श्री रामरक्षा हे स्तोत्र आहे आणि तोच मंत्रदेखील आहे. देवाधिदेव महादेव यांनी बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन हे स्तोत्र सांगितले आणि बुधकौशिक ऋषींनी जाग येताच ते सांगितले तसे लिहून काढले. महादेवाकडून हे प्रासादिक शब्द आल्यामुळे या स्तोत्राला मंत्राचे रूप प्राप्त झाले. यात प्रभू श्रीरामाचे, त्याच्या कार्याचे आणि चरित्राचे सुंदर वर्णन केले आहे. अध्यात्मिक दृष्ट्या या स्तोत्राला सर्वांग सुरक्षेचे कवच म्हटले आहे. तर संस्कृत भाषेच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर अनुष्टुप छंदात रचलेले हे काव्य, रोज म्हटले तर भाषाशुद्धी होते, उच्चार स्पष्ट होतात आणि आत्मविश्वास वाढतो. मात्र अनेकांना हे स्तोत्र संस्कृतात असल्याने अवघड वाटते. अशा लोकांनाही या स्तोत्राचा रसस्वाद घेता यावा, म्हणून पुण्याच्या अनिता करंदीकर यांनी श्री रामरक्षा स्तोत्राचे मराठी रूपांतर केले आहे. कोरोना काळात त्यांनी आपल्या मुलीसाठी ही रचना केली होती, या शब्दातून श्रीराम चरित्र उलगडत असल्याने लोकांची या कवनाला पसंती मिळाली. आपण कोणी भाषांतरकार किंवा संस्कृत जाणकार नाही तर केवळ उपासक आहोत, असे अनिता ताई नम्रपणे नमूद करतात. म्हणूनच की काय, या काव्यातही ती आत्मीयता उतरली आहे. त्यामुळे हे स्तोत्र आता मराठीतही आपल्याला म्हणता येईल. स्तोत्र रचना पुढीलप्रमाणे आहे-
श्री रामरक्षा स्तोत्र!!
श्रीरामरक्षा हे स्तोत्रज्यात असती अनेक मंत्रबुधकौशिकांनी रचिलेसीतारामास प्रार्थिले ।।१।।अनुष्टुप छंदात गायिले जे त्यांच्या हृदयीं स्फुरलेरक्षील राम आपुल्या भक्तास्त्रोताचे या पठण करता ।।२।।राम आणि शक्ती सीताया स्तोत्राची असे देवताराम हृदयीचे द्वार उघडतेहनुमंताची किल्ली फिरविता ।।३।।रामजपाचा ध्यास धरावाप्रभूचरणांच्या प्राप्ती करिताश्रीरामाचे ध्यान करावेचित्ती त्याचे रूप धरावे।।४।।अजानुबाहू जे सीतापतीधनुष्यबाण धरिले हातीपद्मासनी बद्ध असतीपितांबर परिधान करती ।।५।।नवकमलासम त्यांचे नयनप्रसन्न सुंदर ज्यांचे वदनवामांगी सीता प्रसन्नन्याहाळती तिज रामलोचन ।।६।।मेघवर्ण सतेज कांतीनाना भूषणे अंगी झळकतीजटा शोभती ज्याच्या शिरीअसा राम धरावा अंतरी ।।७।।चरित्र सुदंर रघुनाथचेशतकोटी श्लोकात गायिलेएकच अक्षर याचे धरिलेमहापातक नाश पाविले ।।८।।जानकी लक्ष्मणा सहितनीलकमल वर्ण श्यामतो जटा मुकुट मंडीतभजावा राजीव नेत्र राम ।।९।।खड्ग चाप बाण करीनिशाचरांचा नाश करीअजन्मा जन्मास आलाजगद् रक्षणा धरेवरी ।।१०।।रामरक्षा सूज्ञ पठतीपापे हरिती इच्छा पुरतीराघवाने शिर रक्षावेकपाळ रक्षो दाशरथी ।।११।।दृष्टी राखो कौसल्यात्मजविश्वामित्रप्रियाने श्रुतीयज्ञराक्षका रक्षी नासिकामुख रक्षी सौमित्र सखा ।।१२।।सकल विद्यानिधी रामरक्षा करी तो जिव्हा ममभरत वंदी ज्याचे चरणकंठाचे तो करील रक्षण ।।१३।।दिव्य आयुधे ज्याच्या करीखांद्यांचे मम रक्षण करीशिवधनुष्य भंगले ज्यानेमम बाहू रक्षावे त्याने ।।१४।।सीता पतीने कृपा करावीरक्षावे मम कर हे दोन्हीजिंकले जमदग्नींच्या सुतामाझे हृदय रक्षी आता ।।१५।।खर असुराचा केला भंगरक्षण करो मधले अंगजांबुवंता दिला आसरानाभी माझी रक्षण करा ।।१६।।सुग्रीवाचा असे ईश्वररक्षो माझी तो कंबरश्रीराम प्रभु हनुमंताचेरक्षण करोत मम जांघांचे ।।१७।।रघुकुलात जो असे उत्तमरक्षो मांड्या दोन्ही ममराक्षसकुलसंहारकराविनवितो जोडून करा ।।१८।।सेतू बांधला समुद्रावरीमम गुडघ्यांचे रक्षण करीदशमुखांतका हीच विनवणीरक्षा मम पोटऱ्या दोन्ही ।।१९।।बिभीषणासी वैभव दिलेरक्षण करी उभय पाऊलेसुखविसी तू सर्व जगालारक्षी मम या शरीरा सकला ।।२०।।स्तोत्र प्रभावी हे रामासमपुण्यात्मा जो करील पठणलाभे आयु सुख सपुतविजय आणि विनय खचित ।।२१।।त्रिलोकी करिती संचारदुष्ट अधम जे दुराचारपडत नाही त्यांची नजरनाम घेती जे वारंवार ।।२२।।राम म्हणा वा रामभद्रअथवा जपावा रामचंद्रत्या नरा ना लागे पापभोगी मोक्ष सुख आपोआप ।।२३।।राममंत्र जिंकी जगतनामे अभिमंत्रुन ताईतकंठी धारण करी जो नितसर्व सिद्धी त्या हस्तगत ।। २४।।ह्याचे नाम वज्रपंजरनित्य स्मरण करील जो नरहोईल त्याची आज्ञा पालनलाभेल विजय होई कल्याण ।।२५।।अशी रामरक्षा कथिलीशिवशंभोंने स्वप्नी येऊनीबुधकौशिक महाऋषींनीपहाटेस ठेविली लिहोनी।।२६।।श्रीराम बगीचा कल्पतरूनचा विनाश करी जो आपत्तींचाश्रीराम त्रैलोक्य मनोहरप्रभूचरणांवर आमुचे शीर।।२७।।सुंदर सुकुमार तरुणमहाबली जो कमलनायनवल्कले अन मृगाजीनकेली ज्याने परिधानकंद मूळ फळ भक्षितीब्रह्मचर्य तप आचारतीजितेंद्रिय हे दशरथनंदनश्रीराम लक्ष्मण भ्राते दोन ।। २८।।शरणागतांस देती अभयश्रेष्ठ धनुर्धर भ्राते उभयजे राघसकुल संहारकते असोत आमचे रक्षक ।।२९।।धनुष्य सज्ज बाण हातीअक्षय भाते जवळी असतीरक्षण करी लक्ष्मणा रामामार्ग सदैव दाखवा आम्हा ।।३०।।अंगी कवच हाती खड्ग चाप बाण धरूनी सिद्धलक्ष्मणासह करि जो गमनमनोरथ राम करो रक्षण ।।३१।।दाशरथी राम महाबली पुरुष पूर्ण ककुस्य कुळीरघूत्तम लक्ष्मणाचा भ्राता ज्याची कौसल्या असे माता ।।३२।।वेद जाणतो जो यज्ञनेशपुराणातील उत्तम पुरुषजानकी वल्लभ असे श्रीमानपराक्रमी जो रणी महान ।।३३।।महेश सांगती पार्वतीलाश्रद्धेने घेती जो नामाला अश्वमेधाहुनी अधिकपुण्य मिळे मम भक्ताला ।।३४।।दूर्वादलांसम सावळा रामकमलनय जो कटी पितांबरघेती त्याचे दिव्य नामभवसागर ते करतील पार ।३५।।लक्ष्मणाग्रज राम रघुवरसीता पती हा असे सुंदरब्राम्हण प्रिय अति धार्मिककाकुस्थगुण निधी दयासागर ।।३६।।राजस सत्यवचनी दशरथसुतसावळा शांत रघुनंदनरघुकुल तिलक देई आनंदरावणारीस असो वंदन।।३७।।राम आणि रामभद्रवेधस आणि रामचंद्ररघुनाथ सियावर नाथनमन तुज चरणा लाऊन हात।।३८।।श्रीराम राम रघुनंदन राम रामश्रीराम राम भरताग्रज राम रामश्रीराम राम रणवीर राम रामश्रीराम राम शरण तुज राम राम।।३९।।श्रीरामचंद्र चरण मनी स्मरावेश्रीरामचंद्र चरण वदनी वदावेश्रीरामचंद्र चरणी मस्तक टेकवावेश्रीरामचंद्र चरणासी शरण जावे।।४०।।माता राम मम पिता रामचंद्रस्वामी राम प्रिय सखा रामचंद्रसर्वस्व माझे दयाळू रामचंद्रतुजविणा न कुणा मी जाणतो रामचंद्र।।४१।।उजव्यास ज्याच्या शेषावतारवामांगी असे जानकी सुकुमारपुढे मारुती उभा जोडोनी कररघुनंदनाला असो नमस्कार।।४२।।लोकप्रिय राम रणात वीरराजीवनेत्र तो रघुवंश नाथकरुणाकर असे कारुण्यरूपत्यासी शरण मी जोडोनी हात।।४३।।मनोवेगी जो पवना समानजितेंद्रिय तो अति बुद्धिमानवायुतनय जो वानरवीरश्रीराम दूतासी आलो शरण।।४४।।कवीराज कोकीळ जणू बनूनराम राम हे अक्षर मधुरकवनरुपी शाखेसी गाई बसूनतया वाल्मिकींना माझे नमन।।४५।।हरण करी जो आपदादेई सर्व संपदासकल जनांच्या आनंदाश्रीराम नमन सदा ।।४६।।राम राम सदा गर्जाभाजून टाका भवबीजातुम्हास लाभे सुखसंपदावाटेल यमदूता भय सदा।।४७।।राम हा राजमणी सदा विजयी होतोरमापती रामास मी नित्य भजतोरामाने राक्षस वधले अनेकनमस्कार रामासी माझे कितीकरामाहुनी दुजा कुणी नाही थोररामाचा दास मी झुकवितो शीररामच्या ठायी चित्त निरंतरश्रीराम माझा करी रे उद्धार।।४८।।हे मनोरमे सदा जप राम रामसहस्रतुल्य हे एकच नामरामाचे नाम हे किती महानशिव सांगती पार्वती देई ध्यान ।४९।।बुधकौशिककांनी रचलेलेरामरक्षास्तोत्र पूर्ण झाले.
।। श्रीसीता रामचंद्रार्पणमस्तु ।।