शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

शत्रूपासून सावध राहताना या चार गोष्टी लक्षात ठेवा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: February 03, 2021 5:17 PM

दर वेळी नवीन चूक करा, पण आधी घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती अजिबात नको!

कोणावरही विश्वास ठेवावा अशी परिस्थिती राहिलेली नाही. लोक तर म्हणतात, आपल्या सावलीवरही विश्वास ठेवू नका, कारण अंधारात तीसुद्धा आपली साथ सोडते, मग आपले म्हणवणाऱ्या लोकांची काय कथा! मात्र, वेळप्रसंगी आपण छोट्या पण महत्वाच्या गोष्टी विसरतो आणि घडलेल्या चुका वारंवार करतो. या चुका घडू नयेत म्हणून एका छोट्याशा चिमणीने राजाला अद्दल शिकवली. 

एका माळ्याने लावलेल्या बागेत एक चिमणी येऊन रोज नासधूस करत होती. त्याने खूप प्रयत्न केले, परंतु तो चिमणीवर नियंत्रण आणू शकला नाही. त्याने कंटाळून राजासमोर आपली व्यथा मांडली. प्रजेचे हित लक्षात घेता, राजाने माळ्याचे दु:खं दूर करण्यासाठी आपले सैनिक पाठवले. सैनिक बागेवर लक्ष ठेवू लागले. परंतु चिमणी त्यांच्या डोळ्यादेखत बागेचे नुकसान करत असलेले पाहून सैनिकांनी तलवारी उपसल्या. परंतु, त्यांच्या वारातून निसटत इवलीशी चिमणी निघून गेली. असे सलग चार पाच दिवस झाल्यावर चिमणी आपल्या तावडीत येत नसल्याचे सैनिकांनी राजाला सांगितले. शेवटी राजा बागेत पोहोचला. भल्या मोठ्या शत्रूंना खडे चारणारा योद्धा अशी ओळख असलेला राजा तलवार घेऊन एका बगिचात काय करतोय, हे बघायला गावकऱ्यांची गर्दी जमली. 

चिमणी रोजच्या वेळेत आली. या झाडावरून त्या झाडावर भिरभिरू लागली. राजाने तिला एक दोनदा तलवारीचा धाक दाखवला, पण ती बधली नाही. उलट जास्तच त्रास देऊ लागली. राजा रागारागाने तिच्या दिशेने धावला आणि साधारण तासभराच्या झटापटीनंतर चिमणी राजाच्या तावडीत सापडली. चिमणी घाबरली. माळी आनंदून गेला. सैनिकांचाही जीव भांड्यात पडला. राजा त्या चिमणीला मारणार, इतक्यात चिमणीने राजाकडे हात जोडत विनवणी केली. माफी मागितली आणि म्हणाली, `हे राजा, आज माझा मृत्यू निश्चित आहे याची मला कल्पना आहे. परंतु मृत्यूआधी मला तुम्हाला चार गोष्टी सांगाव्याशा वाटत आहेत. त्या कृपया ऐकून घ्या. कारण त्यात तुमचाच फायदा आहे.'

चिमणीने आधीच एवढा हैदोस घालून झाला होता, की ती आणखी क्षणभरही राजाला नजरेसमोर नको होती. तरीदेखील मृत्यूआधी प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली जाते. या न्यायाने चिमणीला मुठीत धरून राजा तिला म्हणाला, `जे सांगायचे आहे ते पटकन सांग!'

राजाचा राग पाहून भेदरलेली चिमणी सांगू लागली, `राजा, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शत्रूला कधीच हातातून निसटू देऊ नकोस. दुसरी गोष्ट असंभव गोष्टींवर विश्वास ठेवू नकोस. तिसरी गोष्ट भूतकाळाबद्दल कधीच मनात खंत बाळगू नकोस आणि चौथी गोष्ट म्हणजे...''ऐकतोय, पटकन सांग...चौथी गोष्ट कोणती?' राजा ओरडतच म्हणाला.

चिमणी म्हणाली, `राजा तू माझी मान एवढी आवटळून धरली आहेस की मला शब्दही फुटत नाहीयेत. तुझी पकड थोडीशी सैल कर, चौथी गोष्टही सांगते.'चौथी गोष्ट ऐकण्याच्या नादात राजाने मूठ सैल केली, तशी चिमणी भुर्रकन उडून झाडावर गेली आणि म्हणाली, 'कधीच कोणावर विश्वास ठेवू नकोस.'इवलुशी चिमणी डोळ्यादेखत उडून गेली पण आयुष्याचा मोठा पाठ शिकवून गेली. राजाने आपली तलवान म्यान केली आणि चिमणीला गुरुस्थानी मानून वंदन केले. चिमणीने पुन्हा कधी बागेची नासधूस करणार नाही असा शब्द दिला व राजाने माळ्याला नुकसान भरपाई देऊन त्याचा बगिचा पुनश्च फुलवला. 

आपल्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्याला चिमणीप्रमाणे शिकवण देत असतात, परंतु आपणच प्रसंगाकडे डोळेझाक करतो आणि चुकांची पुनरावृत्ती करत राहतो. म्हणून पुढच्या वेळेस चिमणीने सांगितलेल्या चार गोष्टी लक्षात ठेवा आणि दर वेळी नवीन चूक करा, पण आधी घडलेल्या चुकांची पुनरावृत्ती अजिबात नको!