शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
3
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
4
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
5
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
6
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
7
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! PCB ने दुसऱ्या सामन्याचे ठिकाण बदलले; कारण जुनेच सांगितले
8
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
9
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
10
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
11
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
12
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
13
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात
14
IND vs BAN : रिषभमुळे रोहितने निर्णय बदलला; सिराजची मागणी फेटाळली; पंतने अखेर माफी मागितली
15
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
16
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
17
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
18
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
19
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
20
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 

पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 3:10 PM

Pitru Paksha Bhadrapad Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचे महत्त्व, मान्यता आणि विविध शहरांतील चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या...

Pitru Paksha Bhadrapad Sankashti Chaturthi 2024: मराठी वर्षातील महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मास काळ सुरू आहे. भाद्रपद महिन्याची पौर्णिमा झाली असून, आता पितृपक्ष म्हणजेच पितृ पंधरवडा सुरू आहे. पितृपक्षात पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावे श्राद्ध, तर्पण विधी केला जातो. भाद्रपद महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्टीचे व्रत आहे. २१ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद महिन्याच्या पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी आहे. व्रताचरणाचा विधी आणि काही शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घेऊया...

गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणरायाचे आगमन होते. कुळाचार, कुळधर्माप्रमाणे गणपती बाप्पाचे पूजन, सेवा करून जड अंतःकरणाने गणपतीला निरोप दिला जातो. त्यामुळे पितृपक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला पुन्हा एकदा बाप्पाची सेवा करण्याची संधी प्राप्त होते. पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. 

संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो

संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणाही करू शकतो. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. प्रत्येक संकष्टीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. 

भाद्रपद पितृपक्ष संकष्ट चतुर्थी: २१ सप्टेंबर २०२४

भाद्रपद पितृपक्ष संकष्ट चतुर्थी प्रारंभ: शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४ रोजी रात्रौ ०९ वाजून १५ मिनिटे.

भाद्रपद पितृपक्ष संकष्ट चतुर्थी समाप्ती: शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ०६ वाजून १४ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे, असे सांगितले जात आहे. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे.  मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.

पितृपक्षातील संकष्ट चतुर्थी हे व्रत कसे करावे?

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अगदीच शक्य नसल्यास एकदातरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणावे अथवा श्रवण करावे.

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ 

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून ०४ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून ०३ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून ०१ मिनिटे
नाशिकरात्रौ ०८ वाजून ५८ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०८ वाजून ५६ मिनिटे
धुळेरात्रौ ०८ वाजून ५२ मिनिटे
जळगावरात्रौ ०८ वाजून ४९ मिनिटे
वर्धारात्रौ ०८ वाजून ३७ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून ३९ मिनिटे
बीडरात्रौ ०८ वाजून ५२ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून ०० मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ०५ मिनिटे
सोलापूररात्रौ ०८ वाजून ५३ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून ३४ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून ४० मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)रात्रौ ०८ वाजून ५२ मिनिटे
भुसावळरात्रौ ०८ वाजता ४८ मिनिटे
परभणीरात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०८ वाजून ५२ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ०६ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून ०२ मिनिटे
इंदौररात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे

 

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीpitru pakshaपितृपक्षPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३chaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक