शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

Sawarkar Jayanti 2022 : वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी स्वा. सावरकरांनी रचली होती शिवरायांची आरती; काय होते निमित्त? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 4:54 PM

Sawarkar Jayanti 2022 : स्वा.सावरकरांनी लिहिलेली आरती म्हणजे एका स्वातंत्र्यवीराने दुसऱ्या स्वातंत्र्यवीराला वाहिलेली शब्द सुमनांजलीच! 

स्वा. विनायक दामोदर सावरकर यांची २८ मे रोजी जयंती आहे. १८८३ मध्ये नाशिकजवळील भगूर या गावी त्यांचा जन्म झाला. चापेकर बंधूंच्या निधनाची वार्ता ऐकून बाल विनायकाच्या मनात स्वातंत्र्य लढ्याचे स्फुल्लींग पेटले. विनायकासमोर रामायण, महाभारत याचबरोबर शिवचरित्राचा आदर्श होता. शिवरायांप्रमाणे आपणही स्वराज्य प्राप्तीची मोहीम फत्ते करायची असा त्यांनी चंग बांधला. शिवरायांनी जशी माणसांची पारख करून मावळे गोळा केले, तसे विनायकाने स्वातंत्र्य समरात स्वतःला झोकून देतील असे स्वातंत्र्य सैनिक तयार केले. एक दोन नाही, तर हजारो! 

सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वात जणूकाही चुंबकीय आकर्षण होते. ते जिथे जात असत तिथे त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शेकडो जणांचा समूह गोळा होत असे. तरुणांचा समूह स्वातंत्र्य कार्यासाठी प्रेरित होत असे. सावरकरांनी त्यांच्यासमोरही शिवराज्याचा आदर्श ठेवला. स्वातंत्र्य मोहिमेची आखणी करण्यासाठी समस्त तरुण संघटित होत असत. भारतमातेच्या तसेच शिवरायांच्या प्रतिमेची पूजा करत असत. 

सावरकर एक लढवय्या सैनिक होतेच , शिवाय एक प्रतिभावान कवी सुद्धाहोते . त्यांनी कवने लिहावीत आणि त्याच्या मित्रांनी पोवाड्यासारखी ती कवने गावीत, हे नित्याचेच झाले होते. इ. स. १९०२ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातील 'आर्यन संघ' नावाच्या संघामध्ये रोज म्हणता यावी, म्हणून सावरकरांनी शिवरायांची आरती लिहिली. ज्याप्रमाणे आपण समर्थ रामदास रचित 'सुखकर्ता दुःखहर्ता' आरती म्हणतो त्याच चालीत तेव्हा ती म्हटली जात असावी. स्वातंत्र्योत्तर काळात पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी ती आरती संगीतबद्ध केली आणि भारतरत्न लतादीदी यांनी त्या आरतीला आपला स्वरसाज चढवला त्यामुळे ती आरती अधिक लोकप्रिय झाली. 

ज्याप्रमाणे भगवान विष्णूंनी दशावतार घेऊन पृथ्वीवरील संकट दूर केले, तसे शिवरायांनी पुनश्च जन्म घेऊन मातृभूमीला पारतंत्र्यातुन मुक्त करावे, असे आवाहन सावरकरांनी या आरतीत केले, तेही वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी! वास्तविक पाहता, ते त्यांचे प्रेमात पडण्याचे दिवस होते. तसे घडलेही! फक्त हे प्रेम होते मातृभूमीसाठी! आपली आई स्वतंत्र व्हावी म्हणून त्यांनी शिवाजी महाराजांना सदर आरतीतून गाऱ्हाणे घातले आहे. आज स्वा.सावरकरांच्या जयंतीनिमित्त आपणही ती आरती वाचुन या दोन्ही शूरवीरांना वंदन करूया. 

जय देव, जय देव, जय जय शिवरायाया, या अनन्य शरणां, आर्या ताराया

आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घालाआला आला सावध हो शिवभूपालासद्‌गदीता भूमाता दे तुज हाकेलाकरूणारव भेदूनी तव हृदय न का गेलाजय देव, जय देव, जय जय शिवराया

श्रीजगदंबा जी तव शुंभादीकभक्षीदशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षीती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळतातुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राताजय देव, जय देव, जय जय शिवराया

त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलोपरवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालोसाधुपरित्राणाया, दुष्कृती नाशायाभगवन्‌ भगवद्‌गीता सार्थ कराया याजय देव, जय देव, जय जय शिवराया!

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर