Tirupati Balaji Most Impactful Mantra: भारतात संस्कृती आणि परंपरा यांना अतिशय अनन्य साधारण असे महत्त्व आहे. देशभरात हजारो मंदिरांमध्ये दररोज न चुकता पूजा, आराधना, नामस्मरण केले जाते. लाखो भाविक नित्यनेमाने मंदिरात जाऊन दर्शन घेतात. आराध्य देवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे पुण्य लाभदायी मानले गेले आहे. दक्षिण भारतातील मंदिरे, मंदिरांचे स्थापत्य, कलाकुसर, कर्मठपणाने केले जाणारे पूजन, आरास यांची जगभरात चर्चा होत असते. असेच एक मंदिर म्हणजे तिरुपती बालाजी मंदिर.
तिरुमला तिरुपती बालाजी मंदिर हे जगातील सर्वांधिक श्रीमंत मंदिरांपैकी एक मानले जाते. वर्षाला कोट्यवधी भाविक तिरुपती बालाजीचे दर्शन घेतात. कोट्यवधी रुपये दान केले जातात. तसेच या ठिकाणी केस अर्पण करण्याची प्रथा आहे. तिरुपती बालाजीला भगवान विष्णूंचे एक रूप मानले जाते. यांना प्रसन्न केल्यानंतर देवी लक्ष्मीची कृपा आपोआप प्राप्त होते आणि आपल्या सर्व अडचणी दूर होतात. स्थानिक मान्यतेनुसार, येथे मंदिरात स्थापित काळ्या रंगाची दिव्य मूर्ती कोणीही तयार केली नसून ती स्वतः जमिनीतून प्रकट झाली होती. स्वतः प्रकट झाल्यामुळे या मूर्तीचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
तिरुपती बालाजीचा अत्यंत प्रभावी मंत्र
तिरुपती बालाजी देवतेचे महात्म्य आणि त्याबाबतच्या मान्यता प्रचलित आहे. तिरुपती बालाजीचा असा एक प्रभावी मंत्र असल्याचे सांगितले जाते. या मंत्राचा नियमितपणे, दररोज न चुकता जप केल्यास याचे अद्भूत, चमत्कारिक फायदे अनुभवता येतात, अशी भाविकांची श्रद्धा असल्याचे म्हटले जाते. हा मंत्र एक शुद्ध ध्वनी कंपन आहे, जो मनाला भ्रमापासून वाचवतो. या मंत्राचा सतत जप केल्याने हा मंत्र सकारात्मक ऊर्जा देतो. या मंत्राचा जप केल्यावर मन शांत होते आणि ध्यानस्थ होते. या मंत्राचे जप केल्याने मनाला आनंदाची अनुभूती होते, असे मानले जाते. हे मनाच्या भावना शुद्ध करते आणि शरीरात चैतन्य निर्माण करते, असे सांगितले जाते. या मंत्राने भीतीची भावना कमी होते. सर्जनशील प्रक्रिया वाढते. मनातून नैराश्य दूर होण्यास मदत होते. मन शांत होण्यास आणि चांगली झोप येण्यास मदत होते. हा मंत्र रोज ऐकल्याने आध्यात्मिक समृद्धीचा अनुभव येतो, अशी भाविकांची मान्यता असल्याचे सांगितले जाते.
ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमःश्रीमन नारायण नमो नमःतिरुमल तिरुपति नमो नमःजय बालाजी नमो नमः
ॐ श्री वेंकटेश्वराये नमो नमःश्रीमन नारायण नमो नमःतिरुमल तिरुपति नमो नमःजय बालाजी नमो नमः
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.