यंदाचा दसरा खूप खास असणार आहे. राजकीय दृष्ट्या तर आहेच, परंतू तुमच्यासाठी जर तो खास आणि लाभदायी बनवायचा असेल तर त्यासाठी एक खास पक्षी मदत करणार आहे. त्याचे दर्शन झाले तर ते तुमच्यासाठी शुभदायक असणार आहे.
विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्षी पाहणे अत्यंत शुभ मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी एखाद्याला नीळकंठ पक्षी दिसल्यास घरात धन आणि अन्नाची कमतरता भासत नाही आणि कुटुंबात शुभ कार्ये होतात, असे धार्मिक मान्यता सांगतात. मनुष्य पापाच्या बंधनातून मुक्त होतो.
नीळकंठ पक्ष्याला भगवान शिवाचे प्रतीक मानले जाते आणि दसऱ्याला त्याला पाहण्याची श्रद्धा प्रभू रामाशी संबंधित आहे. रामाने जेव्हा रावनाचा वध केला तेव्हा त्याला ब्राम्हण हत्येचे पातक लागले, यावेळी रामाने शंकराची पूजा केली, तेव्हा शंकर निलकंठाच्या रुपात प्रकट झाले होते, असे पौराणिक कथांमध्ये म्हटले आहे.
यामुळे या दिवशी निलकंठ पक्षी दिसला की त्याला पाहताच "कृत्वा नीराजनं राजा बालवृद्धयं यता बलम्। शोभनम खंजनं पश्येज्जलगोगोष्ठसंनिघौ।। नीलग्रीव शुभग्री सर्वकामफलप्रद पृथ्वियामवतीर्णोसि ख्ञजरीट नमोस्तु तो।।" हा मंत्र म्हणायचा. यामुळे फायदा होतो, असे मानले जाते. हे माझ्या पक्ष्या, तू या पृथ्वीवर आला आहेस, तुझा कंठ निळा आणि शुभ आहे, तू सर्व इच्छांचा दाता आहेस, तुला नमस्कार असो, असा त्याचा अर्थ आहे.