शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

Sankashti Chaturthi 2024: डॉ. बालाजी तांबे यांनी सांगितले गणेश मंत्रांचे रहस्य आणि उपासनेचे भरघोस लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 9:38 AM

Sankashti Chaturthi 2024:कलियुगात त्वरित प्रसन्न होणारी देवता म्हणजे भगवान गणेश, त्याच्या उपासनेसंदर्भात दिलेले नियम पाळले तर लाभ होणारच म्हणून समजा!

आयुर्वेद आणि अध्यात्म यांचे गाढे अभ्यासक डॉ. बालाजी तांबे यांनी गणेश उपासने संदर्भात अतिशय रोचक माहिती दिली आहे. ते म्हणतात, कलियुगात देवी, शंकर, विष्णू, लक्ष्मी आणि गणपती या पंचदेवता लवकर प्रसन्न होणाऱ्या आहेत. पैकी गणपती बाप्पावर आपला स्नेह अधिक असल्याने तो जास्त जवळचा वाटतो आणि सुखकर्ता दुःखहर्ता हे त्याचे वैशिष्ट्य असल्याने तो सगळी विघ्न देखील दूर करून आनंद देतो. पुढे दिलेल्या प्रार्थनेसाठी मोजून तीन मिनिटेही लागत नाहीत. मात्र तेवढा वेळ देवासाठी दिलात तर देवही तुमच्यासाठी वेळ देईल हे नक्की!

तर मग या बाप्पाची उपासना कधी, कशी आणि किती वेळा करावी?

डॉ. बालाजी तांबे सांगतात, बाप्पाची उपासना त्रिकाळ करावी. पहाटे, सकाळी आणि संध्याकाळी! आपल्या दिवसाची मंगलमयी सुरुवात व्हावी असे वाटत असेल तर पहाटे उठा. प्रातःर्विधी आवरून घ्या. स्नान करा आणि श्री गणेश प्रात:स्मरण स्तोत्र म्हणा. 

प्रातः स्मरामि गणनाथमनाथबन्धुं सिंदूरपूरपरिशोभित गण्डयुग्मम् ।उद्दण्डविघ्नपरिखण्डनचण्डदण्डं आखण्डलादि सुरनायक वृन्दवन्द्यम् ॥ १ ॥प्रातर्नमामि चतुरानन वन्द्यमानं इच्छानुकूलमखिलंच फलं ददानम् ।तं तुंदिलं द्विरसनाधिप यज्ञसूत्रं पुत्रं विलासचतुरं शिवयोः शिवाय ॥२ ॥प्रातर्भजाम्यभयदं खलु भक्तशोक-दावानलं गणविभुं वरकुंजरास्यम् ।अज्ञानकाननविनाशनहव्यवाहं उत्साहवर्धनमहं सुतमीश्वरस्य ॥ ३ ॥श्लोकत्रयमिदं पुण्यं सदा साम्राज्यदायकम् ।प्रातरुत्थाय सततं यः पठेत्प्रयतः पुमान् ॥ ४ ॥

हे स्तोत्र ऐका, म्हणा तसेच श्रवण करा. स्तोत्र ऐकून ऐकून लवकरच पाठ होईल. या स्तोत्राला पर्यायी स्तोत्र म्हणजे माउलींनी लिहिलेलं गणेश कवन- ओम नमोजी आद्या! पहाटे उठून ही स्तोत्र म्हणावीत. 

सकाळी आवरून घराबाहेर पडण्याआधी गणेश अथर्वशीर्ष म्हणावे. या स्तोत्राच्या शीर्षकातच त्याचा लाभ दिलेला आहे. थर्व म्हणजे हलणे, अ म्हणजे नाही, शीर्ष म्हणजे शीर अर्थात आपले डोके किंवा मेंदू. आपला मेंदू, तथापि आपले विचार, मन आणि शरीराचे हेड कोर्टर शांत ठेवण्याचे काम हे स्तोत्र करते. त्यात सुरुवातीला ओम गं गणपतये म्हणताना अनुस्वारात म नाही तर न म्हणा, जेणेकरून पूर्ण मेंदू त्या स्वराने व्यापून जाईल आणि डोकं शांत राहील. म्हणून अथर्वशीर्ष कोमल गांधार आणि निषादात म्हणावे असं म्हणतात. 

गणपती ही नाददेवता आहे. बुद्धी, संतती, संपत्ती देणारी देवता आहे. तिची उपासना मनोभावे केल्यास निश्चितच लाभ मिळतो, असे स्तोत्र कारांनी देखील लिहून ठेवले आहे, तसेच गणेश भक्तांनी अनुभव घेतले आहेत. वरील दोन प्रार्थना झाल्यावर तिसरी सायं प्रार्थना गणेश स्तोत्राने करावी. 'प्रणम्य शिरसा देवं' तथा 'साष्टांग नमन हे माझे' या संकटनाशन स्तोत्र पठणाने करावी. 

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्र विनायका |भक्तिने स्मरतां नित्य आयु:कामार्थ साधती ||१||प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंत तें |तीसरेकृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्त्र तें ||२||पाचवेश्रीलंबोदर सहावे विकट नाव तें |सातवेविघ्नाराजेंद्र आठवे धुम्रवर्ण तें ||३||नववेश्रीभालाचंद्र दहावे श्रीविनायक |अकरावेगणपति बारावे श्रीगजानन ||४||देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर |विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद ||५||विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन |पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति ||६||जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय ||७||नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले ||८||

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३