४ डिसेंबर रोजी सूर्य ग्रहण आहे आणि त्याच दिवशी शनी अमावस्यादेखील आहे. शनी देवांच्या नावाने अनेकांना भीती वाटते. शनी दोषाला अनेक जण घाबरतात. परंतु शनी दोष नक्की ओळखावा कसा आणि त्यावर उपाय काय, हे पाहू. शनी महाराजांनी निर्माण केलेली प्रतिकूल परिस्थिती आपल्यासाठी खूप वेदनादायी ठरू शकते. अशा परिस्थितीत शनि ग्रहाचे दोष दूर करण्यासाठी उपाय केल्यास थोडा फरक पडतो. ज्यांना आपली साडेसाती सुरू आहे किंवा शनीची वक्रदृष्टी सुरु आहे, याची माहिती नसेल, त्यांनी बाह्य परिस्थितीवरून शनी महाराजांची अवकृपा होत असल्याचे समजून घ्यावे.
या घटना शनी महादेवांचा प्रकोप होत असल्याची सूचना देतात.
- पायाशी संबंधित कोणत्याही आजाराचा त्रास होऊ शकतो.- क्षमतेपेक्षा अधिक काम करूनही कामाचे श्रेय मिळत नाही.- सतत आर्थिक नुकसान होते किंवा काम बिघडते. - पाळीव प्राण्यांचा मृत्यू (उदा. काळा कुत्रा किंवा म्हशी)- खूप मेहनत घेऊनही एखाद्या कामात अपयश येते. - कोणताही खोटा आरोप होणे आणि कोर्ट कचेरीच्या कामात अडकणे. - एखादी महाग वस्तू हरवणे किंवा चोरी करणे.- घराच्या भिंतींवर पिंपळ पानाची वारंवार वाढ होणे. - घरात वरचेवर कोळ्याचे जाळे तयार होणे. - घरात लाल मुंग्यांची रीघ लागणे. - घराभोवती काळ्या मांजरीचे सतत रडणे.
शनिदेवाचा राग टाळण्याचे उपाय
-रोज हनुमान चालीसा म्हणा. -कावळ्याला नाहीतर कुत्र्याला भाकरी खायला घाला. -भिकारी, दुर्बल व्यक्ती, नोकरदार व स्वच्छता कामगारांना आर्थिक मदत करा.-शनी मंदिरात दर शनिवारी तीळ, उडीद, तेल शनी देवाला अर्पण करा. - शनिवारी एका भांड्यात तिळाचे तेल घ्या आणि त्यामध्ये आपला चेहरा पहा आणि नंतर शनि मंदिरात ठेवा. -शनिदेव यांना तिळाचे तेल अर्पण करा. यामुळे शनिदेव लवकरच प्रसन्न होतील.-निःस्वार्थ मनाने गरीब माणसाला नेहमी मदत करा. असे केल्याने शनिदेव लवकरच प्रसन्न होतील आणि आपले कल्याण करतील. -पिंपळाच्या झाडाला केशर, चंदन, तांदूळ, फुलं मिसळून पाणी वहा. -शनिवारी तिळाच्या तेलाचा दिवा लावा व पूजा करा. -मांसाहार आणि मद्यपान टाळा. -ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. - ज्येष्ठ व्यक्तींच्या सेवेने देखील शनी महाराज प्रसन्न होतात आणि आपल्यावर कृपा करतात.