पिंपळाचे वृक्ष सर्व वृक्षांमध्ये सर्वात पवित्र मानले गेले आहे. कारण हिंदुंच्या धार्मिक आस्थेनुसार स्वयं भगवान विष्णु पिंपळ वृक्षात निवास करतात. श्रीमद्भवद्गीता यामध्ये भगवान कृष्णाने म्हटले आहे, की वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे. स्कंध पुराणानुसार पिंपळाच्या मूळामध्ये विष्णू, तनामध्ये केशव, फांद्यांमध्ये नारायण, पानांमध्ये भगवान हरी आणि सर्व देवतांनी युक्त अच्युत भगवान सदैव निवास करतात.
वैज्ञानिक दृष्टीने पिंपळ पुजनीय आहे का?
हो! वैज्ञानिक दृष्ट्याही पिंपळाला अतिशय महत्त्व आहे. पिंपळ हा एकमेव असा वृक्ष आहे, जो चोविस तास प्राणवायू उत्सर्जित करतो. जो सर्व सजिवांसाठी लाभदायक ठरतो. प्रत्येक सजीव प्राणवायू शोषून घेतो आणि कार्बनडाय ऑक्साईड सोडतो. वैज्ञानिक शोधामध्ये हे तथ्य सिद्ध झाले आहे की ऑक्सिजन देण्याखेरिक पिंपळवृक्षामध्ये अन्य अनेक विशेषता आहे. जसे त्याची सावली थंडीमध्ये उष्णता देते आणि उन्हाळ्यात शितलता देते. शिवाय पिंपळाच्या पानांचा स्पर्श केल्याने वायुमध्ये असणारे संक्रमण किटाणु नष्ट होतात. आयुर्वेदानुसार त्याची साल, पाने, फळे इत्यादीमुळे अनेक प्रकारचे रोग नाशक औषध बनवतात. अशा प्रकारे वैज्ञानिक दृष्टीनेही पिंपळ वृक्ष पुजनीय आहे.