शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

Shani Vakri 2024: २९ जून रोजी शनी वक्र; 'या' सहा राशींना पुढील चार महिने मिळणार शुभ-अशुभ फळं!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 2:59 PM

Shani Vakri 2024: २९ जून ते १५ नोव्हेंबर हा काळ सहा राशींसाठी आव्हानात्मक ठरणार आहे, शनी वक्री जात असल्याने काय बदल होणार आहेत ते जाणून घ्या. 

>> चेतन साळकर (ज्योतिष भास्कर)

शनी महाराज दर वर्षी वक्री होत असतात. तसेच ते या वर्षी देखील वक्री होत आहेत. २९ जून ला शनी महाराज वक्री होऊन १५ नोव्हेंबर ला मार्गी होतील. चार महिन्यांचा हा कालावधी असणार आहे. ३ ऑक्टोंबर रोजी शनी महाराज शततारका नक्षत्रात प्रवेश करतील वक्री अवस्थेत. 

शनी महाराज हे साधेसुधे ग्रह नाहीत. प्रचंड प्रभाव देणारे ग्रह मंडळातील सर्वार्थाने उच्च आणि सन्माननीय असणारे ग्रह आहेत. त्यांच्या जराशा हालचाली ने सुध्दा आपल्यावर प्रभाव येतात. नक्षत्र बदल , राशी परिवर्तन , वक्री - मार्गी भ्रमण हे शनी चे अवस्था रूप खूप बदल घडवत असत.आज या लेखाच्या माध्यमातून हेच शनीचे वक्री भ्रमण आपण एकंदरीत कसे असेल हे जाणून घेऊयात. . !!

भ्रमणावस्था : 

इतर ग्रह वक्री होणे आणि शनी वक्री होण्यात फार तफावत आहे. इतर ग्रह वक्री झाले तरी त्यांच्या फळांना तेवढा ठामपणा येईलच असे नाही पण, शनी महाराजांच्या फळांना तिथे प्रचंड झळाळी येते. त्यांची फळे अगदी निश्चित मिळतात. हेच शनी महाराज प्रत्येक लग्न आणि राशीला विविध प्रभाव देतात. इथे आपण शनी महाराज साधारण कसे आणि काय फळं देणार याचा ओझरता अंदाज घेणार आहोत. 

वर्गीकरण : 

खरंतर प्रत्येक राशी आणि लग्नाला शनी महाराज हे प्रभाव दिल्याशिवाय राहत नाही. इथे कोणत्या राशीला शुभ आणि कोणत्या राशीला अशुभ असे वर्गीकरण करण्यात अर्थ नाही. सर्वांनाच शुभ अशुभ दोन्ही फळे मिळणार आहेत. इथे कोणत्या राशीला शुभ आणि अशुभ हे बघण्यापेक्षा शनी महाराज नेमके कसे फळाचे स्वरूप ठेवणार आहेत ते पाहुयात. . .

फळाचे स्वरूप :

वक्री शनी महाराज म्हणजे आधीच संथ त्यात आणखी विलंब असे होईल. ज्या फळाची अपेक्षा आपण करत आहात त्या फळात विलंब तर होईलच पण ते मिळताना संघर्ष , स्ट्रगल होईल. आर्थिक व्यवहार असतील तर रखडतील किंवा मिळतील पण तुमच्या मनाप्रमाणे नाही. तुमची जी अपेक्षा असेल त्यापेक्षा कमी. लाभ होण्याशी संबंधित शनी असेल तर मिळताना अनेक प्रयास करावे लागतील. 

ज्या स्थानावर दृष्टी असेल तिथे फळं सुध्दा कोलमडून पडेल. कोलमडून पडेल म्हणजे अशुभ फळं मिळणार असे  नाही तर फळाची प्रत आणि दर्जा , तसेच त्यातून मिळणारा आनंद सुखावह नसेल. प्रयत्न करून करून हाती आलेले यश कापुरासमान भासेल. क्षणात विरून जाईल. ज्या ग्रहावर दृष्टी टाकेल त्या ग्रहाला तो मंद करेल. सध्या वक्री होताना त्याची दृष्टी मंगळावर आहे. मंगळ ग्रहाचे फळं मिळताना घुसमट होईल. फ्रस्ट्रेशन येईल. बुध्दी आणि विवेक काम करणे कमी करतील. मार्ग भटकल्याचा भास होईल. अशावेळी मुळ कुंडली चांगली असेल तर निभावून जाईल अन्यथा नैराश्य हाती लागेल. 

ज्यांना साडेसाती आहे त्यांच्यासाठी हा वक्री काळ तर पितळ उघडे पडण्यासाठी शनी महाराजांचा सापळा आहे. तुमच्याच वागणुकीतून तुम्हालाच आपले परके यांची जाणिव होईल. 

धनु - मकर - कुंभ - मेष - मीन - सिंह - कर्क या लग्न राशिंना काहीसा अशुभ फळांकडे झुकणारा हा काळ असेल. जर तुम्हाला दशा नसतील आणि मुळ कुंडलीत शनी महाराज  सुस्थितीत असतील तर फार त्रास जाणवणार सुध्दा नाही. वक्री काळ कधी आला आणि कधी गेला कळणार सुध्दा नाही. इतर राशिंसाठी काळ मध्यम राहील. कन्या - कर्क - मीन या लग्न राशींना मात्र थोडा त्रासदायक जाण्याची चिन्हे आहेत. 

संपर्क : 7410190922

टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य