शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

Rituals: महिलांचा मासिक धर्म सुरु असताना जोडप्याने एकत्र राहू नये असे शास्त्र सांगते; पण का? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 3:59 PM

Rituals: हिंदू धर्म शास्त्रात अनेक बारकाव्यांचा सखोल विचार केला आहे. सांसारिक दृष्ट्या या महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल काय भाष्य केले आहे ते जाणून घेऊ. 

>> सागर सुहास दाबके

कुठेही स्त्री पुरुष लैंगिक संबंधांचा विषय निघाला की त्याबद्दल खरंतर गांभिर्याने बोलायला हवं, नीट अभ्यास असायला हवा, पण नेहमी असे दिसते, की हा विषय निघाला कि थट्टा करायची अतोनात हुक्की येते लोकांना।

एका ठिकाणी गर्भाधान संस्कार होता. सकाळी संस्कार झाला आणि संध्याकाळी त्या यजमानाचेच मित्र गप्पा मारताना म्हणाले, ''आज सकाळीच गर्भाधान झालंय, आज रात्री बेत लावेल गडी, आज काय तो गप्पा मारायला येत नाही'', असे म्हणून हसले आणि एकमेकांना टाळ्या दिल्या. हे सगळं त्यातील एकाची पत्नी ऐकत होती, त्यांचं नुकतंच लग्न झालेलं, ती नंतर म्हणाली, ''ही अशी आपल्या वैयक्तिक गोष्टींची थट्टा होणार असेल तर मला नाही करायचे कुठले संस्कार!"

अशाप्रकारच्या शेरेबाजीमुळे चांगल्या गोष्टी बाजूला राहतात आणि नको त्या गोष्टींबद्दल मनात अढी निर्माण होते. त्याला जबाबदार आपण ठरतो. म्हणून अशा गोष्टींची थट्टा टाळावी, एवढेच नाही तर या संदर्भात कोणाला माहिती हवी असल्यास योग्य तोच सल्ला द्यावा अन्यथा एखाद्याचे सांसारिक जीवन उध्वस्त होऊ शकते. असेच आणखी एक उदाहरण बघा. 

सगळे म्हणतात कि, "संबंध कसे ठेवायचे हे कोणाला शिकवायला लागत नाही, लग्न झालं की ते आपोआप येतं! प्राण्यांना कोण शिकवतं?" हा समज मोडून काढायला हवा, नीट मार्गदर्शन घेतल्याशिवाय प्रजोत्पादनाचा उद्योग करू नये. आणि पतिपत्नी दोघांना सुखप्राप्ती होण्यासाठी योग्य मार्गदर्शन आवश्यक आहेच. 

एकदा एकजण हनिमूनला गेलेला, तिथे गेल्यावर नेमकी त्याची पत्नी बाजूला झाली, म्हणजे तिला पाळी आली. उत्कंठा वाढल्यामुळे संप्रेरकांचे संतुलन बिघडून असे होऊ शकते. दोघेही नवखे असल्याने तो गोंधळून गेला,  त्याने मोठ्या विश्वासाने त्याच्या ओळखीच्या एका जुन्या जाणत्या व्यक्तीला फोन केला, की असं असं झालंय, तर आता काय करू?

त्यावर तो जुना जाणता माणूस हसला आणि म्हणाला, "अरे वा, आता तर अजून मजा येईल, पाळीत स्त्री पण तापलेली असते आणि लुब्रिकंट पण मिळतं " असे एकदम हिणकस आणि खालच्या पातळीचे उद्गार ऐकून तो खिन्न झाला!

ही गोष्ट खरी, की पाळी चालू असताना स्त्रीमध्ये कामभावना वाढलेली असते कारण शरीरसंबंध हा बऱ्याचदा 'पेन किलर' चे काम करतो आणि स्त्री शरीर अत्यंत पीडेत असल्याने त्यातून सुटका होण्यासाठी शरीरसंबंधांची सहज भावना उत्पन्न होते. पण यात मोठी हानी अशी आहे की या काळात संबंध आले तर बऱ्याचदा पाळी थांबते किंवा स्राव होण्याचे प्रमाण कमी होते, अथवा पाळी यायची वेळ जवळ आल्ये आणि त्यात संबंध आले तर पाळी लांबते सुद्धा!

म्हणून आपल्या धर्मशास्त्रात पतीने आपल्या रजस्वला स्त्रीचे मुखदर्शन सुद्धा घेऊ नये असे सांगितले आहे. कारण निर्धारापेक्षा इंद्रिये बलवान असतात हे पूर्वसुरींना माहीत होते. त्यामुळे, 'हे काय नेहमीचंच आहे, यात काय शिकवायचं? इतकी युगानुयुगे प्रजा वाढली ती काय लैंगिक शिक्षण घेऊन?' या भूमिकेचा त्याग करायला हवा! स्त्रीपुरुष संबंधांना थट्टा मस्करी म्हणून न बघता खेळीमेळीने आणि त्याच वेळेस गांभीर्याने हाताळले पाहिजे. 

टॅग्स :Menstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्यSexual Healthलैंगिक आरोग्य