शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
3
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
4
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
5
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
6
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
7
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
8
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
9
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
10
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
11
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

Shakambhari Navratri 2022: शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा भावार्थ! (भाग २)  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 7:00 AM

Shakambhari Navratri 2022: महिषासुर मर्दीनी स्तोत्राच्या तीन कडव्यांचा अनुवाद काल पाहिला, आता पुढील तीन श्लोकांचा अर्थ समजावून घेऊया. 

>> रवींद्र गाडगीळ 

अयी शतखंड विखंडित रुण्ड वितुंडीत शूण्ड गजाधिपते, रिपुगज दगण्ड विदारण चंड पराक्रम शण्ड मृगाधिपते | निजभुज दंड निपातित चंड विपातित मुंड भटाधिपते, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||४||

हे चंडिके माते, तू युद्धात शत्रूंच्या अवाढव्य हत्तींचे शिर  व धड व सोंडेचे सहजपणे तुकडे तुकडे करतेस, त्यामुळे तू प्रचंड पराक्रमी आहेस हे दिसून येते, तसेच महाविक्राळ अशा सिंहावर बसून सवारी करत असतेस, एक वेळ तर अशी आली की तू तुझ्या बलशाली बाहूंनी चंड राक्षसाची मुंडीच आवळलीस व मुंड राक्षसालाही दुसर्‍या हाताने सहज पराजित केलेस. त्यामुळे ह्या अचाट पराक्रमाला दिपून मी तुझा भक्त, अनन्यभावे हे महिषासुरमार्दिनी, जी आपल्या सुंदर केश संभाराने सर्वांना आकर्षित करते, त्या गिरिजेला माझा साष्टांग नमस्कार असो, व तुझा जयजयकार असो.

अयी रण दुर्मद शत्रू वधोद्यत दुर्धर निर्जर शक्तिभृते, चतुर विचार धुरीण महा हव दूत कृत प्रमथाधिपते | दुरित दुरीह गुहाशय दुर्मति दानव दूत दूरस्तगते, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||५||

युद्धात तू तुझ्या अनेक रूपांची जागृत अशा तेजस्वी स्त्री देवींचे संघटन करून शक्ति एकवटून त्या शक्तीशाली दुर्मद राक्षसाचा वध केलास. किती चतुरता आहे ही तुझ्यात, हे चतुरस्त्र अष्टवधानि सदा सावध अशी गिरिजे, शिवालाही महायुद्धात तू तुझे सहकारी पद देऊन त्यांचीहि मदत घेतलीस, आणि अत्यंत वाईट अशा स्वभावाचे, वाईट कर्तुत्वाने भरलेले, वाईट आशा व हेतु धरून, कायम दुसर्‍यांच्या नाशाचीच इच्छा धरणारे असे राक्षसी वृत्तीच्या लोकांचे शिरोमणि राजे शुंभ जे तुला कायम यमदूत समजतात, अशा हे महिषासुर्मर्दिनीला माझा साष्टांग नमस्कार असो,व तुझा जय जयकार असो.

Shakambhari Navratri 2022: शाकंभरी नवरात्रीनिमित्त महिषासुरमर्दिनी स्तोत्रातील श्लोकांचा अर्थ नऊ दिवसांत जाणून घेऊ! (भाग १)

आई शरणागत वैरि वधूवर वीरवरा भयदायी करे, त्रिभुवन मस्तक शूल विरोधी शिरो धी कृतमाळ शूल करे | दुमी दुभितामर दुंदुमी नाद महो मुखरि क्रूत तिग्म करे, जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलस्तुते ||६||

हे आई तू दयाळू आहेस, पराजित राक्षसांच्या बायका मुलांनाही कोणतेही कपट मनात न धरता,शत्रुत्व कायमचे न धरता त्यांचेही रक्षण,पालन पोषण करतेस व त्यांना अभय देतेस, खरोखरीच तू धन्य आहेस. कायम कोणी शत्रू नसतो व कायम कोणी मित्र नसतो हे खरे आहे. त्रैलोक्याला सत्ता व संपत्ति च्या आधाराने हैराण केलेल्या राक्षसी वृत्तींच्या राज्यकर्त्याना तू आपल्या त्रिशूळाने घायल करून शरण यावयास भाग पाडलेस, त्यावेळेचे ते युद्ध भूमीवरचे डमरू नाद व दुदुंभी आम्हाला आनंदित करते व युद्धास प्रवृत्त करते,''विनाशायच दुष्कृताम” हा संदेश खरा ठरतो. ह्या लढवय्या गुणी महिषर्सुर्मर्दिनीला माझा साष्टांग नमस्कार असो,व तुझा जय जयकार असो. 

आई जगदंबे, शाकंभरी देवी, आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद कायम ठेव, नमोस्तुते. 

टॅग्स :Navratriनवरात्री