शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

Vrishchik Rashi Bhavishya 2022: वृश्चिक रास वार्षिक राशीभविष्य: आरोग्याबाबत राहा सावध, विद्यार्थ्यांना उत्तम काळ; वर्षाचा उत्तरार्ध आनंददायी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 10:58 AM

Vrishchik Rashifal 2022: वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सन २०२२ वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत, प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत आनंददायी काळ ठरेल. वृश्चिक राशीचे वार्षिक राशीभविष्य जाणून घेऊया...

सन २०२२ हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष संमिश्र असेल. वृश्चिक राशीच्या लोकांना या वर्षी अनेक बदलांना सामोरे जावे लागू शकते. नोकरदार व्यक्ती या वर्षी त्यांच्या आयुष्यात चमकदार कामगिरी करतील, त्या आधारावर त्यांना बक्षिसे देखील मिळतील. तुमचा राहण्याचा खर्च जास्त असेल. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत, प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत तुमचे जीवन आनंददायी असेल. जर कोणी तुम्हाला मार्गदर्शन करत असेल, तर तुम्ही ते ऐकून त्याचे पालन केले पाहिजे.

या वर्षात तुमच्या प्रकृतीत चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा विश्रांती घेण्याचा प्रयत्न करा. वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल आणि हे वर्ष त्यांच्यासाठी खूप चांगले असेल. या वर्षी तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर मिळण्याची शक्यता आहे. परंतु, या वर्षी तुम्ही एकांतात काम करण्यास प्राधान्य द्याल.

सन २०२२ मध्ये सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने दिलासा मिळेल. वर्षाच्या सुरुवातीला तुमचे जीवन आरामात व्यतीत होऊ शकेल. स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी यशकारक असेल. या काळात अनेक महत्त्वाच्या आणि प्रभावशाली व्यक्तींचा तुम्हाला सहवास लाभेल. एप्रिल आणि मे महिना तुमच्यासाठी काहीसा निराशाजनक ठरू शकेल. परंतु, कालांतराने सकारात्मकता येऊन जीवन पुन्हा एकदा रुळावर येईल आणि या काळात तुमच्या हितशत्रूंना पराभूत करण्याचे धैर्यही तुमच्यात निर्माण होईल. या काळात तुम्हाला तुमच्या भागीदारीच्या कामात खूप लक्ष द्यावे लागेल. मे महिन्यात तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत व्हाल.

जून आणि जुलैच्या महिन्याच्या मध्यात तुम्हाला सुदृढ आरोग्यासाठी अधिक व्यायाम करावा लागेल. योग, ध्यानधारणा उपयुक्त ठरेल. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जात आहे. करिअरमध्ये यश, प्रगतीसाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांना या वर्षी लाभ मिळण्याची शक्यता आहे. तेल इत्यादी व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना वर्षाच्या शेवटी लाभ होण्याची शक्यता आहे. मे महिन्यानंतरचा काळ करिअरसाठी शुभ राहील.

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तुमच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढेल. तुम्हाला विविध संधी मिळतील. या वर्षी तुम्ही तुमचे यश साजरे करण्यासाठी मित्रमंडळी आणि कुटुंबातील सदस्यांसह सहलीला जाण्याचा विचार करू शकता. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष सामान्य राहणार आहे.

वर्षाच्या शेवटी, वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सुधारणा दिसून येईल आणि तुम्हाला अधिक ताजेतवाने, ऊर्जावान वाटेल. सन २०२२ हे वर्ष आरोग्याच्या दृष्टीने उत्तम राहील. पण खाण्याबाबत काळजी घ्या. या वर्षी तुम्हाला नातेवाईकांचे पूर्ण सहकार्य मिळेल. काही महत्त्वाची गुंतवणूक करण्यात आणि जोखमीच्या गोष्टी करण्याचा विचार करू शकता. एकंदरीत हे वर्ष वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आरामदायक ठरेल.

सन २०२२ मध्ये तुम्हाला संमिश्र परिणाम मिळतील. या वर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे आणि कोणतेही काम योग्य आणि यशस्वीपणे पूर्ण करण्याची तुमची क्षमता उत्कृष्ट असेल.

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य