शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रावण गेला, पण कुंभकर्ण आजही जिवंत आहे; त्याला कोणी जिवंत ठेवला? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 12:15 PM

कुंभकर्ण हे रामायणातील पात्र असले तरी त्याचा सद्यस्थितीशी संबंध काय? सविस्तर वाचा!

झोपाळू माणसाला आपण कुंभकर्ण म्हणतो. तो मेला असला तरी आजही तो जिवंत आहे. आहे ना गंमत? त्यामागचा इतिहास मनोरंजक आहे. तो आधी जाणून घेऊ आणि नंतर तो जिवंत कसा आणि कुठे आहे तेही पाहू. 

कुंभकर्ण हा रावणाचा धाकटा भाऊ. तो जन्मत:च महाकाय होता. पर्वतासारख्या शरीराच्या कुंभकर्णाने जन्म होताच एक हजार राक्षसांना खाल्ले. इंद्र ऐरावतावर बसून याच्या अंगावर फिरला, त्याला वज्राने मारले तरी कुंभकर्णाला काही झाले नाही. उलट त्याने ऐरावताचा एक दात उपटला. तेव्हा इंद्र पळून गेला. आणि ब्रह्मदेवाला आपली रक्षा करण्याची विनंती केली. ब्रह्मदेव म्हणाले, `इंद्रदेवा, कुंभकर्णाचा उपद्रव वाढला आहे, त्याला शांत ठेवण्याचा पर्याय म्हणजे त्याला निद्राधीन करणे. त्याच्या दुष्कृत्याचे फळ म्हणून मी त्याला कायम झोपलेला राहशील, असा शाप देतो.'

रावणाला हे समजताच त्याने ब्रह्मदेवाची स्तुती केली आणि आपल्या भावाला उ:शाप देण्याची विनंती केली. परंतु, कुंभकर्णाचे प्रताप पाहता, त्याला सहा महिन्यांनी एकदाच जाग येईल, असा ब्रह्मदेवांनी उ:शाप दिला. त्यानुसार सहा महिन्यांनी एकदा कुंभकर्णाला जाग येऊ लागली. तो एक दिवस कुंभकर्ण मौज मजेत, आनंद, विलास, मदिरापान, नृत्य गायन ऐकण्यात घालवित असे.

हनुमंत सीतेला नेण्यासाठी लंकेत आले, तेव्हा योगायोगाने कुंभकर्ण जागा होता. हनुमंताचे प्रताप, रामचंद्रांचे सामर्थ्य, सीतेचे अपहरण आणि रावणाचे दुष्कृत्य कळल्यावर कुंभकर्णानेदेखील रावणाला सीतेला परत देण्याचा सल्ला दिला होता. परंतु, रावणाने त्याचे ऐकले नाही. कुंभकर्ण सवयीप्रमाणे झोपून गेला. 

राम आणि रावणाचे घनघोर युद्ध सुरू झाले, तेव्हा रथी-महारथी रणांगणावर प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. युद्धात दोन्ही बाजूच्या वीरांना वीरमरण येत होते. आपल्याकडचे एक एक योद्धा कमी होत असल्याचे पाहून रावणाने कुंभकर्णाला उठवायचे ठरवले. 

कुंभकर्णाला उठवणे सोपे काम नव्हते. बलाढ्य शरीराच्या कुंभकर्णाला उठवण्यासाठी सैनिक जवळ गेले असता, त्याच्या श्वासोच्छासाने उडून धारातिर्थी पडत असत. त्याचे घोरणे ऐकून सैनिकांना कानठळ्या बसत असत. राक्षसांनी कुंभकर्णाच्या अंगावरून हत्ती फिरवले. रणगाडे वाजवले. तोफा झाडल्या. तरी कुंभकर्णाला जाग येईना. 

अखेर कुंभकर्णाची झोपमोड झाली. तो खूप चिडला. रागाराागात रावणाची भेट घेतली. कुंभकर्णाने पुन्हा एकदा सीतेला परत पाठववण्याचा सल्ला दिला. परंतु, रावणाला तो सल्ला रूचला नाही. अखेर भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुंभकर्ण युद्धभूमीवर उतरला. 

या विशाल देहाशी युद्ध करण्यासाठी प्रतिस्पर्धीदेखील तसाच हवा. म्हणून मारुतीररायाने महाकाय रूप धारण केले आणि कुंभकर्णाशी युद्ध केले. एका क्षणी तो धारातिर्थी पडला. त्याने प्रभू रामचंद्रांना शेवटचा नमस्कार केला. अशा रितीने कुंभकर्ण शापमुक्त आणि भवसागरातूनही मुक्त झाला. परंतु, आपल्यातला कुंभकर्ण अजुनही जिवंत आहे. त्याला आपणच जिवंत ठेवला आहे. जो कठीण प्रसंगातही अजगरासारखा सुस्त पडून आहे. समाजात घडणारे अहित, अनैतिक उघड्या डोळ्यांनी पाहणारा व त्यात बदल व्हावे म्हणून काहीही कृती न करणारा समाज डोळे उघडे असूनही निद्रिस्त आहे असेच म्हटले पाहिजे. त्याला आता जागे करण्याची वेळ आली आहे अन्यथा भविष्य अंधारात असणार आहे!

टॅग्स :ramayanरामायण