ज्योतिषशास्त्रात शनी हा अत्यंत महत्त्वाचा ग्रह मानला जातो. शनीचा मनुष्य जीवनावर मोठा प्रभाव पडतो. हा ग्रह प्रत्येक राशीमध्ये अडीच वर्षे राहिल्याने त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकतो. शनीची अडीच वर्षे आणि साडे साती संबंधित राशीच्या लोकांवर दीड वर्षासाठी प्रभाव दाखवतो. यावेळी, संबंधित राशींना शनीचा प्रभाव सहन करावा लागतो, म्हणूनच लोकांना हे जाणून घेण्याची उत्सुकता असते की शनीची साडेसाती कोणत्या राशीवर कधी होणार आहे आणि तो प्रभाव कधी संपेल. हे चक्र अविरत सुरू असते. काही काळानंतर, शनी पुन्हा राशी बदलतो आणि नवीन राशीला साडे साती सुरू होते.
सद्यस्थितीत शनीचा प्रभाव पुढील राशींवर राहणार आहे :
जेव्हाही शनी राशी बदलतो, त्याचा थेट परिणाम एकाच वेळी ५ राशींवर होतो. सध्या शनी मकर राशीत आहे आणि एप्रिल २०२२ मध्ये तो कुंभ राशीत प्रवेश करेल. दरम्यान, मकरसाठी काही काळ क्लेषदायक असेल. शनी कुंभ राशीत प्रवेश करताच मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू होईल. दुसरीकडे, राशी बदलताच, धनु राशीवर साडेसाती संपेल. तथापि, शनीच्या साडेसातीचा दुसरा, तिसरा टप्पा अनुक्रमे मकर आणि कुंभ राशीवर चालेल. याशिवाय कर्क आणि वृश्चिक राशीवर शनीचा प्रभाव दिसेल.
मीन राशीचा स्वामी बृहस्पति असल्याने आणि तो शनीचा मित्र ग्रह असल्याने मीन राशीच्या जातकांना इतर राशींच्या तुलनेत साडेसातीचा फार वाईट परिणाम सहन करावा लागणार नाही. तरीसुद्धा, शनीचे नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी, संबंधित लोकांनी उपाय करत राहिले पाहिजे. साडे साती दरम्यान, संबंधित राशीच्या व्यक्तीनी दर शनिवारी शनिदेवाच्या मूर्तीवर राईचे तेल अर्पण करावे आणि शनिशी संबंधित वस्तूंचे दान करावे. पिंपळाची पूजा करावी आणि हातून जेवढे सत्कार्य शक्य होईल ते करत राहावे, जेणेकरून शनी पीडा सौम्य प्रमाणात जाणवेल!