शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर', हे कळल्यावर तरी आपले कर्म कसे ठेवायचे ते पहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 7:00 AM

भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी कर्मयोग सांगितला आहे, तो आचरणात कसा आणायचा तेही जाणून घेऊ!

दर महिन्याला आपण आपले पासबुक चेक करता़े  कुठे अफरातफर तर झाली नाही ना, पैसे तर कापले गेले नाही ना, कोणाचे पैसे द्यायचे राहून गेले नाही ना, ठरलेले पैसे वेळेत आले ना? अशा अनेक गोष्टी एका पासबुकवरून कळतात. आर्थिक व्यवहाराबाबत आपण एवढे दक्ष असतो, तेवढेच दैनंदिन व्यवहाराबाबत आपल्याला दक्ष होता आले तर? त्यासाठी एक सोपा उपाय करायचा, तो म्हणजे रोज रात्री, झोपण्यापूर्वी आपल्या 'बँक ऑफ कर्मा'चे पासबुक तपासून पाहायचे. 

या बँकेत प्रत्येकाचे स्वतंत्र खाते असते. श्री. चित्रगुप्त त्या बँकेचे सर्व व्यवहार पाहतात आणि ज्यांच्या खात्यात गडबड आढळून येते, त्यांना शह देण्यासाठी यमदूत धाडतात. खात्याचे व्यवहार सुरळीत असतील, तर श्री. प्रजापती बँकेचे लाभ मिळवून देतात आणि खात्यातील रक्कम संपुष्टात आली असेल, तर खुद्द यमराज सदर व्यक्तीला आणायला जातात. खातेदाराचे निधन झाले, तरी त्याचे पीएफ अकाऊंट पुढच्या जन्मात ग्राह्य धरले जाते आणि त्यात नव्याने हिशोब मांडले जातात. आपले खाते कधी संपुष्टात येईल, हे आपल्यापैकी कोणालाच माहित नाही. कारण, 'जीवन' कार्डवर एक्सपायरी डेट दिलेली नाही. ते कुठल्याही क्षणी जप्त होऊ शकते. म्हणून वेळीच सगळे व्यवहार मार्गी लावून टाकणे चांगले. जसे की, 

>> कर्जमुक्त व्हा. कुणाचे कर्ज घेतले असेल, तर ते वेळीच फेडून टाका. आपल्यामागे आपल्या आप्तजनांना कर्जाचे ओझे पेलावे लागणार नाही, याची काळजी घ्या. ऋण काढून सण करू नका. एकवेळ कोणाचे पैसे यायचे बाकी असले, तर ठीक, परंतु पैसे देणे बाकी ठेवू नका. त्याचप्रमाणे कोणाची माफी मागायची राहून गेली असेल, तर वेळीच मागून टाका, मात्र कोणाच्या माफीची वाट बघत बसू नका. 

>> दानधर्म करा.जे काही कमावले, त्यापैकी काहीही वर घेऊन जाता येणार नाही. त्यामुळे वेळच्या वेळी प्रत्येक गोष्टीचा योग्य विनीमय करून टाका. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी सगळ्या गोष्टींची साठवणूक करून न ठेवता, त्यांनाही त्यांच्या पायावर उभे राहू द्या. जीवनासाठी आवश्यक असलेली मूल्य त्यांच्यासाठी 'ठेव' म्हणून जमा करून जा.

>>पुण्यसंचय करा.जातोच आहोत, मग पुण्य कशाला कमवायचे? असा विचार आपल्या डोक्यात येईलही. परंतु, वर म्हटल्याप्रमाणे व्यक्ती संपुष्टात आली, तर खाते संपुष्टात येणार नाही. तर ते पुढच्या जन्मात कामी येईल म्हणून. आपल्या खात्यात आयुष्यभर केलेल्या कर्माचा हिशोब लिहीलेला असतो. त्यामुळे दररोज, आपली बॅलेन्स शीट तपासून पाहा. आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडत असतील, तर समजून जा, की आपले पुण्य बाकी आहे आणि गोष्टी वाईट घडत असतील, तर समजून जा पाप वाढले आहे. 

>>देवाचे स्मरण करा. आपल्या खात्यातील आवक-जावक ही रोजच्या परिस्थिती आणि मनस्थितीनुसार बदलत राहणार आहे. तरीदेखील आपण आपले कर्म शुद्ध ठेवून भगवंताचे स्मरण करत राहायचे. आपल्या कामाबरोबर आपण घेतलेल्या नामाचाही हिशोब बॅँकेत ठेवला जातो. म्हणून दिवसभराच्या घडामोडींचा हिशोब मांडून झाल्यावर सरतेशेवटी आपली सर्व कर्मे 'श्रीकृष्णार्पणमस्तु' म्हणत कृष्णचरणी अर्पण करावीत. 

हे पासबुक रोजच्या रोज भरले गेले पाहिजे, अन्यथा अचानक बोलावणे आले, तर 'गेले द्यायचे राहुनि' ही हुरहूर मागे राहील.