शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

शास्त्र सांगते की 'या' पाच चुकीच्या सवयींमुळे दारिद्रय हात धुवून पाठी लागते!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 5:43 PM

यश मिळाले तर त्याचे क्रेडिट आपण स्वतःकडे घेतो आणि अपयश आले तर नशिबावर त्याचे खापर फोडतो. परंतु शास्त्र सांगते की तुमच्या यशाला जसे तुम्ही कारणीभूत असता तसेच तुमच्या अपयशाला तुमच्या चुकीच्या सवयी कारणीभूत ठरू शकतात. 

यशस्वी लोकांचे यश आपल्याला दिसते पण त्यामागे त्यांनी घेतलेली मेहनत दिसत नाही. शास्त्र सांगते, यशस्वी तेच लोक होतात जे आपल्या दुर्गुणांवर मात करतात. अशा लोकांना प्रसिद्धी, पैसा, यश सर्वकाही मिळते. याउलट जे लोक आपल्या सवयी बदलत नाहीत, दारिद्रय त्यांची पाठ सोडत नाही. अशी परिस्थिती आपल्या वाट्याला येऊ नये असे वाटत असेल तर पुढील सवयींना आळा घाला!

सूर्योदयानंतर उठणारे लोक : 'लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे' असे धर्म शास्त्रात म्हटले आहे. परंतु ब्रह्म मुहूर्त दूरच आपण सूर्योदयाच्या वेळीदेखील उठत नाही. परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येते. त्या कालावधीत दिवसभराच्या तुलनेत कमी विचार असतात. त्यामुळे मन शांत होण्यास, एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्याबद्दल जी तयारी करायची आहे, त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्याला फायदेशीर ठरते. कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो. सकाळच्या वेळी केलेले पाठांतर, वाचन दीर्घकाळ लक्षात राहते. स्मरण शक्ती वाढते. सकारात्मकता वाढते. म्हणून म्हणून उशिरा उठणे टाळा! अन्यथा कितीही मेहनत घेतलीत तरी अपयश आणि दारिद्रय तुमची पाठ सोडणार नाही हे नक्की!

आळशी लोक : आळस हा माणसाचा शत्रू आहे हे आपण बालपणी शिकलो, परंतु त्याच्यापासून दूर राहणे आपण शिकलो नाही तर दारिद्रयाशी हातमिळवणी झालीच म्हणून समजा! आळसामुळे आपली प्रगती थांबते, ध्येय दूर जाते आणि जगण्याला उद्दिष्ट राहात नाही. त्याला आपण नैराश्य म्हणत कुरवाळू लागतो. परंतु शास्त्र सांगते जो अकार्यक्षम असतो तोच नैराश्येच्या गर्तेत जातो. जो स्वतःची मदत करू शकत नाही त्याची मदत दुसरे कोणीही करू शकत नाही. म्हणून आळस झटका आणि कामाला लागा!

मळके कपडे घालणारे लोक : कपडे महाग आहेत की स्वस्तातले हे महत्त्वाचे नसून ते स्वच्छ असणे जास्त महत्त्वाचे आहे. आपल्या कपड्यांवरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडते तसेच आपला आत्मविश्वास दुणावतो. मळके, चुरगळलेले, फाटके कपडे पाहून कोणीही आपल्याला जवळ करत नाही. यासाठीच आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील असे कपडे परिधान करावेत. ते नीट नेटके असावेत. स्वच्छ असावेत. ते परिधान केल्यामुळे आपल्याला आल्हाददायक वाटले पाहिजे. 

दुसऱ्यांचा अपमान करणारे लोक : काही लोक स्वतःला सर्वज्ञ समजतात. त्यांच्या लेखी दुसऱ्यांना काहीच येत नाही. या गैरसमजापोटी ते त्यांचा अपमान करतात, कमी लेखतात. अशा गर्विष्ठ लोकांशी कोणी मैत्री करत नाही. त्यामुळे हे लोक स्वतःच्या प्रगतीत स्वतःच अडथळा निर्माण करतात. याउलट जे लोक स्वतः बरोबर इतरांच्या प्रगतीचा विचार आणि कृती करतात त्यांची प्रगती आपोआप होत जाते. म्हणून विद्यार्थी दशेत राहून प्रत्येकाचा चांगला गुण घेऊन स्वतःचा उत्कर्ष करणे केव्हाही चांगले!

अस्वच्छ राहणारे लोक : ज्या लोकांना स्वतःची, घराची स्वच्छता राखता येत नाही असे लोक आपल्या कामातही नीटनेटकेपणा आणू शकत नाहीत. या लोकांकडे कोणीही लक्ष देत नाही. एवढेच काय तर लक्ष्मी माताही अशा घरांकडे फिरत नाही. तसेच अशा लोकांच्या हाती लक्ष्मी टिकत नाही. कारण खर्च करण्याबाबतीतही त्यांना नेटकेपणाने व्यवहार जमत नाही. यासाठीच आपल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीत आपण डोळसपणे लक्ष द्यायला हवे. अस्वच्छता दूर करायला हवी, घरातली, शरीरातली आणि मनातलीदेखील; तर आणि तरच तुमचा सर्वार्थाने उत्कर्ष होऊ शकेल आणि दारिद्रयापासून तुमची सुटका होऊ शकेल!