शनी एक एक रास पुढे सरकतो तेव्हा मागच्या राशींची सुटका होत जाते. मात्र जेव्हा शनीचे उलट मार्गक्रमण सुरु झोटे तेव्हा शनि दशा असलेल्या लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. नव ग्रहांपैकी शनीची हालचाल सर्वात मंद असते. यामुळेच शनीचे राशी परिवर्तन अडीच वर्षांत होते. सध्या शनी कुंभ राशीत भ्रमण करत आहे. २९ एप्रिल रोजी शनीने राशी परिवर्तन केले होते. आता ५ जून २०२२ रोजी शनि १४१ दिवस उलट फिरेल आणि २३ ऑक्टोबर रोजी त्याचे संक्रमण होईल. शनीच्या प्रतिगामीपणाचा सर्व राशींवर परिणाम होईल. मात्र या काळात पुढील चार राशींनी खबरदारी घ्यावी. कोणती ते पहा-
मेष- शनिची प्रतिगामी चाल तुमच्या नशिबावर परिणाम करू शकते. सध्या तुमच्या राशीत राहू विराजमान आहे. शनि प्रतिगामी झाल्याने हा काळ तुमच्या कामात अडथळे निर्माण करणारा ठरू शकेल. म्हणून शनी तसेच हनुमंताची उपासना करा. यथाशक्ती दानधर्म करा. त्यामुळे आर्थिक अडचणींना आळा बसेल आणि वैवाहिक जीवनातील मतभेदांना सामोरे जावे लागणार नाही.
कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी शनिची वक्र चाल त्रासदायक ठरू सुरू आहे. कर्क राशीच्या लोकांनी या काळात थोडे सावध राहणे आवश्यक आहे. या काळात तुमचे होणारे काम बिघडू शकते. आर्थिक स्थितीत बदल होऊ शकतो. वाहन वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दर शनिवारी मारुतीचे तसेच शनी देवाचे दर्शन घ्या. ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा!
मकर - मकर राशीत साडेसाती सुरू आहे. या कालावधीत मकर राशीच्या लोकांनी आपल्या बोलण्यावर आणि आर्थिक व्यवहारावर विशेष लक्ष द्यावे. अन्यथा तुमच्या करिअरवर वाईट परिणाम होऊ शकतो. मेहनतीत वाया जाऊ शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. यासाठी नित्य उपासना करा. हनुमंताचा नामजप करा. तसेच नवग्रह स्तोत्राचे पठण करा.
कुंभ- कुंभ राशीच्या जातकांना साडे साती सुरु झाली आहे. शनी तुमच्याच राशीत भ्रमण करत आहे.२९ एप्रिल २०२२ रोजी शनीचे तुमच्या राशीत आगमन झाले आहे. या काळात तुम्ही कोणत्याही वादात पडू नका. हुशारीने गुंतवणूक करा. वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करा आणि शनी उपासना करत राहा.