हनुमंताचे प्रताप, रामचंद्रांचे सामर्थ्य, सीतेचे अपहरण आणि रावणाचे दुष्कृत्य कळल्यावर कुंभकर्णानेदेखील रावणाला सीतेला परत देण्याचा सल्ला दिला होता. परंतु, रावणाने त्याचे ऐकले नाही. कुंभकर्ण सवयीप्रमाणे झोपून गेला. 

राम आणि रावणाचे घनघोर युद्ध सुरू झाले, तेव्हा रथी-महारथी रणांगणावर प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. युद्धात दोन्ही बाजूच्या वीरांना वीरमरण येत होते. आपल्याकडचे एक एक योद्धा कमी होत असल्याचे पाहून रावणाने कुंभकर्णाला उठवायचे ठरवले. 

कुंभकर्णाला उठवणे सोपे काम नव्हते. बलाढ्य शरीराच्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी सैनिक जवळ गेले असता, त्याच्या श्वासोच्छासाने उडून धारातिर्थी पडत असत. त्याचे घोरणे ऐकून सैनिकांना कानठळ्या बसत असत. राक्षसांनी कुंभकर्णाच्या अंगावरून हत्ती फिरवले. रणगाडे वाजवले. तोफा झाडल्या. तरी कुंभकर्णाला जाग येईना. 

अखेर कुंभकर्णाची झोपमोड झाली. तो खूप चिडला. रागाराागात रावणाची भेट घेतली. कुंभकर्णाने पुन्हा एकदा सीतेला परत पाठववण्याचा सल्ला दिला. परंतु, रावणाला तो सल्ला रूचला नाही. अखेर भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंभकर्ण युद्धभूमीवर उतरला. 

या विशाल देहाशी युद्ध करण्यासाठी प्रतिस्पर्धीदेखील तसाच हवा. म्हणून मारुतीररायाने महाकाय रूप धारण केले आणि कुंभकर्णाशी युद्ध केले. एका क्षणी तो धारातिर्थी पडला. त्याने प्रभू रामचंद्रांना शेवटचा नमस्कार केला. अशा रितीने कुंभकर्ण शापमुक्त आणि भवसागरातूनही मुक्त झाला. 

परंतु, आपल्यातला कुंभकर्ण अजुनही शिल्लक आहे. केवळ झोपाळू म्हणून नाही तर, जो कठीण प्रसंगातही अजगरासारखा सुस्त पडून आहे असा निद्रिस्त समाज कुंभकर्णाचेच प्रतीक आहे. मात्र, त्याला आता जागे करण्याची वेळ आली आहे. 

टॅग्स :ramayanरामायणInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी