शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

संत वचन अमुल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 4:00 PM

संत वचनांची कद्र करावी. कारण तिच स्वहिताची वचने आहेत.

आदमी क्या वो न समझे जो सुखन की कद्र को ।नुत्क ने हैवां से मुश्त-ए-खाक को इन्सा किया ॥

            तो मनुष्यच काय जो सुविचाराचे मोल जाणत नाही. खरे तर माणसाचे अस्तित्व एका मुठभर माती इतके आहे. पण नुत्क ने इन्सा किया, शब्दाने माणूस पण दिले.             पशुत माणसात फरक आहे तो हाच की  मनुष्याने शब्द अविष्कार जाणला.  शब्दांपासून विचारांची निर्मिती झाली. माणसात व पशुत भाव आहेत. निसर्गतः जेथे वात्सल्य, ममता व प्रेम आहे तेथे क्रुरता, आक्रमता व हिंसा हे दोन परस्पर  विरुध्द भावपशुतही आहेत. माणूस पशु असे पर्यंत त्याच्यात हे भाव प्रमुख होतेच. परंतु बुध्दी जस जशी विकसीत होत गेली भाव अभिव्यक्तीचे अधिक आयाम माणसात निर्मित होत गेले. सोबत प्राकृतिक दृष्ट्याच माणसात मनही विकसीत होत गेले ते शब्द तत्वामुळे.              जगात अनेक भूखंड भागातील अनेक लोकांनी आपआपले शब्द निर्मित केले आहेत. त्या त्या ठिकाणी शब्दांच्या त्यांच्या अलग अलग भाषा आहेत. पाश्चिमात्त्य लोकांचे विचारानुसार, माणूस जेव्हा पशु अवस्थेत होता तेव्हा तो आपल्या भाव अभिव्यक्तीला आवाजाचे, वाणीचे व्दारा पशु सारखाच अभिव्यक्त करीत होता. पुढे बुध्दी विकासाचे काळात तो स्मृतिचे माध्यमातून विशिष्ट शब्दध्वनी अनुभवातून  निश्चित करत गेला. त्याच्या प्रत्येक कृति अभिव्यक्ती साठी, वेगवेगळे प्रतिकासाठीे वेगवेगळे वाणी आघात, ज्यांनी पुढे शब्दरुप धारण केले. या शब्द निश्चितीची अभिव्यक्ती भाषेत श्रृंखला बध्द होत गेली. तर्क दृष्ट्या हे त्याच्या दृष्टीने ठीकही वाटते. परंतु भारत याला जगात अपवाद राहिला.           भारताने शब्दांची जी दिव्यता मिळविली त्याची पार्श्वभूमि दिव्य आहे. येथील ॠषिमुनींनी आपल्या परम संवेदनशिलतेतून जाणलेली परा शक्तीची अनुभूति हिच ती दिव्यता. ह्या दिव्यतेतून जाणल्या गेले सृष्टीचे पहिले शब्दतत्व ओंकार आहे. तोच ओंकार, तो एक शब्द, तेच श्रेष्ठ शब्दतत्व. या तत्वाचा नाद अनेक क,ख,ग सारख्या अनेक  वर्ण रूपाने आणि अ,आ,इ, उ, ऊ सारख्या स्वराने त्याच्याच देह अंतर्यामी चक्रांमधून घुमतो आहे हे संवेदनेतून मनुष्य जाणू लागला. ब्रह्मांडाच्या निर्मितीचे मूळ ओंकाराशी आहे हे तो समजू लागला.  वर्ण व स्वराच्या जोडी वस्तुरुपाशी जोडून अनुभवातून धीरे भाषेची निर्मीती त्याने केली. त्याने हेही जाणले की, मुखाने बोलतो आवाज काढून एवढीच शब्दवाणी नाही. ती मुखाची वैखरी वाणी ही केवळ प्रगट वाणी आहे. परंतु आधारचक्रापासून अनाहत चक्रापर्यंत परा, पश्यंती व मध्यमा ह्या अजून तीन सुक्ष्म वाणी आहेत. ज्या परम जाणीवांना अभिव्यक्त करतात.            या चारही वाणीच्या सहाय्याने वेदांची निर्मिती झाली, उपनिषदांची निर्मिती झाली. ही सर्व निर्मिती संस्कृत मध्ये आहे. संस्कृतला देववाणी म्हटले गेले. कारण या भाषेच्या ज्ञात्यांनी जाणले की, या सृष्टीच्या निर्मिती व लयाचे मागे काही श्रेष्ठ दिव्य असे अलौकिक तत्त्व आहे. त्या दिव्य अवस्थेतील अभिव्यक्ती त्यांचे वाणीतून अभिव्यक्त झाली ती संस्कृत मध्ये लिपीबध्द झाली. आदिवासी पासून प्रगत देशापर्यंत हजोरो भाषा आहेत. परंतु आज जगातील वैज्ञानिकही मानतात की, संस्कृत ही जगातील सर्वात श्रेष्ठ भाषा आहे.              परंतु पुढे हिच वेद उपनिषदांची अभिव्यक्ती सामान्य जनाकरिता प्राकृत भाषेतून संत सज्जनांनी अभिव्यक्त केली व सत्य विचाराची सुक्ष्म कवाडे बोलीभाषेत मांडून भक्ती मुक्तीचा मार्ग खुला केला. संस्कृत वेदाचे मर्म तुकोबांनी प्राकृतात सांगितले.         वेद अनंत बोलिला । अर्थ इतुकाची साधला          विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावें ।।         सकळ शास्त्रांचा विचार । अंति इतकाची          निर्धार ।। अठरा पुराणी सिद्धांत । तुका म्हणे                          हाची हेत ।।भारताशिवाय अन्य देशातील संतांनीही आपआपल्या लोक भाषेत ही परा अभिव्यक्ती शब्दाचे माध्यमातून सुविचाराव्दारे जगाला सांगितली आहे. हेच सत्य विचार आहेत. हेच सुखन आहेत. ज्यांनी या सुखनची कद्र केली, म्हणजे आत्मसात केले ते सुखाला शांतीला प्राप्त झाले.              पण भाषा झाली तर भाषेतून विचारांचीही निर्मिती झाली. त्यातून मनाने चांगले वाईट विचार करणे सुरु केले. मनाचे तत्वच हे मूलतः शब्दतत्वाला प्राणशक्तीचा आधार घेऊन निर्माण झाले असल्याने ते आपल्या सोईचा विचार करते. आपल्या सुखासाठी चांगला विचार असेल तर चांगला विचार घेते व वाईट विचार सोईचा असेल तर वाईट विचारही घेते.                 जसे आधी म्हटले आहे तसे श्रेष्ठम सुक्ष्म भाव अभिव्यक्तीसाठी शब्दांचा, विचारांचा फायदा झाला.  भाव तर स्वाभाविकच आहेत. तेव्हा आतील भाव बाहेर अभिव्यक्त करण्यासाठी व बाहेरच्या विचारांनी आत भाव निर्माण करणे शब्दामुळे माणसाला सोईचे झाले. तेव्हा याचा लाभ घेणे व हानी करवून घेणे माणसाचे मनावर आहे.  शायर हेच म्हणत आहेत की, जो सुखनची, अर्थात सुविचारांची कद्र करेल, पारख करेल, त्याचे अंतर्यामी त्यांना रुजवेल तोच माणूस आहे. कारण ज्ञानाचे विचारच नसते तर माणूस पशुच असता. पण या पशुत्वातून माणूस जर चांगल्या विचारांची कद्र करेल तरच तो केवळ मातीचे ढेकुळ नाही राहत तर  दिव्यत्वही प्राप्त करु शकतो.                 आजचे स्थितीत मोठा विरोधाभास आहे सुखन विषयी, सुविचारा विषयी. सगळ्यांना असे वाटते आहे की, आम्हीच केवळ सुविचारी आहोत. यातून जगभरात एक अराजक स्थिती निर्माण झाली आहे. काेण्या सुखनची कद्र करावी व कोणत्या सुखनची कद्र ना करावी याचा निर्णय घेणे कठीण होत चालले आहे.म्हणून याचा निर्णय संत, बुध्द व सिध्द वचनाचे आधारे घ्यावा. संत वचनांची कद्र करावी. कारण तिच स्वहिताची वचने आहेत.

संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांना श्रध्दा नमन !शायर आतिश यांना अभिवादन !

                               शं.ना.बेंडे पाटील

टॅग्स :spiritualअध्यात्मिकkhamgaonखामगावsant tukaramसंत तुकाराम