ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् || श्रावणात शिवशंकराची उपासना, आराधना आणि पूजन करण्याची प्राचीन परंपरा असल्याचे पाहायला मिळते. श्रीविष्णूंच्या अनुपस्थितीत जगाचा कार्यभार महादेवांकडे असतो, अशी मान्यता आहे. म्हणूनच महादेवांचे आवाहन करून त्यांची करुणा भाकण्यासाठी रुद्राभिषेक, पूजा-अर्चा केली जाते, असे सांगितले जाते. यंदाचे विशेष म्हणजे श्रावण महिन्याचा प्रारंभ आणि सांगता सोमवारी होत आहे. तसेच यंदाच्या वर्षी पाच श्रावणी सोमवार असणार आहेत. पहिले तीन सोमवारचे व्रताचरण झाल्यानंतर आता चौथ्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ वाहावी, शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि चौथ्या श्रावणी सोमवारचे शुभ योग यांविषयी जाणून घेऊया... (Fourth Shravan Somwar 2021 Date)
जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारत युद्धावेळी वय किती होते? पाहा, काही अद्भूत तथ्ये
चौथा श्रावणी सोमवार, ३० ऑगस्ट २०२१ रोजी असून, या दिवशी शिवामूठ म्हणून जव वाहण्याची परंपरा आहे. सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त होते. देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात. जलाभिषेक आणि रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो. शक्य असल्यास निराहार उपवास करावा. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या प्रतिमेची पूजा करावी. शिवाची प्रतिमा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. वरीलपैकी काहीही शक्य नसेल, तर केवळ शिवशंकरांचा 'ॐ नमः शिवाय' हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो. शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान वाहिले, तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. (Fourth Shravan Somwar 2021 Shivamuth)
श्रीगणेश चतुर्थी: कधीपासून सुरू होणार गणेशोत्सव? पाहा, परंपरा आणि मान्यता
शिवपूजन करण्याची सोपी पद्धत
श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी सोडावा. मात्र, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरकल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा. यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर, 'ॐ नमः शिवायै' या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे, असे सांगितले जाते.
महाभारतात श्रीकृष्ण नसता तर 'या' पाच गोष्टी आपल्याला कधीच कळल्या नसत्या!
शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत आणि मंत्र
चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून जव वाहावे. लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे स्त्रिया हे शिवास्त म्हणजेच शिवामूठ वाहण्याचे व्रत करतात. श्रावणी सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ वाहिली जाते. शिवामूठ वाहताना 'नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने। शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।।' असा मंत्र म्हणावा. मंत्रोच्चार करणे शक्य नसल्यास, शिवा शिवा महादेवा... माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू-सासरा, दिरा-भावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा, अशी प्रार्थना करावी. शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. दरम्यान, यंदाच्या वर्षी पाचवा आणि शेवटचा श्रावणी सोमवार ६ सप्टेंबर रोजी आहे. (Fourth Shravan Somwar 2021 Shubh Yoga)
जन्माष्टमी: श्रीकृष्णांच्या मुकुटावर कायम मोरपीस का असते? वाचा, राधेचा मोलाचा सल्ला
श्रीकृष्ण जयंती
यंदाच्या श्रावणी सोमवारी श्रीकृष्ण जयंती असून, हा एक शुभ योग असल्याचे सांगितले जात आहे. श्रीविष्णूंचा आठवा अवतार म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. तसेच श्रीकृष्णांना पूर्णावतारही मानले जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना त्याच्या लीला, शिकवण, धोरणे, मुसद्देगिरी, नीतिमत्ता या सर्वांचे स्मरण केले जाते. श्रीकृष्णाचे नाव घेतले की, गोकुळ, राधा, बाळकृष्णाच्या लीला आठवतात, तसे श्रीकृष्णाचे चरित्र महाभारत आणि भगवद्गीता याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय या दिवशी संत ज्ञानेश्वर माऊली यांची जयंती आहे.