शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

संकष्टी फळणार; बाप्पाचा आशीर्वाद मिळणार; आठवड्याभरात तुमच्याही राशीला मिळणार शुभवार्ता!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 11:43 AM

Sankashti Chaturthi 2023: संकष्टीपासून आठवडाभर ग्रहमान शुभ घटनांसाठी अनुकूल आहे, तुमच्या राशीसाठी काय दिले आहे ते जाणून घ्या आणि संधीचे सोने करा!

प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो असे म्हणतात. त्यात प्रयत्नांना नशिबाची साथ मिळाली तर दुधात साखरच. त्यादृष्टीने ज्योतिष शास्त्र दर दिवशी, दर आठवड्याला राशी भविष्य सांगून आशेचा किरण देत असते. आज संकष्ट चतुर्थी आहे आणि आजपासून पुढील आठवडाभराचे ग्रहमान शुभ घटनांसाठी अनुकूल आहे. अशातच तुमच्या राशीसाठी काय वाढून ठेवले आहे ते जाणून घ्या आणि त्यादृष्टीने संधीचे सोने करा किंवा आगामी काळासाठी संधी निर्माण करा.

मेष :या आठवड्यात तुम्हाला चांगली बातमी मिळेल. ओळखीच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सरकारी कामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण होतील.या आठवड्यात नशिबाची चांगली साथ लाभणार आहे.

वृषभ :या आठवड्यात कामाशी संबंधित नवीन योजना करण्यात यशस्वी व्हाल. मोठे व्यापारी किंवा अधिकारी यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित कराल. जुनी नाती उपयुक्त ठरतील, लाभ देतील. मित्रांच्या मदतीने तुम्ही शत्रूंचा पराभव करू शकाल.

मिथुन :या आठवड्यात तुम्ही अशुभ परिस्थितींवर विजय मिळवणार आहात. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या काळात तुम्हाला रिअल इस्टेटमधून चांगले फायदे मिळतील.

कर्क :या आठवडय़ात उद्योग-व्यवसायात वाढ होईल. उच्च पदावर असलेल्या लोकांशी संबंध निर्माण होतील आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवला जाईल. नवीन लोकांशी संवाद वाढेल आणि त्यांच्याशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित होईल. या आठवड्यात कुटुंबातील सदस्य आणि मित्रांकडून सर्व शक्य सहकार्य आणि मदत मिळेल.

सिंह :धार्मिक कार्यासाठी हा आठवडा चांगला आहे. प्रवासाचीही संधी मिळेल. कुटुंबात मंगल कार्य होईल. तुमच्या हुशारीने तुम्हाला कामात यश मिळेल. वैवाहिक जीवनात मधुरता दिसून येईल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या विरोधकांवर विजय मिळवू शकाल.

कन्या :या आठवड्यात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून खूप स्नेह मिळेल. धर्मावरील श्रद्धा वाढेल. तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी राहील. संभाषण कौशल्य आणि चपळता वापरून तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. या आठवड्यात काही चांगल्या बातम्या मिळतील. कोर्ट-कचेरीत विजय मिळेल.

तूळ :हा आठवडा संमिश्र आणि फलदायी राहील. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या स्वभावात आणि वागण्यात परिपक्वता दिसून येईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक :या आठवड्यात सरकारी क्षेत्रात मान-सन्मान आणि लाभ मिळेल. उच्चपदस्थ लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. राजकारणात तुमचे आकर्षण असेल, परंतु राजकारणात गुंतलेल्या लोकांपासून तुम्ही थोडे सावध राहावे, अन्यथा तुमच्यासाठी संकट निर्माण होईल.

धनु :या आठवड्यात व्यवसायात यश मिळणार नाही, मात्र कुटुंबात आनंद राहील, आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे. या आठवड्यात उच्चपदस्थ लोकांशी चांगले संबंध निर्माण होतील. कुटुंबाबाबत चांगली बातमी मिळाल्याने आनंदाचे वातावरण राहील.

मकर :या आठवडय़ात तुमची कामे आणि धर्माशी संबंधित कामांवर पैसा खर्च होईल. तुम्हाला तुमचे मित्र आणि सहकाऱ्यांकडून शक्य ते सर्व सहकार्य मिळेल. या आठवड्यात तुमचा कल धार्मिक कार्यांकडे असेल. कुटुंबाकडून आनंद आणि सहकार्य चांगले राहील.

कुंभ :या आठवडय़ात कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी अन्यथा मानसिक तणाव वाढेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. प्रतिष्ठा वाढू शकते. धार्मिक कार्य आणि उदात्त कार्यात पूर्ण निष्ठेने सहकार्य कराल. तुमच्या क्षेत्रातील लोकांमध्ये तुम्हाला प्रसिद्धी मिळेल.

मीन:या आठवड्यात तुम्हाला राजकारणात यश मिळवण्याच्या संधी मिळू शकतात आणि सरकारी सेवेतील उच्चपदस्थ लोकांशी तुमची मैत्री होईल. परोपकारी स्वभावाचे असल्याने तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काम कराल. तुम्हाला सरकारकडून किंवा सरकारी योजनेतून पैसे मिळतील.

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीAstrologyफलज्योतिष