शहरं
Join us  
Trending Stories
1
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
2
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
5
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
6
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
7
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
8
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
9
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
10
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
11
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
12
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
13
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
15
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
16
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
17
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
18
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
19
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
20
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला

Sarva Pitru Amavasya 2024: सर्वपित्रीला आठवणीने करा मिठाचा तोडगा; पितृ व वास्तु दोषातून मुक्ती मिळवा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 4:58 PM

Sarva Pitru Amavsya 2024: २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे आणि ३ ऑक्टोबर रोजी नवरात्रीचा प्रारंभ; त्या निमित्ताने आवर्जून करा दिलेला तोडगा!

२ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री अमावस्या (Sarva Pitru Amavasya 2024)आहे आणि त्याच दिवशी सूर्य ग्रहण (Solar Eclipse 2024) देखील आहे. हा दिवस पितृपक्षाचा शेवट मानला जातो. अमावस्या आणि पौर्णिमा लक्ष्मी मातेची आवडती तिथी असल्याने आणि पुढच्याच दिवशी अर्थात ३ ऑक्टोबर रोजी नवरात्रि (Navratri 2024)सुरू होणार असल्याने मिठाशी संबंधित उपाय करा. त्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा कुटुंबावर सदैव राहते आणि घरातील वातावरणही सकारात्मक राहते. जाणून घेऊया हा उपाय कसा करायचा ते!

ज्योतिषशास्त्रानुसार मीठ हे चंद्र, शुक्र आणि राहूचे प्रतीक मानले जाते. याचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपते. ग्रहस्थिती सुधारते. आर्थिक स्थिती मजबूत होते. मीठ समुद्रातून मिळाले आणि लक्ष्मी ही समुद्राची कन्या, त्यामुळे मीठाला लक्ष्मीचा भाऊ मानले जाते. लक्ष्मी देवी आपल्या घराकडे आकृष्ट व्हावी, यासाठी वास्तुशास्त्रातही मिठाचे उपाय सांगितले जातात. ते पुढील प्रमाणे-

>> अमावास्येच्या दिवशी घराची साफसफाई मिठाच्या पाण्याने करावी. यासाठी फार नाही, तर केवळ चमचा भर साधे मीठ किंवा खडे मीठ पाण्यात टाकावे आणि त्या पाण्याने घराची जागा पुसावी. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. यासोबतच तुमच्या घरात लक्ष्मी माता मुक्काम करेल, तिचा आशीर्वाद मिळेल. गुरुवार सोडून तुम्ही दररोज हा उपाय करू शकता.

>> अमावस्येच्या दिवशी काचेच्या ग्लासमध्ये थोडे मीठ आणि पाणी टाकून नैऋत्य दिशेला ठेवावे. पाण्याची वाफ झाल्यास ग्लास पुन्हा पाण्याने भरावा.  हा उपाय त्या दिवसभरापुरताच करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने व्यक्तीच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.

सर्वपित्री अमावस्येसाठी इतर उपाय

>> सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी माशांना पिठाचे गोळे खाऊ घालावेत. यामुळे सुख समृद्धी मिळेल.

>> अमावस्येच्या दिवशी पितरांना जल अर्पण करण्यासोबतच आपल्या क्षमतेनुसार दान अवश्य करावे त्यामुळे घरावर अकल्पित संकट येत नाही.

>> अमावास्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. पाणी घालावे आणि 'ओम नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करताना सात प्रदक्षिणा घालाव्यात. ही प्रार्थना त्रिदेवांपर्यंत पोहोचते. कारण पिंपळाच्या झाडावर त्रिदेवतांचा वास असतो असे श्रीकृष्णांनी गीतेत सांगितले आहे. 

>> सर्वपित्री अमावस्येला एखाद्या गरजवंताला अन्न, कपडे किंवा त्याला उपयोगी पडेल अशी वस्तू दान करावी. शनी देवांचा आशीर्वाद लाभेल. 

>> शनिदोष तथा पितृ दोषातून मुक्ति मिळावी म्हणून सर्वपित्री अमावस्येला शनिदेवाला मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करावे. यामुळे कुंडलीतील साडेसातीच्या त्रासापासून किंवा शनी प्रभावापासून बचाव होतो.  तसेच पितृ दोषातून मुक्ति मिळते. 

 

टॅग्स :pitru pakshaपितृपक्षVastu shastraवास्तुशास्त्रNavratriनवरात्री