शाकंभरी अर्थात फळ भाज्या देणारी देवी. एकेकाळी दुष्काळजन्य परिस्थिती होती, तेव्हा सर्व सजीवांच्या रक्षणार्थ देवीने आपल्या शरीरातून फळ भाज्यांची निर्मिती केली होती. तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा. तिच्या कृपेने आपल्या बळी राजाच्या हाताला यश येते आणि तो मातीतून अन्न धान्य पिकवतो आणि या दोहोंच्या कृपेने आपण दोन वेळचे सुग्रास भोजन करू शकतो. यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शाकंभरी नवरात्रीचा उत्सव आपण साजरा करतो. या सोहळ्याचा गुरुवारी अर्थात २५ जानेवारी रोजी अंतिम दिवस. यानिमित्त देवीला निरोप देताना आपण पारंपरिक आरती म्हणूया आणि तिच्या कृपेने कोणाही जीवाची उपासमार होऊ नये अशी मनोभावे प्रार्थना करूया.
शाकंभरी देवीची मराठीत आरती
शताक्षी, बनशंकरी, चामुंडा काली दुर्गम, शुंभ निशुंभा स्वर्गी धाडियली येतां भक्ता संकट धावुनी ही आली दु:खे नाशुनि सकला सुखी ठेविली ॥१॥जयदेवी जयदेवी जय शाकंभरी ललिते अज्ञ बालकावरी त्वा कृपा करी माते ॥धृ॥
मधुकैटभ, महिषासुर मातले फार दुर्गारूपाने केलास दानव संहार शक्ती तुझी महिमा आहे अपार म्हणूनि वंदन करिती ब्रह्मादिक थोर ॥२॥
अवर्षणाने जग हे झाले हैराण अन्नपाण्याविना झाले दारूण शरिरातुनि भाज्या केलिस उत्पन्न खाऊ घालुनि प्रजा केलीस पालन ॥३॥
चंडमुंडादिक भैरव उद्धरिले भानू ब्राह्मणासी चक्षु त्वा दिधले नृपपद्माचे त्वा वंश वाढविले अगाध लीला माते करून दाखविले ॥४॥
पाहुनी माते तुजला मन होते शांत मी पण् उरे न काही मानव हृदयात प्रसन्न चित्ते राही तुझ्या क्षेत्रात ब्रह्मानंदी निमग्न होतो तुझा भक्त ॥५॥
वसंत प्रार्थी शंकरी शाकंभरी तुजसी आलो शरण तुला मी आशिष दे मजसी अखंड सेवा घडु दे इच्छा उरी ऐसी अंती सद्गती द्यावे मम या जीवासी ॥६॥
शाकंभरी देवीची पारंपरिक आरती
हरि ॐ श्री शाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजोऐसी अद्भुत रूप हृदय धर लीजो शताक्षी दयालु की आरती कीजोतुम परिपूर्ण आदि भवानी मां, सब घट तुम आप बखानी मांशाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो तुम्हीं हो शाकुम्भर, तुम ही हो सताक्षी मांशिवमूर्ति माया प्रकाशी मां,शाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो नित जो नर-नारी अम्बे आरती गावे मांइच्छा पूर्ण कीजो, शाकुम्भर दर्शन पावे मांशाकुम्भरी अम्बाजी की आरती कीजो जो नर आरती पढ़े पढ़ावे मां, जो नर आरती सुनावे मांबस बैकुंठ शाकुम्भर दर्शन पावेशाकुम्भरी अंबाजी की आरती कीजो।