शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

Shani Jayanti 2023: शनी जयंतीला शनी देवाच्या दर्शनाला जाल तेव्हा 'ही' एक चूक प्रामुख्याने टाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 11:31 AM

Shani Jayanti 2023: १९ मे रोजी शनी जयंती आहे, शनी देवाची कृपादृष्टी लाभावी म्हणून तुम्ही हर तऱ्हेचे प्रयत्न करालच, मात्र एक गोष्ट न विसरता लक्षात ठेवा... 

शनी देवांचे नुसते नाव काढले, तरी एक प्रकारची भीती मनात निर्माण होते. बरोबर आहे, शालेय वयापासून शिक्षा करणाऱ्या शिक्षकांचीच सर्वात जास्त भीती वाटत आली आहे. ही भीती आदरयुक्त भीती असते. कारण असे शिक्षक आपल्याला योग्य वळण लागावे म्हणून प्रसंगी कठोर होऊन शिक्षा देतात. त्याचप्रमाणे शनी देव हे सुद्धा कठोर शिक्षक आहेत. म्हणून इतर देवांच्या तुलनेत आपल्याला त्यांची जास्त भीती वाटते. साडेसाती काळात ते आपल्या आयुष्याला चांगले वळण लागावे, म्हणून हर तऱ्हेने परीक्षा घेतात आणि जे विद्यार्थी त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होतात, त्यांच्यावर शनी देव प्रसन्न देखील होतात. अशाच रीतीने शनी देवाला प्रसन्न करण्यासाठी १९ मे रोजी शनी जयंतीला तुम्ही शनी उपासना कराल, तेव्हा पुढील गोष्टी ध्यानात ठेवा. 

सूर्यपुत्र मानला गेलेल्या शनीला अन्य देवतांप्रमाणे पूजले जाते. शनीची अनेक स्तोत्र, मंत्र, श्लोक असून, याचे पठण, नामस्मरण, जप केले जातात. शनीच्या प्रतिकूल प्रभावापासून बचाव होण्यासाठी भाविक शनीची उपासना करत असल्याचे पाहायला मिळते. विशेष करून शनीची साडेसाती, ढिय्या प्रभाव तसेच महादशा सुरू असलेल्यांना शनी पूजन, नामस्मरण, उपासना करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, शनीदेवाची मूर्ती, तसबीर, प्रतिमा शक्यतो घरात स्थापन केली जात नाही. घरात अन्य देवांची प्रतिमा, मूर्ती असून सुद्धा शनी देवांची प्रतिमा निषिद्ध का? याबाबत शास्त्रीय आणि पौराणिक कारण सांगितले जाते. 

शनी देवाला मिळाला होता शाप : 

पौराणिक कथा असे सांगते, की शनी देवांना शाप मिळाला होता, की त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल, त्याचा विनाश होईल. म्हणून त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात ठेवली जात नाही. त्यासाठी मंदिराची जागा सुयोग्य ठरते. शनी महाराज ही उग्र स्वभावाची देवता असल्यामुळे, त्यांच्या सहवासात येताना सभोवतालचे वयल तेवढेच प्रभावित असावे लागते, अन्यथा अरिष्ट परिणाम भोगावे लागतील. शनी महाराजांच्या मंदिराची रचना ही तेथील भूमीचा, वातावरणातील लहरींचा आणि सभोवतालच्या परिसराचा अभ्यास करून बांधलेली असते. या गोष्टी घराच्या चार भिंतीत साकारणे शक्य नाही. म्हणून शनी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती घरात न ठेवता देवळातच ठेवली जाते. 

कसे घ्यावे शनी देवाचे दर्शन?

शनीदेवाची पूजा करताना कधीही त्यांच्या मूर्तीसमोर उभे राहून पूजा करू नये. तर, शनिदेवाचे दर्शन नेहमी मूर्तीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला उभे राहून घ्यावे. शनीदेवाच्या दृष्टीपासून वाचण्यासाठी शनिदेवाच्या मूर्तीऐवजी त्यांच्या पाषाणरूपाचे दर्शन घ्यावे. याशिवाय पिंपळाच्या झाडाची पूजा करणे, मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे किंवा शनिदेवाला दान करणे हे देखील शनिदेवाची कृपा मिळवण्याचा उत्तम उपाय आहे. गरीब, असहाय्य लोकांना मदत करून त्यांची सेवा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.