शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
5
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
6
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
7
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
8
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
9
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
10
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
11
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
12
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
13
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
15
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
17
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
18
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
19
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
20
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...

Safala Ekadashi 2022: सफला एकादशीनिमित्त श्री विष्णूंच्या निद्राधीन मूर्तीचे स्वरूप समजून घेऊया!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 7:00 AM

Safala Ekadashi 2022: १९ डिसेंबर रोजी सफला एकादशी आहे, त्यानिमित्त विष्णूंचे हे निद्रिस्त रूप देखील प्रेरणादायी ठरेल. कसे ते वाचा!

काही श्लोक आपल्या रोजच्या म्हणण्यातले असतात, तरीदेखील त्याच्या अर्थाकडे आपले लक्ष जात नाही. केवळ तोंडपाठ असतात म्हणून आणि सवयीचा भाग म्हणून ते नित्यनेमाने म्हटले जातात. तसाच हा भगवान महाविष्णूंची स्तुती आणि वैशिष्ट्ये सांगणारा हा श्लोक आपण रोज म्हणतो. सफला एकादशी निमित्त या श्लोकाचा अर्थ समजून घेऊ. 

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णम् शुभांगम्लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानिगम्यम्, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं।।

'आप लढो, हम कपडे संभालते है' अशी पुळचट भूमिका प्रत्येकाने घेतली असती, तर दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचा उद्धार कोणी केला असता? म्हणून गर्दीला मार्ग दाखवायला मार्गदर्शक लागतोच. मोहिमेची अंमलबजावणी करायला नेता लागतोच. शत्रूशी दोन हात करायला सेनापती लागतोच, तसाच आयुष्याला दिशा दाखवणारा गुरु लागतोच. या सर्व भूमिका एकत्रपणे एकहाती सांभाळणारे कुशल दैवत म्हणजे, भगवान महाविष्णू! 

त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे गुणविशेष या श्लोकात वर्णन केले आहेत. कोणत्याही समूहाचे, कार्याचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याकडे, नायकाकडे हे गुण असले पाहिजेत. भगवान महाविष्णूंना त्यांनी आपले आदर्श मानले पाहिजे.  

शांताकारं - व्यक्ती नुसती शांत असून उपयोगी नाही. अनेकदा वरवर शांत दिसणारी व्यक्ती आतून धुमसत असते, अस्वस्थ असते, चरफडत असते. अशा व्यक्तीची तुलना जिवंत बॉम्बशी केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण, अशी व्यक्ती स्फोटक ठरू शकते. मात्र, व्यक्ती केवळ शांत `दिसून' उपयोगी नाही, तर ती अंतर्बाह्य `शांत'ही असावी लागते. शांत डोक्याची व्यक्तीच कठीणात कठीण परिस्थिती नियंत्रणात आणू शकते. 

भुजगशयनम् - शांत कोणीही बसेल हो, पण भुजंगाची शय्या, म्हणजे फारच झाले. घरात छोटसे फुरसे आढळले, तरी लोक दहा आकडी सापडल्याचे वर्णन करून फुशारक्या मारतात. सर्पमित्र येऊन भोवऱ्याची दोरी पकडावी, तसे अलगद उलचून घेऊनही जातात. इथे तर शेषराजांवर स्वार होऊन भगवंत कृष्णावतारात नाचत आहेत, विष्णू अवतारात झोपत आहेत. या प्रतिकात्मक रूपकातून महाविष्णूंनी दाखवून दिले आहे, की संकट कितीही मोठे असो, ते गुंडाळून त्यावर स्वार होता आले पाहिजे. संकटकाळातही सहजतेने आयुष्य जगता आले पाहिजे. तरच तुम्ही इतरांना धीर देऊ शकाल. नायकाने घाबरून, डगमगून चालत नाही. तो स्थिर असला, तरच त्याचे अनुयायी त्याचे अनुकरण करणार आहेत. आणि नायकाचे वेगळेपण अधोरेखित होणार आहे, पद्मनाभं सुरेशम्!

विश्वाधारम् गगनसदृशम्- `मजधार में नैया डोले, तो माझी पार लगाए, माझी जो नाव डुबोए उसे कौन बचाए' हीच अवस्था नेतृत्त्वाच्या बाबतीत असते. आजवर, या अखिल विश्वावर एवढी संकटे आली, त्यांचा निभाव लावताना विष्णू डळमळीत झाले नाहीत, उलट त्यांनी विश्वाला आधार दिला म्हणून त्यांना जगद्पालक अशी बिरुदावली मिळाली. पृथ्वीच्या टोकावर कुठेही गेलात, तरी विस्तीर्ण आकाश जसे आपली साथ सोडत नाही, तसे सर्वव्यापक भगवान महाविष्णू गगनसदृश्य आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते आपल्या पाठीशी आहेत. 

मेघवर्णम् शुभांगम् - मेघांसारखी त्यांची श्यामल कांती आहे आणि मेघाप्रमाणेच प्रेमाचा वर्षाव करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांना पाहून कोणालाही आनंदच होईल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून त्यांना शुभांगम् म्हटले आहे. 

लक्ष्मीकांतं कमलनयनम् - शब्दश: ज्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरते, असे महाविष्णू कामे थांबवून निष्क्रिय झालेले नाहीत, तर त्यांनी जगराहाटीचा व्यवहार सुरू ठेवला आहे. आपल्या कमलनयनांनी, कृपादृष्टीने ते जगाकडे पाहत आहेत. कमलनेत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सकारात्मक दृष्टीकोन. कमळ चिखलात उगवते, तरीही सुंदर, टवटवीत असते. चिखलात राहूनही, स्वत:ला डाग लावून न घेता आपले आयुष्य आनंदाने जगते. तसेच नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला संकटातही संधी शोधून सकारात्मक दृष्टीकोन देता आला पाहिजे. 

अशा भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी योगी, तपस्वी, ऋषी, मुनी, भाविक सदैव धडपडत असतात...योगिभिर्ध्यानिगम्यम्. मात्र, भगवान महाविष्णू केवळ शूर, साहसी आणि सत्याची कास धरणाऱ्या व्यक्तीलाच साथ देतात. म्हणून आपणही त्यांच्या कृपेस पात्र होऊया. साऱ्या विश्वावर कोणतेही संकट आले, तरी ते पार करण्यासाठी लागणारे धैर्य मागुया व या विश्वाचे कल्याण होवो, हे दान पदरात पाडून घेऊया, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं.