शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

RathaSaptami 2024: रथस्प्तमीच्या आदल्या दिवशी का करतात गॅस शेगडीचे पूजन? जाणून घ्या शास्त्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 7:00 AM

Ratha Saptami 2024: यंदा १६ फेब्रुवारी रोजी रथ स्पतमी आहे, त्या तिथीवर चुलीची पुजा आदल्या दिवशी अर्थात १५ फेब्रुवारीला का करायची ते पाहू.

माघ शुक्ल सप्तमीला 'रथसप्तमी' असे विशेष नाव आहे. या दिवसाला धर्मकार्यात तसेच सूर्योपासनेत अतिशय महत्त्व आहे.' १६ फेब्रुवारी रोजी रथसप्तमी आहे. व्रतासाठी ही सप्तमी अरुणोदयव्यापिनी घ्यावी' असे धर्मधुरिणांनी लिहून ठेवले आहे.  या सप्तमीला आपल्याकडे रथसप्तमी असे नाव आहे. भारतात विविध प्रांतात ती जयंती सप्तमी, विधान सप्तमी, विशेष सप्तमी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. संपूर्ण वर्षातील सप्तम्यांपैकी या सप्तमीला विशेष महत्त्व असल्यामुळे तिला महासप्तमी म्हणून गौरवले गेले आहे. सूर्यापासक मंडळींमध्ये हे व्रत आवर्जून केले जाते. 

रथसप्तमी पूजेचा विधी 

व्रतकर्त्याने आदल्या दिवशी म्हणजे षष्ठीला एकभुक्त अर्थात एक वेळ जेवून राहावे. सप्तमीला पहाटेच शुचिर्भूत व्हावे. नंतर शक्य असेल त्या धातूचा दिवा लावावा. सूर्याचे ध्यान करून तो दिवा वाहत्या पाण्यात सोडावा. या विधीनंतर स्वत:च्या घराच्या अंगणात रक्तचंदनाचे गंध उगाळून त्या गंधाने सारथी अरुणासह सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढावे. त्या चित्राचे 'ध्येय: सदा सवितृमंडल मध्यवर्ती' या मंत्राने ध्यान करावे. नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी. शेणीच्या विस्तवावर मातीच्या पात्रात केलेल्या खिरीचा नैवेद्य सूर्यप्रतिमेला दाखवावा. शेवटी सात रुईची पाने, सात प्रकारचे धान्य, सात बोरे वाहून अष्टांग अर्घ्य द्यावे. ब्राह्मणभोजन घालावे. स्त्रिायांनी संध्याकाळी हळदीकुंकू समारंभ करावा. दुर्धर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झाले. 

कालानुरूप बदल 

आजच्या काळात हे व्रत करताना काही अडचणी येऊ शकतात. त्यावर मार्ग सुचवताना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर धर्मबोध या ग्रंथात माहिती देतात- सध्याच्या काळात प्रत्येकालाच जलाशयात स्नान करणे किंवा वाहत्या पाण्यात दिवा सोडणे शक्य नाही. अशावेळी बादलीतील पाण्यालाच आपण वास्तव्यास असलेल्या राज्यातील एखादी नदी समजून स्नान करावे. शुचिर्भूत झाल्यावर पाण्याने भरलेला नवीन टब किंवा परात गच्चीत नेऊन तिच्यामध्ये तेवता दिवा सोडावा. तसेच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर वा झाडाच्या बुंध्याशी ठेवून प्रज्वलित करावा. 

पूर्वी 'चूल' अस्तित्वात असताना गोवऱ्यांवर खीर शिजवणे शक्य होते.आता त्याला पर्याय म्हणून नित्य वापरातील गॅसची शेगडी आदल्या रात्री स्वच्छ धुऊनपुसून लख्ख करावी. सकाळी तिची पूजा करावी. नंतर त्यातल्या त्यात नव्या स्टीलच्या वा पितळेच्या भांड्यात ही खीर शिजवावी. ब्राह्मणाला किंवा परिचितांपैकी कोणालाही जेवणासाठी निमंत्रण द्यावे. कामाचा दिवस असल्यास डब्यातून खीर, पुऱ्या भाजी बरोबर घेऊन जाऊन आपल्या सहकाऱ्यांना प्रसाद म्हणून द्याव्यात. यापैकी काहीही करणे शक्य नसेल तर निदान बारा वाजण्यापूर्वी यथाशक्त गायत्री मंत्राचा जप, सूर्याचे ध्यान, नामस्मरण, अर्घ्य देणे सर्वांनाच शक्य आहे. खीर करून तिचा नैवेद्या मात्र जरूर दाखवावा. रथयात्रेला निघालेल्या सूर्यनारायणांचे गोड खिरीसह स्वागत करणे आपले कर्तव्यच आहे. हे कर्तव्यकर्म 'धर्म' म्हणून शक्य तेवढे केले पाहिजे.

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३