शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Shakambhari Purnima 2025: शाकंभरी पौर्णिमेपर्यंत सामूहिकरित्या म्हणा देवीचे सिद्धमंत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 15:10 IST

Shakambhari Purnima 2025: १३ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा आणि नवरात्रीची सांगता आहे, तत्पूर्वी सप्तशतीत दिलेले सिद्धमंत्र म्हणा आणि संरक्षणकवच मिळवा!

शाकंभरी नवरात्रीत आपण भक्तीचा जागर करत आहोत. त्यातच अयोध्येत रामाच्या प्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्तीने नवरात्रीचा उत्साह द्विगुणित झाला. सोमवारी अर्थात १३ जानेवारी रोजी देवीचे नवरात्र पूर्ण होऊन उद्यापनाचा दिवस अर्थात पौष पौर्णिमा (Paush Purnima 2025), तथा शाकंभरी पौर्णिमा (Shakambhari Purnima 2025). यानिमित्ताने सकारात्मक ऊर्जा वाढावी आणि विश्वकल्याण व्हावे म्हणून 'सप्तशती'मधील सिद्धमंत्रांचा जप करूया. 

सामुहिक प्रार्थनेत खूप सामर्थ्य असते. कोणतीही प्रार्थना एकट्याने करणे आणि सर्वांनी मिळून करणे, यात जो फरक असतो, तोच सामुहिक जप-जाप्यात असतो. म्हणून तर, सहस्रावर्तन असो किंवा सहस्रजप, हे संकल्प सिद्धीस जावेत, म्हणून भाविक संघटित होऊन प्रार्थना करतात. आपणही शाकंभरी पौर्णिमेच्या  निमित्ताने एकत्रितरित्या या सिद्धमंत्रांचा अवलंब करूया. 

सप्तशती या प्रासादिक ग्रंथात ७०० मंत्ररूप श्लोक आहेत. या ग्रंथात श्रीमदभगवतीच्या कृपेचा महिमा वर्णन केला आहे. तसेच अनेक गूढ साधना रहस्यांचाही यात समावेश आहे, असे म्हणतात. या दिव्य ग्रंथाच्या निष्काम पारायणाने भक्त मोक्षाचा अधिकारी बनतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

मंत्रांचे उच्चार वातावरणनिर्मिती करतात. ज्याप्रमाणे संगीत सभेत तानपुरा, तबला, बासरी, हार्मोनिअम या वाद्यवादनाने सभेची पार्श्वभूमी तयार होते आणि त्यात गायकाच्या सुरेल रचनांची भर पडते, त्याप्रमाणे भगवन्नाम घेत असताना स्तोत्रपठण तसेच मंत्रोच्चारण यामुळे योग्य परिणाम साधला जातो. जीभेला चांगले वळण लागते. सकारात्मकता वाढते,म्हणून मंत्रांचे नित्यपठण करायचे असते. आपणही पुढील मंत्रांचे पठण करूया.

इत्थं यदा यदा बाधा, दानवोत्था भविष्यति,तदा तदावतिर्यादं करिष्याम्यरिसंक्षयम् ।।

ऐं ऱ्हीम क्लीं शत्रुभ्यो न भयं तस्य,दस्थुतो वा न राजत:न शस्त्रानलतोयौधात्कदाचित्संभविष्यति।।

ऐं ऱ्हीम क्लीं दुर्वृत्तानामशेषाणां बलहानिकरं परम् रक्षोभूतशिाचानां पठनादेव नाशनम् ।।

ऐं ऱ्हीम क्लीं मम प्रभावास्हिंहाद्या दस्यवो वैरिणस्तथा,दूरादेव पलायन्ते स्मरनश्चरितं मम् ।।

दुर्गे देवि नमस्तुभ्यं सर्वकामार्थसाधिके,मम सिद्धीमसिद्ध वा स्वप्ने सर्व प्रदर्शय।।

या मंत्रजपांचे नित्यपारायण करावे.हे मंत्रोच्चार कठीण वाटत असले, तरी ते योग्य परिणाम साधतात. म्हणून कोणत्याही प्रकारे आळस न करता, येत्या नवरात्रीत रोज स्नान करून, शुचिर्भुत होऊन, आसनस्थ होऊन उपरोक्त मंत्रपठण करावे. देवीला आपली इप्सित मनोकामना पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना करावी आणि केवळ आपलेच नाही, तर सर्वांचे भले कर, रक्षण कर आणि सर्वांना संकटमुक्त कर, असे मागणे मागावे. जगदंबsss  उदयोस्तु!

टॅग्स :Navratriनवरात्रीPuja Vidhiपूजा विधी