शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

Shani Pradosh 2023: आज शनी प्रदोष आणि शिवरात्र या दुहेरी योगावर सायंकाळी म्हणा दहा श्लोकी शनी स्तोत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 10:10 IST

Shani Pradosh 2023: सूर्यास्ताच्या वेळी प्रदोष व्रताची पूजा केली जाते, शनी प्रदोष व शिवरात्र या मुहूर्तावर 'ओम नमः शिवाय' हा जप आणि हे शनी स्तोत्र म्हणणे लाभदायी ठरेल!

मराठी वर्षातील सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला चातुर्मासाचा काळ सुरू आहे. काही दिवसांनी आषाढ महिन्याची सांगता होत आहे. यंदाच्या चातुर्मासाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी श्रावण महिना अधिक असणार आहे. १८ जुलै २०२३ पासून अधिक श्रावण सुरू होत आहे. मात्र, तत्पूर्वी आषाढ महिन्यात एक शुभ योग जुळून येत आहे. १५ जुलै २०२३ रोजी शिवरात्री आणि शनिप्रदोष एकाच दिवशी आले आहेत. काही मान्यतांनुसार, शनी देव महादेवांना आपले गुरु मानतात. त्यामुळे शनिप्रदोषच्या दिवशी महादेवांचे पूजन करणे लाभदायी मानले गेले आहे. महादेवाच्या उपासनेसाठी १०८ वेळा 'ओम नमः शिवाय' जप करावा आणि शनी उपासनेसाठी पुढील स्तोत्र म्हणावे आणि लाभ जाणून घ्यावेत. ही उपासना सूर्यास्ताच्या वेळी करणे अधिक लाभदायी ठरते. 

नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च।नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम:।

नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च।नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते। 

नम: पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नम:।नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते। 

नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्ष्याय वै नम:।नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने। 

नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तु ते।सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करेऽभयदाय च। 

अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते।नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तुते। 

तपसा दग्ध-देहाय नित्यं योगरताय च।नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नम:। 

ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज-सूनवे।तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात्। 

देवासुरमनुष्याश्च सिद्ध-विद्याधरोरगा:।त्वया विलोकिता: सर्वे नाशं यान्ति समूलत:। 

प्रसाद कुरु मे सौरे ! वारदो भव भास्करे।एवं स्तुतस्तदा सौरिर्ग्रहराजो महाबल:।

स्तोत्राचा अर्थ : 

ज्यांच्या शरीराचा रंग कृष्ण आणि भगवान शंकरासारखा निळा आहे, अशा शनिदेवांना माझा नमस्कार. या जगासाठी कालाग्नी आणि क्रान्ताच्या रूपात आलेल्या शनिश्चराला नमस्कार. ज्याचे शरीर सांगाड्यासारखे मांसहीन आहे आणि ज्यांचे दाढी-मिशा आणि केस वाढलेले आहेत, त्या शनिदेवाला वंदन आहे, ज्याचे डोळे मोठे आहेत, पाठीला चिकटलेले पोट आहे आणि भयानक आकार आहे.

ज्यांचे शरीर लांब रुंद आहे, ज्यांचे केस खूप जाड आहेत, ज्यांचे शरीर जर्जर आहे आणि ज्यांची दाढ काळी आहे, अशा शनिदेवांना पुन्हा पुन्हा नमस्कार केला जातो. हे शनिदेव! तुझे डोळे खोल भेदक आहेत, तुझ्याकडे पाहणे कठीण आहे, तू उग्र, उग्र आणि भयंकर आहेस, तुला नमस्कार. सूर्यनंदन, भास्कर-पुत्र, निर्भयपणा देणारी देवता, वालिमुख, सर्व काही तूच, शनिदेवाला नमस्कार असो.

तुझी दृष्टी अधोमुखी आहे, सावकाश चालणार्‍या आणि तलवारीप्रमाणे ज्यांचे प्रतीक आहे अशा शनिदेवाला वारंवार नमस्कार करतो. तू तपश्चर्येने तुझे शरीर जाळले आहेस, तू योगाभ्यास करण्यास सदैव तत्पर आहेस, भुकेने व्याकूळ आहेस आणि अतृप्त आहेस. तुला सदैव नमस्कार. कश्यपानंदन, सूर्यपुत्र शनिदेवा नमस्कार. 

जेव्हा तुम्ही संतुष्ट असता तेव्हा तुम्ही सुख देता आणि जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुम्ही ते लगेच काढून घेता. व्यक्तीची वागणूक योग्य अयोग्य ठरवून मगच प्रसन्न होता. अशा शनिदेवाला नमस्कार असो. तू माझ्यावर प्रसन्न हो. मी वरदान मिळण्यास पात्र आहे आणि तुझ्या आश्रयाला आलो आहे.

शनी स्तोत्राचे पठण केल्याने होणारा लाभ :

अशा या स्तोत्राचे पठण जो करेल, मग तो मनुष्य असो, देव असो वा राक्षस, सिद्ध आणि विद्वान असो, त्याला शनिदेवामुळे कोणताही अडथळा येणार नाही. ज्यांच्या महादशा किंवा अंतरदशा, संक्रमण किंवा आरोही, द्वितीय, चतुर्थ, आठव्या किंवा बाराव्या स्थानात शनि असेल त्यांनी शुद्ध होऊन या स्तोत्राचा सकाळी, मध्यान्ह आणि संध्याकाळी तीन वेळा पठण केल्यास त्यांना शनीची कृपादृष्टी प्राप्त होईल.