शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Safala Ekadashi 2022: देव दाखवण्याची गोष्ट नाही, तर अनुभवण्याची आहे; वाचा गौर गोपाल दास यांची प्रासादिक कथा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 1:01 PM

Safala Ekadashi 2022: चमत्कार पाहिला तर आपण नमस्कार करतो, पण त्यासाठी देवाच्या ठायी पूर्ण शरणागती पत्करावी लागते!

'देवाक काळजी' असे आपण सहज बोलून जातो. परंतु आयुष्याच्या अनेक टप्प्यावर आपल्याला दिव्यत्त्वाची प्रचिती येते. फक्त आपण त्याकडे सजगतेने पाहत नाही. १९ डिसेंबर अर्थात सोमवारी सफला एकादशी आहे. त्यानिमित्त वाचा गौरांग गोपाल दास यांनी सांगितलेला एक दृष्टांत!

एके ठिकाणी, विष्णुसहस्रनामाचे पारायण सुरू होते. अनेक लोक नित्यपारायणाला येत आणि भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन जात असत. असेच एके दिवशी, पारायण झाले आणि भंडाऱ्याला सुरुवात झाली. सगळे भाविक शिस्तबद्धपणे एका रांगेत उभे होते.  सेवक प्रसाद वाढण्यासाठी उभे राहिले. तेवढ्यात एक फाटक्या   वेषातील व्यक्ती, हातात भले मोठे पात्र घेऊन पुढे आली आणि प्रसाद मिळवण्यासाठी धडपड करू लागली. सेवकांनी तिला रांगेने यायला सांगितले. परंतु, ती व्यक्ती अरेरावी करू लागली आणि चर्चेचे पर्यवसान वाद-विवादात झाले. 

सेवक त्या व्यक्तीला श्रीपाद रामानुज स्वामी यांच्याकडे घेऊन आले. स्वामींनी त्या व्यक्तीला अभय दिले आणि त्याच्या गैरवर्तणुकीबद्दल विचारणा केली. स्वामींना शरण येऊन ती व्यक्ती म्हणाली, 'स्वामीजी, माझ्या घरात सहा लहान-लहान मुले आहेत. ती उपाशी आहेत. त्यांना या प्रसादाची जास्त गरज आहे.''अरे, पण प्रसाद तर सर्वांनाच मिळणार होता ना?'- स्वामीजी उत्तरले.'काय सांगावं? भली मोठी रांग संपेपर्यंत प्रसादही संपला असता तर? मी आणि माझी मुले उपाशी राहिलो असतो. म्हणून मी घुसखोरी केली. मला प्रसाद द्या स्वामी....'

स्वामींनी सेवकांना सांगून व्यक्तीसाठी प्रसाद बांधून दिला. प्रसाद सोपवताना स्वामीजी म्हणाले, 'तू इथे विष्णुसहस्रनाम म्हणायला येत होतास ना, थोडेसे मलाही म्हणून दाखवतोस?' तोंडघशी पडणार, या भीतीने त्या व्यक्तीने स्तोत्र म्हणायला सुरुवात केली.

ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभु:।भूतकृद् भूतभृद् .....

एवढे म्हणून ती थांबली. कारण पुढचे स्तोत्र पाठ नव्हते. त्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दाचा आधार घेत स्वामीजी म्हणाले, 'तुला १००० नावांपैकी फक्त ६ च नावे पाठ आहेत? त्या सहाव्या नावावर लक्ष केंद्रित कर. भूतभृद् म्हणजे, अशी व्यक्ती, जी अखिल विश्वाचा सांभाळ करते, पोषण करते. तुला जर, हा अर्थ उमगला असता, तर तू अशी कृती केली नसती आणि परमेश्वरावर भार टाकला असता. म्हणून प्रत्येक नामाचे महत्त्व समजून घे आणि संपूर्ण विष्णुसहस्रनाम आत्मियतेने पाठ करून दररोज भगवंताचे स्मरण कर. 