भारतीय संस्कृतीत व्रतोपासना, सण-उत्सव यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मराठी महिन्यात काही ना काही व्रत, सण, उत्सव येत असतात. मात्र, वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या यांना अनन्य महत्त्व आहे. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे लाडके दैवत. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती बाप्पाचे पूजन केले जाते. ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला करायचे व्रताचरण, पूजनाचा विधी आणि राज्यातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या... (jyeshta sankashti chaturthi 2021 date)
ज्येष्ठ संकष्ट चतुर्थी: २७ जून २०२१
ज्येष्ठ वद्य चतुर्थी प्रारंभ: रविवार, २७ जून २०२१ रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटे.
ज्येष्ठ वद्य चतुर्थी समाप्ती: सोमवार, २८ जून २०२१ रोजी दुपारी २ वाजून १६ मिनिटे.
भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन रविवार, २७ जून २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी म्हणतात, असे सांगितले जाते. (sankashti chaturthi 2021 vrat puja vidhi in marathi)
महाभारत युद्धात एका क्षणी हनुमान-कर्ण आले आमनेसामने; श्रीकृष्ण मधे पडले नसते तर...
असे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत
संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (sankashti chaturthi 2021 city wise chandrodaya timing)
संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शनाचे एवढे महत्त्व का, जाणून घ्या
विविध शहरांतील चंद्रोदय वेळ
शहरांची नावे | चंद्रोदयाची वेळ |
मुंबई | रात्रौ १० वाजून ०१ मिनिट |
ठाणे | रात्रौ १० वाजता |
पुणे | रात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे |
रत्नागिरी | रात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे |
कोल्हापूर | रात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे |
सातारा | रात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे |
नाशिक | रात्रौ ०९ वाजून ५८ मिनिटे |
अहमदनगर | रात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे |
धुळे | रात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे |
जळगाव | रात्रौ ०९ वाजून ५३ मिनिट |
वर्धा | रात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे |
यवतमाळ | रात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे |
बीड | रात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे |
सांगली | रात्रौ ०९ वाजून ५० मिनिटे |
सावंतवाडी | रात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे |
सोलापूर | रात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे |
नागपूर | रात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे |
अमरावती | रात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे |
अकोला | रात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे |
औरंगाबाद | रात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे |
भुसावळ | रात्रौ ०९ वाजता ५२ मिनिटे |
परभणी | रात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे |
नांदेड | रात्रौ ०९ वाजून ४२ मिनिटे |
उस्मानाबाद | रात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे |
भंडारा | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
चंद्रपूर | रात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे |
बुलढाणा | रात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे |
मालवण | रात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे |
पणजी | रात्रौ ०९ वाजून ५० मिनिटे |
बेळगाव | रात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे |
इंदौर | रात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे |
ग्वाल्हेर | रात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे |