शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

संतकवी दासगणू महाराज यांची आज पुण्यतिथि,साईभक्त अशी त्यांची ओळख; जाणून घेऊया त्यांचे कार्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 7:00 AM

पोलिस खात्यात नोकरी करून अध्यात्माची वाट धरत परमपदाला पोहोचलेले दासगणू महाराज यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेऊया.

गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज यांची आज २८ नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी आहे. हे मराठी संत, कवी व कीर्तनकार होते. दास गणू महाराज यांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या संत चरित्रलेखनामुळे त्यांना 'आधुनिक महाराष्ट्राचे महीपती' म्हणून ओळखतात.महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांच्यावर त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहीसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले. १९६२ मध्ये दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला तो आजचा दिवस!

दासगणू महाराज साईबाबा यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फूर्तीनेच त्यांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अभंगस्वरूप लेखनात साईबाबांचा उल्लेख सतत येतो. 'गणू म्हणे' ही त्यांची नाममुद्रा. ते साईबाबांनाचा ब्रह्मा-विष्णू-महेशांच्या रूपात पाहत. दासगणू महाराज हेच साईबाबा संस्थानचे पहिले अध्यक्ष होते, अशी माहितीही मिळते. त्यांनी लिहिलेली शिर्डी संस्थानाचा महिना वाचण्यासारखा आहे. 

प्रपंच परमार्थाची सांगड घालत ते आजच्या तिथीला प्रभुपदाशी लीन कसे झाले त्याचे वर्णन करणारे दासगणू महाराज लिखित काव्य -

कीर्तनातुन दंभावर केला प्रहार । केला शुद्ध भक्तीचा प्रसार ।। सहस्त्रनामाची  करुनी ती साधना केली विष्णुसहस्त्रनामबोधिनी  टिका।। 

चांगदेव पासष्टी , नारद भक्तसुत्रास गुंफीले भक्तीच्या धाग्यात । शांडिल्यसुत्र, गौडपादविवरण। ईशावास्यास रचलेली ओव्यात ।। 

नारदीय किर्तन परंपरेची राखली आस । रचुनी संतांचे अख्यान ।। 

ठेविला देह चंद्रभागेच्या तिरी । मन असे सदैव आपले गोदातटावरी।। गायली संत चरित्रे कीर्तनासी  । आचार्य वर्णिले महाकाव्यासी ।

तत्वज्ञान आचरणुन सांगितले भाष्यग्रंथासी।  नमन करतो आधुनिक महिपती दासगणुसी सदा वरदकरअसावा आपला माझ्यावरती ।। 

।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।। 

आज कार्तिक वद्य त्रयोदशी, संतकवी श्री दासगणु महाराज यांची पुण्यतिथी पू.दादांच्या चरणी साष्टांग दंडवत!