'घर दोघांचे' म्हटल्यावर जबाबदारीही दोघांनी घ्यायला हवी. ही साधी सोपी बाब लक्षात न घेतल्याने सद्यस्थितीत कुटुंब व्यवस्था कोलमडताना दिसत आहे. लोक विवाह समुपदेशकांची भेट घेऊन काडीमोड थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ही वेळ येऊ देण्याआधीच आपण कथा-कवितांमधून बोध घेत स्वतःचे विचार बदलले तर किती बरं होईल ना? त्यासाठी आपल्याला थोडेसे बालपणात डोकवावे लागेल.
बालपणी आपण इसापनीतीच्या गोष्टी वाचल्या. बडबडगीतं म्हटली. पण त्यातून शिकलो काय? तर काहीच नाही! त्याचा गर्भितार्थ घेता आला असता तर काडीमोड होण्याची वेळ आली नसती. एवढा काय दडलंय त्यात? आज जागतिक चिमणी दिनानित्त अशाच एका बडबडगीतातून सुखी संसाराचा मंत्र शिकून घेऊया. पाहू या ते भावगीत -
चिव चिव चिमणे, अग ए चिमणे काय रे चिमण्या हा बघ आणलाय मोत्याचा दाणा बघू बघू बघू, आहा... छान आहे बाई, पण ठेवायचा कुठे?ठेवायचा कुठे? त्यात काय मोठे? बांधूया घरटे!हाsss! झाडाच्या फांदीवर, बांधूया छोटे घर, चला चला लवकर, काम करू भरभर!मी आणते कापूस, मी आणतो काड्या मी आणते गवत मी आणतो दोरा आतमध्ये छानदार कापूस मऊ कडेनी गवत पसरून देऊ गवताच्या कडेनं काड्या ठेऊ सगळी कडेनं दोऱ्यानं शिवू आतमध्ये छानदार पिलांना ठेवू पिले काय करतीलचाऱ्याशी खेळतील दाणा खातीलपाणी पितील गवताच्या गादीत कापसाच्या उशीत चिमुकली पिले राहतील खुशीत
थोडक्यात जबाबदारीचं वाटप करून घेणं हेच सुखी संसाराचं गुपित आहे. चिमण्या जीवांना जर हे कळत असेल आपल्याला का बरं कळू नये?