शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

September birthday Astro: सप्टेंबरमध्ये जन्मलेली माणसं ध्येयवेडी तर असतातच पण नवा इतिहासही रचतात; वाचा त्यांचे गुण-दोष!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 1:28 PM

September born people astrology: सप्टेंबर महिन्यात जन्माला आलेले लोक ध्येयाने झपाटलेले असतात. त्यांच्यात गुण आणि दोष समसमान असल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व इतरांच्या तुलनेत अतिशय संतुलित असते! 

हे लोक स्वत:च्या प्रचंड प्रेमात असतात. त्यांच्याबद्दल दुसऱ्याने काही टीका केलेली त्यांना सहन होत नाही. अतिशय शिघ्रकोपी अशी यांची ओळख आहे, परंतु ते नेहमी या भ्रमात असतात, की आपल्यापेक्षा शांत आणि विनम्र दुसरे कोणीच नाही. टोमणे मारण्यातही ते पुढे असतात. 

यांच्यात शिकण्याची आणि समजून घेण्याची क्षमता इतरांच्या तुलनेत अधिक असते. कामाच्या बाबतीत ते तहानभूक विसरून मान पाठ एक करतात. दिवसाचे चोवीस तास काम करण्याची त्यांची तयारी असते. एवढी ऊर्जाही त्यांच्याजवळ असते. त्यांच्या या गुणाचे इतरांनी कौतुक करावे असे त्यांना नेहमी वाटत राहते.  या स्वभावामुळे त्यांची खोटी प्रशंसा करून लोक आपले काम काढून घेतात आणि यांना ते कळतही नाही. 

शर्यत कोणतीही असो, त्यात स्वत:ला अग्रेसर कसे ठेवायचे हे यांच्याकडून शिकावे. कधी कधी शर्यतीत पुढे राहण्यासाठी ते स्वार्थीदेखील होतात. दुसऱ्यांकडून आपले काम काढून घेण्यासाठी वाट्टेल तेवढे गोड बोलतील. प्रेमातही त्यांचा अहंकार आडवा येतो. 

त्यांच्या मनात काय सुरू असते हे त्यांच्या अतिशय जवळच्या लोकांनाही समजू शकत नाही. एवढी गोपनियता ठेवण्यात ते तरबेज असतात. मात्र जवळच्या माणसांकडून त्यांच्या भरमसाठ अपेक्षा असतात. 

वृत्तीने दानशूर असतात आणि व्यवहाराच्या बाबतीत चोख असतात. कोणाला काही दिले तर व्याजासकट परत घेतात. नीटनेटके राहणीमान त्यांना आवडते. 

करिअर आणि प्रेम यापैकी त्यांच्या वाट्याला काहीतरी एक परिपूर्ण येते. प्रेम, वैवाहिक जीवन सुखाचे असेल तर करिअर मध्ये फारसे यश मिळत नाही आणि करिअरमध्ये अग्रेसर असले, तर वैवाहिक जीवनात फार आनंद घेता येत नाही. त्यामुळेच की काय हे लोक असंतुष्ट असतात. नवीन गोष्टी मिळाल्या नाहीत की ते नाराज असतात. सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक गायन, वादन, लेखन, विज्ञान या क्षेत्रात करिअर करताना आढळतात.

या महिन्यात जन्मलेल्या मुलींबद्दल बोलण्यास शब्द अपुरे पडतील. अर्थात हे कौतुकाने नाही, तर गमतीने म्हटले आहे. या महिन्यात जन्मलेल्या मुली स्वत:ला सर्वज्ञ समजतात. याच इगो प्रॉब्लेममुळे प्रेमाच्या तसेच वैवाहिक जीवनाच्या बाबतीत अपयशी ठरतात. एखाद्याच्या पाठीमागे त्याची उणीदुणी काढणे हा त्यांचा आवडता छंद असतो. अशा मुलींकडे प्रतिभा असूनही केवळ अहंकारामुळे त्यांच्या गुणांची कदर होत नाही. 

त्या दिसायला सुंदर असतात परंतु स्वभावाने वाईट असतात. अर्थात त्यातही अपवाद आहेच! काही जणी अतिशय भोळ्या भाबड्या, तर काही जणी अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या असतात.व्यक्तिची पारख करण्यात त्या चुकतात, त्यामुळे चुकीच्या व्यक्तिची निवड करून पश्चात्ताप सहन करतात. 

एकूणच काय, तर या महिन्यात जन्मलेले स्त्री असो वा पुरुष, यांनी आपला इगो बाजूला ठेवून जाणकारांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले पाहिजे. आपल्या अंगभूत कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि शर्यतीत टिकून राहण्यासाठी नाही, तर स्वत:ला आनंद मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग करिअर असो नाहीतर कुटुंब, तुम्ही कायम आनंदी राहू शकाल. 

त्यासाठी या महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्तींचा आदर्श तुम्ही ठेवू शकाल. या नामांकित लोकांनी आपल्या दुर्गुणांवर मात करून यश मिळवले, तसे तुम्हालाही मिळवता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, लता मंगेशकर, आशा भोसले, अक्षय कुमार, सुखविंदर सिंग ही काही आदर्श उदाहरणे समोर ठेवता येतील...!

टॅग्स :Astrologyफलज्योतिष