शुभ कार्याची सुरुवात शनिवारी करू नये, असे आपली आजी पणजी म्हणत असे. शनी हा ग्रह अतिशय धीम्या गतीने चालणारा आणि उशिरा कार्यसिद्धी देणारा ग्रह आहे . त्याच्या वारी सुरू केलेल्या कार्याला लवकर गती प्राप्त होत नाही. कधी कधी तर काही कामं एवढी रखडतात की काम अर्ध्यातून सोडून द्यावे लागण्याची परिस्थिती ओढवते. म्हणून शनिवारी शनी देवाची आणि हनुमंताची पूजा करावी. पण शुभ कार्याची सुरुवात करू नये असे म्हटले जाते. शिवाय आणखीही काही गोष्टी शनिवारी टाळल्या पाहिजेत. त्या पुढील प्रमाणे-
>>व्यसन करणे वाईटच, मग ते कुठलेही असो. परंतु शनिवारी अजिबात व्यसन करू नये. त्यामुळे शनी महाराजांची अवकृपा ओढवली जाऊ शकते आणि आयुष्यात अनेक अडचणी उद्भवू शकतात.
>> शनिवारी पूर्व, उत्तर आणि ईशान्य दिशेने मोठा प्रवास करू नये. जाणे अनिवार्य असेल तर आल्याचा तुकडा खाऊन मगच बाहेर निघावे. परंतु या दिशेने दूरवरचा प्रवास शक्यतो टाळाच!
>>माहेरी आलेल्या मुलीला शनिवारी सासरी पाठवू नये.
>>शनिवारी तेल, लाकूड, कोळसा, लोखंड इ वस्तू विकत घेऊ नये. विनाकारण घरात क्लेश होत राहतात.
>>शनिवारी केस आणि नखे कापणे व्यर्ज्य मानले आहे.
>>शनिवारी मीठ विकत घेतल्याने कर्ज वाढते किंवा कर्ज सदृश्य परिस्थिती निर्माण होते.
>>शनिवारी वांगी, आंब्याचे लोणचे, पापड, आंबट ताक या प्रकृतीला जड जाणाऱ्या गोष्टींचे सेवन करू नये.
>>शनिवारी कोणाही गरिबाला, गरजू विद्यार्थ्याला किंवा दीनदुबळ्या व्यक्तीला आर्थिक मदत जरूर करावी. परंतु कोणाकडूनही शनिवारी कोणतीही वस्तू मागू नये.