शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

कर्जमुक्ती, रोगमुक्ती, सुखी वैवाहिक जीवन, धनलाभ अशा विविध लाभांसाठी नियमित वाचा कुंजिका स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 7:50 AM

कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात, दिवसात पठण करता येते. दुर्गा देवीची आराधना, उपासना आणि सिद्धी मिळवण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्वाची आहे.

दुर्गा सप्तशती हा ग्रंथ अतिशय प्रासादिक आहे. दर नवरात्रीत या ग्रंथांचे भक्तिभावाने वाचन केले जाते. या ग्रंथांतील प्रत्येक श्लोक, मंत्र अत्यंत फलदायी आहे. केवळ देवीच्या ठायी निस्सीम भक्तिभाव असायला हवा. संपूर्ण ग्रंथाचे पारायण शक्य नसेल, तर त्यातले कुंजिका स्तोत्र म्हणावे. असे म्हणतात, की जे संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करू शकत नाहीत, ते केवळ कुंजिका स्तोत्र पठण करतील, तरीही त्यांना दुर्गा सप्तशती वाचल्याचे फळ मिळते . आयुष्यातील कोणत्याही प्रकारचे रोग,  संकटे, दु:ख, रोगराई व शत्रूंचा नाश करणारे सिद्ध कुंजिका स्तोत्र नवरात्रात तर वाचलेच पाहिजे. शिवाय अन्य दिवशीही या स्तोत्र पठणाचा संकल्प सोडता येतो. याबाबत संजय कुलकर्णी लिहितात-

'कुंजिका स्तोत्र कोणत्याही महिन्यात, दिवसात  पठण करता येते. परंतु ते नवरात्रात अधिक प्रभावी ठरते. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते नवमीपर्यंत हे दररोज पठण केले जाते. साधकाने  सकाळी स्नानविधी करून, मग सोयीनुसार योग्य आसन धारण करून देवी दुर्गाची मूर्ती किंवा फोटो फ्रेमसमोर बसून प्रथम साधी पूजा करावी. आपल्या सोयीनुसार तेल किंवा तुपाचा दिवा लावावा आणि देवीला नैवेद्य अर्पण करावा. यानंतर अक्षता,पुष्प, एक रुपयाचा नाणे तुमच्या उजव्या हातात ठेवावे आणि नवरात्रातील नऊ दिवस संयम-नियमाने कुंजिका स्तोत्र पाठ करण्याचा संकल्प करावा. नंतर जमिनीवर पळीने पाणी  सोडून पठण सुरू करावे. हा संकल्प पहिल्या दिवशी एकदाच करावा यानंतर, दररोज हा पाठ आपल्या सोयीनुसार वाचावा.

कुंजिका स्तोत्रांचे फायदे

धनलाभासाठी : ज्यांना नेहमी पैशाची कमतरता असते. सतत आर्थिक नुकसान होत आहे.  अनावश्यकपणे पैसे खर्च करणार्‍याना कुंजिका स्तोत्रांच्या वाचनाचा फायदा मिळतो. संपत्ती मिळवण्याचे नवे मार्ग खुले होतात.  पैशाचा संग्रह वाढतो.शत्रुमुक्ती : हे स्तोत्र शत्रूंपासून मुक्ती मिळविण्यासाठी आणि केसेस जिंकण्यासाठी चमत्कारासारखे कार्य करते. नवरात्रात आणि नवरात्रानंतरही नियमितपणे पठण केले तरी शत्रू जीवनात व्यत्यय आणत नाहीत. कोर्ट कचेरी,  खटले जिंकले जाऊ शकतात.रोग मुक्तता: दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ  जीवनातील रोगाचा समूळ नाश करतो.  कुंजिका स्तोत्रांच्या केवळ पठणाने गंभीर असलेल्या आजारांपासून तर मुक्ती मिळतेच आणि  रोगांवरील होणाऱ्या खर्चापासूनही तुम्ही मुक्तता मिळवू शकता.कर्जमुक्ती : जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर  कर्ज घेणे हे चक्रच जाणू चालू असेल आणि त्याला  छोट्या छोट्या गरजा भागवण्यासाठी ही कर्ज घ्यावयास लागत असल्यास, कुंजिका स्तोत्रांचे नियमित पठण त्याने केल्यास कर्ज मुक्ती लवकरच होईल.सुखद वैवाहिक जीवन : विवाहित जीवनात  नियमित सुख कायम राहण्यास कुंजिका स्तोत्रांचे नियमित पठण केले पाहिजे. एखाद्यावर आकर्षणाचा प्रभाव वाढविण्यासाठी देखील हे स्तोत्र पठण केले जाते.

खालील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. 

दुर्गा देवीची आराधना, उपासना आणि सिद्धी करण्यासाठी मनाची पवित्रता यासाठी खूप महत्वाची आहे. नवरात्रीसाधना दरम्यान इंद्रिय संयम ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. वाईट कृत्ये आणि वाईट भाषा वापरू नका. यामुळे उलटे फळही मिळू  शकते. कुंजिका स्तोत्र वाईट इच्छा,एखाद्याच्या नाशासाठी, एखाद्या वाईट कामानेसाठी हा जप आणि पठण करू नये. याचा उलट परिणाम वाचकांवर होऊ शकतो. संकल्प केल्यास या वेळी मांस किंवा मद्यपान करू नका. 

श्री दुर्गा सप्तशती पैकी हा असाच एक पाठ आहे , ज्याद्वारे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.  हा पाठ घेतल्यानंतर आपल्याला इतर कोणत्याही पाठाची आवश्यकता नाही. या अध्यायात श्री दुर्गा सप्तशतीचा समावेश आहे. जर वेळ कमी असेल तर आपण श्रीदुर्ग सप्तशतीच्या संपूर्ण मजकुराप्रमाणेच ते पठण करून पुण्य मिळवू शकता.नावानुसार ती सिद्ध कुंजिका आहे. जेव्हा एखाद्या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही, समस्या सोडविली जात नाही, तेव्हा सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचा. भगवती तुमचे  रक्षण करील.

सिद्ध कुंजिका स्तोत्रांचा महिमाभगवान शंकर म्हणतात की, सिद्धकुंजिका स्तोत्र पठण करण्यासाठी देवी कवच, अर्गाला, कीलक, रहस्य, सूक्त, ध्यान, न्यास  आणि अर्चनेची देखील आवश्यकता नाही,  केवळ कुंजिका पठण केल्याने दुर्गा पाठाचे फळ प्राप्त होते.

या स्तोत्राचे पठण पुढीलप्रमाणे करावे. 

  • ज्ञान मिळविण्यासाठी पाच पाठ वाचना पूर्वी (अक्षता घ्या आणि पुस्तकांमध्ये ठेवा)
  • यश-कीर्तीसाठी पाच पाठ (देवीला अर्पण केलेली लाल फुले पाठानंतर घ्या आणि त्यांना सेफ मध्ये  ठेवा.)
  • संपत्ती मिळवण्यासाठी नऊ पाठ (पांढर्‍या तिळाने संकल्पित करा )
  • घराच्या सुख  आणि शांतीसाठी तीन पाठ  (देवीला गोड पान अर्पण करा)
  • आरोग्यासाठी तीन पाठ  (दर  रोज  पठण केल्यास काही दिवसांनी आराम मिळेल)
  • शत्रूपासून रक्षण करण्यासाठी ३,७ किंवा ११ पाठ  (सतत पठण केल्यास आराम मिळेल)
  • रोजगारासाठी ३,५,७ आणि ११ (पर्यायी) (एक सुपारी देवी अर्पित करून मग आपल्याकडे ठेवा)