सनातन धर्मात अशा अनेक महान गोष्टी आहेत, ज्यांच्या मागे खोल वैज्ञानिक आणि अध्यात्मिक कारणे दडलेली आहेत, परंतु त्यांचा खरा अर्थ आपल्याला अनेकदा माहीत नसतो किंवा आपण तो जाणून घेण्यात कमी पडतो. अशीच एक परंपरा आहे की जेवण सुरू करण्यापूर्वी ओंजळीत थोडेसे पाणी घेऊन ताटाभोवती पाणी फिरवले जाते. असे करण्यामागील कारणे आणि फायदे तुम्हाला माहीत आहेत का? आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देऊ.
खूप जुनी परंपरा
जेवण सुरू करण्यापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवण्याची आणि श्लोक म्हणून ईशस्मरण करण्याची परंपरा जुनी आहे. उत्तर भारतात त्याला आमचन आणि पानाच्या बाहेर जी चार शीतं ठेवली जातात त्याला चित्रा आहुती म्हणतात. त्याच वेळी, तामिळनाडूमध्ये या परंपरेला परिसेशनम म्हणतात. आजही ही अनेक जण ही परंपरा पुढे चालवताना आपण पाहतो. त्यांच्याकडून या परंपरेची माहिती घेऊन आपणही ती पुढे नेली पाहिजे.
अन्नदेवतेचाआदर
शास्त्रानुसार ताटाभोवती पाणी फिरवणे आणि जेवण सुरू करण्यापूर्वी नामजप करणे हे दर्शविते की आपण अन्नदेवतेचा आदर करत आहात. असे केल्याने माता अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि आशीर्वाद देते. जे लोक या परंपरेचे नियमित पालन करतात, त्यांचे स्वयंपाकघर नेहमी अन्न धान्याने भरलेले राहते.
कीटक दूर होतात
या परंपरेला शास्त्रीय कारणंही आहे. खरे तर पूर्वीचे लोक जमिनीवर बसून जेवत असत. अशा स्थितीत अन्नाच्या आकर्षणाने ताटाजवळ छोटे किडे-किडे यायचे. ताटाभोवती पाणी फिरवल्यामुळे ते अन्नात प्रवेश करू शकत नव्हते. सोबतच ताटाभोवती असलेली धूळ आणि मातीही जागी बसत असे.
आताच्या काळात काय उपयोग?
आता टेबल खुर्ची पद्धत आली, मग या प्रथेची काय गरज असे आपल्याला वाटू शकेल. पण हा एक संयम ठेवण्याचाही संस्कार आहे. अन्न समोर येताक्षणी हातातोंडाची गाठ पडू न देता. काही क्षण थांबावे, देवाचे स्मरण करावे. ताटाभोवती पाणी फिरवावे. या प्रथेमुळे पूर्वी अन्नातून विषप्रयोग तर झाला नाही ना, हे कळायला सुद्धा मदत होत असे. जेवण्याआधी ताटाभोवती पाणी फिरवून काही शीतं ताटाच्या बाजूला काढून ठेवली जात असत. प्रार्थना होईस्तोवर कीटकांनी ते अन्न खाल्लेले दिसल्यास ते अन्न सुरक्षित आहे, अशीही चाचपणी केली जात असे. सद्यस्थितीत आपल्यालाही हितशत्रूंची कमतरता नाही. ते पाहता आपणही या प्रथेचे अनुसरण केले तर जीवाचे रक्षण होईल आणि प्रथेचे पालनही!