शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
5
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
6
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
7
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
8
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
9
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
10
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
11
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
12
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
13
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
14
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
15
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
16
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
17
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
18
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
19
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू
20
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत

ज्ञानेश्वरांची परंपरा, स्वामींची कृपा, नाथपंथाची दीक्षा; संजीवनी गाथा रचणारे स्वामी स्वरुपानंद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 1:51 PM

Remembrance Of Swami Swaroopanand Pawas: सर्व भक्तांसाठी स्वामींनी प्रतिज्ञापत्र करुन ठेवले आहे, असे म्हटले जाते. पावसचे स्वामी स्वरुपानंदांची पुण्यतिथी आहे. त्यांचे स्मरण करून समग्र चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा...

Remembrance Of Swami Swaroopanand Pawas: श्रावण महिना सुरू आहे. काही दिवसांनी श्रावण महिन्याची सांगता होत आहे. महाराष्ट्रात अनेक संत-महंत, थोर पुरुष, दैवी परंपरा असणारे सत्पुरुष होऊन गेले. यापैकीच एक म्हणजे पावसचे स्वामी स्वरुपानंद. श्रावण कृष्ण द्वादशीला स्वामींची पुण्यतिथी असते. यंदा २०२४ मध्ये ३० ऑगस्ट रोजी स्वरुपानंदांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे स्मरण करून समग्र चरित्राचा घेतलेला थोडक्यात आढावा...

स्वामींचे खरे नाव रामचंद्र विष्णू गोडबोले होते. परंतु ते आप्पा किंवा रामभाऊ  या नावाने लोकप्रिय होते. स्वामींचा जन्म १५ डिसेंबर १९०३ रोजी पावस येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विष्णूपंत गोडबोले आणि आईचे नाव रखमाबाई गोडबोले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. सन १९१९ मध्ये ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत दाखल झाले. त्यानंतर पुण्याच्या टिळक महाविद्यालयात वाङ्‌मयविशारद पदवी प्राप्त केली. कालांतराने महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी पावसमध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले. राष्ट्रोद्धारासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज ओळखून स्वरूपानंद यांनी स्वावलंबनाश्रम नावाची शाळा सुरू केली. त्यातून तरुणांना विविध प्रकारचे स्वावलंबासाठी उपयुक्‍त असे शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र, अशातच स्वामींना विरक्ती निर्माण झाली अन् सद्गुरू कृपेची ओढ, आस लागली. 

बाबा महाराजांचा अनुग्रह अन् स्वरुपानंद नामकरण

सद्गुरू कृपेची लागलेली ओढ पाहून मामा केशवराव गोखले यांनी रामभाऊंना पुणे येथील श्री गणेशनाथ तथा बाबामहाराज वैद्य यांच्याकडे नेले. सन १९२३ मध्ये त्यांनी बाबा महाराजांचा अनुग्रह घेतला व त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली. बाबा महाराजांनी अनुग्रहानंतर रामचंद्र यांचे नामकरण स्वरूपानंद असे केले. अनुग्रहानंतर स्वामींनी संपूर्ण ज्ञानेश्‍वरी स्वहस्ते लिहून गुरूंना अर्पण केली. संस्कृत गीतेतील मूळ ७०० श्‍लोकांवर ज्ञानेश्‍वरांनी प्राकृतमध्ये ९ हजार ओव्यांची ज्ञानेश्‍वरी लिहिली आणि स्वामी स्वरुपानंदांनी सोपेपणाने २० हजार ओव्यामध्ये अभंग ज्ञानेश्‍वरी रचली.

स्वामी समर्थ महाराजांची कृपा अन् संजीवनी गाथा रचना

स्वामी स्वरूपानंद हे भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या परंपरेतील सत्पुरुष होते. तसेच स्वामी स्वरुपानंदांवर  राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचीही कृपा होती. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी या भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींच्या ग्रंथांचा सुलभ अभंगानुवाद केलेला स्वामी स्वरुपानंदांनी केलेला असून, त्यांचे ते सर्व ग्रंथ खूप लोकप्रिय झाले. अत्यंत मार्मिक व सुरेख अशा अभंगरचना 'संजीवनी गाथा' नावाने प्रसिद्ध झालेल्या आहेत. तरुणपणी पुण्यात विद्याभ्यास करीत असताना त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात हिरीरीने भाग घेतलेला होता. परंतु भगवंतांच्याच प्रेरणेने पुढे ते सर्व सोडून रत्नागिरी जवळ पावस येथे येऊन राहिले. येथेच त्यांचे सलग चाळीस वर्षे वास्तव्य होते.

स्वामी म्हणे माझा नाथसंप्रदाय । अवघे हरिमय योगबळे ॥

स्वामी स्वरूपानंदांच्या रचना खूप सुंदर आहेत. त्यांच्या सर्व अभंगांमधून त्यांचे उत्कट सद्गुरुप्रेम प्रकर्षाने जाणवते. "स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन ।सद्गुरुचरण उपासितां ॥" असा आपला स्वानुभव ते मांडतात. आपल्या नाथ सांप्रदायिक साधनेचे माहात्म्य सांगताना ते म्हणतात, "स्वामी म्हणे माझा नाथसंप्रदाय । अवघे हरिमय योगबळे ॥" त्यांची 'संजीवनी गाथा' साधकांसाठी खरेखरी 'संजीवनी'च आहे, असे म्हटले जाते. श्रीस्वामींनी श्रावण कृष्ण द्वादशीला म्हणजेच १५ ऑगस्ट १९७४ रोजी पावस येथे देह ठेवला. पावस येथील स्वामी स्वरूपानंद यांच्या मंदिराच्या सुंदर परिसरात, ध्यानगुंफा (चिंतन कक्ष) आणि एमिलियाचे झाड आहे. स्वामींचे घर असलेले अनंत निवास हे मंदिर ट्रस्टने उत्तम राखले आहे. मंदिर विश्वस्त, स्वामींचे जन्मदिवस, गुरुपौर्णिमा इत्यादी अनेक उत्सव साजरे करतात. केवळ रत्‍नागिरीतीलच नव्हे तर भारतातील सर्व भागातील अनेक अनुयायी स्वामींच्या शिकवणींवर विश्वास ठेवतात.

मी राम, मी कृष्ण, मी साईबाबा, अक्कलकोटचे महाराज मी

देह ठेवण्यापूर्वी तीन दिवस स्वामी समाधी अवस्थेत होते. तत्पूर्वी स्वामींची वहिनी, पुतणे, देसाई परिवार, सत्यदेव सरस्वती, माधवनाथ भेटीला आले. स्वामीभक्तांची रिघ लागली. देसाईकुटुंबात ज्यांना अनुग्रह दिला नव्हता, त्या साऱ्यांना परंपरा देऊन सोऽहंम प्रतिक्रिया सांगावी, असे स्वामींनी सांगितले. मी राम, मी कृष्ण, साईबाबा तो मी, अक्कलकोटचे महाराज ते मीच जे कृष्णमुर्ती तो, मी असे स्वामी म्हणाले. संत दिसती वेगळाले परि स्वरुपी एकची जाहले, याची प्रचिती या शब्दांवरुन येते. सर्व भक्तांसाठी स्वामींनी प्रतिज्ञापत्र करुन ठेवले आहे.

हे प्रतिज्ञोत्तर माझे । उघड ऐका अहो, आजकालचे नव्हेच आम्ही ।। माऊलीनेच आम्हाला इथं पाठवलं । दिलं काम तिच्याच कृपेने पुरं झालं । आता आम्हाला नाही कुठं जायचं । इथंच आनंदात रहायंच ।। आणि माऊलीनंच अन्यत्र पाठवलं । आणि तिथं अवतीर्ण व्हावं लागलं । तरी आता चैतन्य स्वरुपात इथं आमचं अखंड वास्तव्य आहेच 

हरि ॐ तत् सत्  

टॅग्स :Swami Swarupanand Mandir Pawasस्वामी स्वरूपानंद मंदिर पावसshree swami samarthश्री स्वामी समर्थsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरShravan Specialश्रावण स्पेशलchaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक